बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ मर्यादितच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे केलेले भाषण
September 02nd, 01:00 pm
बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नीतीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, इतर मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बिहारच्या माझ्या लक्षावधी भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ मर्यादितचे केले उद्घाटन
September 02nd, 12:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ मर्यादितचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की या शुभ मंगळवारी एक अत्यंत आशादायक उपक्रम सुरू होत आहे. त्यांनी घोषणा केली की बिहारमधील माता आणि भगिनींना जीविका निधी साख सहकारी संघाच्या माध्यमातून एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या उपक्रमामुळे गावोगावच्या जीविकाशी संबंधित महिलांना आर्थिक मदत अधिक सुलभपणे मिळू शकेल, ज्यामुळे त्यांना आपले काम आणि व्यवसाय पुढे नेण्यास मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जीविका निधी प्रणाली पूर्णपणे डिजिटल असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यामुळे प्रत्यक्ष भेटींची गरज नाहीशी झाली असून आता सर्व काही मोबाईल फोनद्वारे करता येऊ शकेल. जीविका निधी साख सहकारी संघाच्या आरंभाबद्दल त्यांनी बिहारच्या माता आणि भगिनींचे अभिनंदन केले आणि या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल नितीश कुमार आणि बिहार सरकारची प्रशंसा केली.Prime Minister Narendra Modi to Launch Bihar Rajya Jeevika Nidhi Saakh Sahkari Sangh Limited
September 01st, 03:30 pm
PM Modi will launch Bihar Rajya Jeevika Nidhi Saakh Sahkari Sangh Limited on 2nd September. He will also transfer Rs. 105 crore into the institution’s bank account. The Jeevika Nidhi system will run fully digital, enabling faster and transparent transfers directly to Jeevika Didis’ bank accounts, boosting rural women’s entrepreneurship.