पंतप्रधानांनी बिहारच्या कोकिळा म्हणून,सुप्रसिद्ध असलेल्या गायिका शारदा सिन्हा जी यांना वाहिली आदरांजली
November 05th, 10:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या कोकिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका शारदा सिन्हा जी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी बिहारच्या कला आणि संस्कृतीला एक नवीन ओळख दिली, ज्यासाठी त्यांचे नेहमीच स्मरण केले जाईल. छठ या महान सणाशी संबंधित त्यांची मधुर गाणी लोकांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहेत , असे मोदी यांनी म्हटले आहे.