पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये उन्हाळ्याच्या उष्णतेपासून बचावासाठी उपाय सांगितले आणि नागरिकांना पुरेसे पाणी पिऊन शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला.
May 31st, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांत आपल्या देशातले लोक देशहितासाठी, समाजहितासाठी अशा काही अद्भूत गोष्टी करत आहेत की, जेव्हा त्यांच्याबद्दल आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. आज कार्यक्रमाची सुरुवात मी ऍथलेटिक्समधील देशाच्या अशाच एका कामगिरीने करणार आहे. काही दिवसांपूर्वीच झारखंडच्या रांची येथे नॅशनल सिनियर ऍथलेटिक्स फेडरेशन स्पर्धा झाली. यामध्ये देशभरातून आलेल्या जवळजवळ 800 खेळाडूंनी भाग घेतला होता. यादरम्यान चार वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांमध्ये चार राष्ट्रीय विक्रम मोडीत निघाले. गुरिंदरवीर सिंह, विशाल टीके, तेजस्विन शंकर, देव मीणा आणि कुलदीप कुमार. या खेळाडूंनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले. मी सर्वात आधी या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.The future of farming lies not merely in "Produce More,” but in "Produce Better": PM Modi at FAO
May 20th, 11:00 pm
Accepting the Agricola Medal for 2026 from the FAO, PM Modi said the recognition reflected India’s commitment to human welfare, food security and sustainable development. He dedicated the honour to Indian farmers and the country’s agricultural scientific community. He also highlighted initiatives such as ‘Per Drop More Crop’, micro-irrigation and precision farming, which are guiding India’s agricultural policies.पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे 'ॲग्रिकोला पदक' प्रदान
May 20th, 10:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) रोम येथील मुख्यालयात 2026 साठी प्रतिष्ठेच्या 'ॲग्रिकोला’ पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतात आणि जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी आणि ग्रामीण विकास, यासारख्या क्षेत्रांमधील त्यांच्या असाधारण नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट; सिक्कीमच्या विलक्षण जैवविविधतेचे केले कौतुक
April 28th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीममधील गंगटोक येथील ऑर्किडेरियमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील सौंदर्य आणि राज्याच्या विलक्षण जैवविविधतेचे कौतुक केले. ऑर्किडेरियमच्या या भेटीचे वर्णन पंतप्रधानांनी एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव असल्याचे म्हटले आहे. निसर्ग संवर्धनाचे असे समर्पित प्रयत्न हे मानवाचे निसर्गाशी असलेले घट्ट नाते दर्शवतात, हे उपक्रम नागरिकांना निसर्ग संरक्षण आणि शाश्वत जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरतील, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान 14 एप्रिल रोजी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला भेट देणार
April 13th, 04:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल 2026 रोजी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी सुमारे 11:15 वाजता, पंतप्रधान उत्तर प्रदेशातील सहारनपूरला भेट देतील आणि दिल्ली-डेहराडून आर्थिक कॉरिडॉरच्या उन्नत भागावरील वन्यजीव कॉरिडॉरचा आढावा घेतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:40 वाजता पंतप्रधान डेहराडूनजवळील जय माँ दात काली मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. त्यानंतर, दुपारी सुमारे 12:30 वाजता डेहराडून येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान दिल्ली-डेहराडून आर्थिक कॉरिडॉरचे उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती यांच्या भारत भेटीबाबत भारत-फिनलंड संयुक्त निवेदन
March 05th, 08:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती डॉ. अलेक्झांडर स्टब 4 ते 7 मार्च 2026 दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर आले आहेत. आपल्या विद्यमान पदावर कार्यरत असताना राष्ट्रपती स्टब हे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते नवी दिल्ली आणि मुंबईला भेट देत आहेत. त्यांच्यासोबत फिनलंडच्या हवामान आणि पर्यावरण मंत्री सारी मुलताला, फिनलंडचे रोजगार मंत्री मतियास मार्टिनेन तसेच अनेक अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. पंतप्रधान मोदी यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 11 व्या रायसीना संवादाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात फिनलँड चे राष्ट्रपती स्टब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी उद्घाटनप्रसंगी मुख्य भाषण दिले. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेसाठी फिनलंड प्रजासत्ताकाचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांच्या भारत भेटीनंतर राष्ट्रपती स्टब यांचा हा दौरा होत आहे.पटना पक्षी अभयारण्य आणि छरी-धांड येथे नवीन रामसर स्थळांचे पंतप्रधानांनी केले स्वागत
January 31st, 10:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एटा (उत्तर प्रदेश) येथील पटना पक्षी अभयारण्य आणि कच्छ (गुजरात) येथील छारी-धंद यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचे स्वागत केले आहे. स्थानिक लोकसंख्या आणि पाणथळ जागांच्या संवर्धनाबद्दल आस्था असलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले की, या मान्यतांमुळे जैवविविधतेचे संरक्षण आणि महत्त्वपूर्ण परिसंस्थांचे जतन करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी होते.पंतप्रधानांचे तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मधील भाषण
November 19th, 07:01 pm
