पंतप्रधानांनी बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने घेतली नेपाळच्या पंतप्रधानांची भेट
April 04th, 04:17 pm
बँकॉकमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली.बिमस्टेक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांची घेतली भेट
April 04th, 03:49 pm
बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांची भेट घेतली.उपक्रमांची यादी: सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
April 04th, 02:32 pm
बिमस्टेक प्रदेशात स्थानिक चलनातील व्यापाराच्या शक्यतांवर व्यवहार्यता अभ्यास6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन
April 04th, 12:59 pm
सुरुवातीला, मी या शिखर परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल थायलंडच्या पंतप्रधान महामहिम शिनावात्रा आणि थायलंड सरकारचे मनापासून आभार मानतो.थायलंडमधील 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
April 04th, 12:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडने आयोजित केलेल्या सहाव्या बिमस्टेक (बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी बंगालचा उपसागर उपक्रम) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. शिखर परिषदेचा विषय होता - बिमस्टेक: समृद्ध, लवचिक आणि मुक्त क्षेत्र . ही शिखर परिषद म्हणजे नेत्यांच्या प्राधान्यक्रमांचे आणि बिमस्टेक प्रदेशातील लोकांच्या आकांक्षा तसेच जागतिक अनिश्चिततेच्या काळात सामायिक विकासाची सुनिश्चिती करण्यासाठी बिमस्टेकच्या प्रयत्नांचे द्योतक होते.पंतप्रधानांनी बिमस्टेक राष्ट्रांमधील सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश करणारा 21 कलमी कृती आराखडा प्रस्तावित केला आहे
April 04th, 12:53 pm
थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिमस्टेक राष्ट्रांमधील सहकार्याच्या विविध पैलूंचा समावेश करणारा 21 कलमी कृती आराखडा प्रस्तावित केला. बिमस्टेक राष्ट्रांमध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या समृद्ध क्षमतेचा वापर करण्यासाठी त्यांनी यावेळी भाष्य केले. म्यानमार आणि थायलंडला झालेल्या अलिकडच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात एकत्र काम करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. अंतराळ क्षेत्रात काम करण्यावर आणि सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर मोदींनी भर दिला आहे. नेतृत्व करणाऱ्या तरुणांची भूमिका अधोरेखित करत बिमस्टेकला एकत्रितपणे ऊर्जा देण्याचे आवाहन त्यांनी केले.बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांच्याशी भेट
April 04th, 09:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे झालेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान राज्य प्रशासन परिषदेचे अध्यक्ष आणि म्यानमारचे पंतप्रधान वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाईंग यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांची घेतली भेट
April 03rd, 08:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडच्या अधिकृत दौऱ्यात थायलंडच्या पंतप्रधान महामहिम पायतोंगटार्न शिनावात्रा यांची बँकॉकमध्ये भेट घेतली. सरकारी निवासस्थानी आगमन झाल्यावर पंतप्रधान शिनावात्रा यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. ही त्यांची दुसरी भेट होती. यापूर्वी दोन्ही नेत्यांची ऑक्टोबर 2024 मध्ये व्हिएन्टियान येथे आसियान संबंधित शिखर परिषदेप्रसंगी भेट झाली होती.पाली भाषेतील तिपिटकची प्रत दिल्याबद्दल पंतप्रधानांनी थायलंडच्या पंतप्रधानांचे मानले आभार
April 03rd, 05:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाली भाषेतील तिपिटकाची प्रत दिल्याबद्दल थायलंडच्या पंतप्रधान पैतोंगटार्न शिनावात्रा यांचे आभार मानले. पाली ही एक सुंदर भाषा आहे असे सांगत या भाषेने भगवान बुद्धांच्या शिकवणीचे सार स्वतःमध्ये सामावून घेतले आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.थायलंडच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत केलेले निवेदन
April 03rd, 03:01 pm
पंतप्रधान शिनावात्रा यांनी अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपामध्ये बळी पडलेल्यांविषयी मी भारताच्या नागरिकांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करतो. यामध्ये जे लोक जखमी झाले त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी आम्ही प्रार्थना देखील करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला थाई रामायण – रामाकियन च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या कलात्मक सादरीकरणाचा अनुभव
April 03rd, 01:02 pm
भारत आणि थायलंड यांच्यामधील गहिऱ्या सांस्कृतिक आणि नागरी समाजातील नातेसंबंधांबद्दलची आपल्या मनातली गौरवाची भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंड मधील बँकॉक इथे रामाकियन या थाई रामायणाच्या समृद्ध कलात्मक सादरीकरणा अनुभव घेतला.पंतप्रधान मोदींचे थायलंडमध्ये बँकॉक येथे आगमन
April 03rd, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंडमधील बँकॉकमध्ये दाखल झाले. तिथे ते बिमस्टेक परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पेतोंग्टार्न शिनवात्रा यांच्याशी चर्चाही करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्याला प्रस्थान करण्यापूर्वी केलेले निवेदन
April 03rd, 06:00 am
गेल्या काही दशकांमध्ये बिमस्टेक समूह बंगालच्या उपसागरातील प्रदेशांच्या आर्थिक प्रगतीसह प्रादेशिक विकास आणि संपर्कव्यवस्थेला चालना देणारा एक महत्वपूर्ण मंच म्हणून उदयाला आला आहे. भारताच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे पाहिले असता भारताचा ईशान्येकडील प्रदेश बिमस्टेकच्या केंद्रस्थानी येतो. बिमस्टेक समूहातील सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन हे संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी मी उत्सुक आहे.पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.