व्यासपीठावर उपस्थित तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल मुरुगन जी, तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के. रामासामी जी, निरनिराळ्या कृषी संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आलेले सर्व मान्यवर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधीवर्ग, माझे प्रिय शेतकरी बांधव आणि भगिनी तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्यासोबत सहभागी झालेले देशभरातील लाखो शेतकरी, त्यांनाही मी येथून वणक्कम म्हणतो, नमस्कार करतो आणि सगळ्यात आधी मी तुम्हा सर्वांची आणि देशभरातून जमलेल्या माझ्या शेतकरी बंधू-भगिनींची क्षमा मागतो. मला इथे येण्यासाठी जवळ जवळ एक तास उशीर झाला आहे, कारण मी आज पुट्टपर्थी इथे सत्य साई बाबांच्या कार्यक्रमात होतो, तिथला कार्यक्रम जरा जास्त वेळ लांबला, त्यामुळे मला यायला उशीर झाला, तुम्हा सर्वांची जी गैरसोय झाली, मला दिसते आहे की देशभरातील अनेक लोक इथे थांबून आहेत, याबद्दल मी तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
November 19th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी सांगितले. हे शहर दक्षिण भारताच्या उद्योजकीय शक्तीचे एक ऊर्जा केंद्र असल्याचा दखलपूर्ण उल्लेखही त्यांनी केला. इथले वस्त्रोद्योग क्षेत्र राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. कोईम्बतूरचे माजी खासदार सी.पी. राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती म्हणून देशाला मार्गदर्शन करत आहेत, यामुळे आता या शहराला आणखी महत्त्व प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.नवी दिल्ली इथे एम एस स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेतले पंतप्रधानांचे संबोधन
August 07th, 09:20 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी शिवराज सिंह चौहान जी, एम एस स्वामीनाथन संशोधन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष डॉ सौम्या स्वामिनाथन जी,नीती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद जी,स्वामिनाथन जी यांच्या कुटुंबातले सर्व जण इथे उपस्थित असलेले मी पाहत आहे, त्यांनाही माझा नमस्कार.सर्व वैज्ञानिक, इतर मान्यवर आणि महिला आणि पुरुषहो !पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित
August 07th, 09:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक द्रष्टे होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. प्राध्यापक स्वामिनाथन हे एक थोर शास्त्रज्ञ होते ज्यांनी विज्ञानाला लोकसेवेचे माध्यम बनवले असे ते म्हणाले. राष्ट्राला अन्नसुरक्षा बहाल करण्यासाठी प्राध्यापक स्वामिनाथन यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, असे त्यांनी अधोरेखित केले. प्राध्यापक स्वामिनाथन यांनी एक अशी चेतना निर्माण केली जी भारताच्या पुढील अनेक शतकांच्या धोरणांमध्ये आणि प्राधान्यक्रमांमध्ये झळकत राहील, असे पंतप्रधान म्हणाले. एम.एस.स्वामीनाथन शताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान दिनांक 7 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन
August 06th, 12:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी उपस्थितांना ते संबोधितही करतील.जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल जर्मन गायिका कॅसमे यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
March 18th, 03:25 pm
जागतिक व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचा प्रचार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन गायिका कॅसमे यांची प्रशंसा केली आहे.जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला पुनरुच्चार
March 03rd, 08:37 am
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त आपल्या पृथ्वीवरील अतुलनीय जैवविविधतेचे संरक्षण आणि जतन करण्याच्या वचनबद्धतेचा,पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पुनरुच्चार केलासंयुक्त निवेदनः सातवी भारत-जर्मनी आंतर-सरकारी चर्चा (IGC)
October 25th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर ओलाफ शुल्झ यांनी भारत-जर्मनी आंतर-सरकारी चर्चेच्या (7वी IGC) च्या सातव्या फेरीचे सह-अध्यक्षपद भूषवले. या शिष्टमंडळात भारताच्या वतीने संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, वाणिज्य आणि उद्योग, कामगार आणि रोजगार, विज्ञान आणि तंत्रज्ञान (MoS) आणि कौशल्य विकास (MoS) मंत्री आणि आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती, परराष्ट्र व्यवहार, कामगार आणि सामाजिक व्यवहार मंत्री यांचा समावेश होता आणि अर्थविषयक संसदीय राज्य सचिवांसह जर्मनीच्या बाजूने शिक्षण आणि संशोधन; पर्यावरण, निसर्ग संवर्धन, आण्विक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण आणि आर्थिक सहकार्य आणि विकास तसेच दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.India is emerging as a hub of global trade and manufacturing: PM Modi
October 25th, 11:20 am
Addressing the 18th Asia-Pacific Conference of German Business, PM Modi remarked, India is becoming a prime center of persification and de-risking and is emerging as a hub of global trade and manufacturing. Given this scenario, now is the most opportune time for you to make in India, and make for the world.आसाममधील जोरहट येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 01:50 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित लोकप्रतिनिधी, इतर प्रतिष्ठित आणि आसामचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!! आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले आहात, त्याबद्दल मी अगदी नतमस्तक होवून आपल्याला वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो.पंतप्रधानांनी आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी
March 09th, 01:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये आरोग्य, तेल आणि वायू, रेल्वे आणि गृहनिर्माण या क्षेत्रांचा समावेश आहे.भारतातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
February 29th, 09:35 pm
भारतातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, बिबट्यांच्या संख्येत झालेली ही लक्षणीय वाढ म्हणजे जैवविविधतेप्रती भारताच्या अढळ समर्पणभावाचा पुरावा आहे.जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण
September 26th, 04:12 pm
दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .