पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान भेटीसंदर्भात संयुक्त निवेदन
November 12th, 10:00 am
या भेटीदरम्यान, 11 नोव्हेंबर रोजी महामहीम चौथे ड्रुक ग्याल्पो यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त चांगलिमिथांग येथे आयोजित कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला.भूतानचे चौथ्या राजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले, जागतिक शांततासंबंधी प्रार्थना महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग
November 12th, 09:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थिम्फू भेटीनिमित्त भूतानचे चौथे राजे, जिग्मे सिंग्ये वांगचुक यांनी त्यांचे स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली
November 11th, 06:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिंपू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यांनी परस्पर हिताच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. दिल्ली दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल भूतानच्या राजांनी शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याच्या फलनिष्पत्तींची यादी
November 11th, 06:10 pm
या कराराद्वारे दोन्ही देशातील नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य संस्थात्मक करण्याचा उद्देश आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास, ऊर्जा साठवणूक, हरित हायड्रोजन तसेच या क्षेत्रातील क्षमता वृद्धी यावर एकत्रितपणे काम करण्याचा हेतू आहे.दिल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर भूतानने दर्शवलेल्या ऐक्यभावासाठी पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
November 11th, 03:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे चौथे राजे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूतानच्या जनतेने भारताप्रती ऐक्यभाव प्रदर्शित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.भूतानचे राजे (चौथे) यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी मजकूर
November 11th, 12:00 pm
भारत आणि भूतान यांच्यात शतकानुशतकांपासून भावनिक आणि सांस्कृतिक बंध रुजलेले आहेत. म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी भारत आणि मी स्वतः देखील वचनबद्ध आहोत.भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
November 11th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानमधील थिंपू येथील चांगलीमेथांग सेलिब्रेशन ग्राउंड येथे भूतानच्या चौथ्या महाराजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि चौथे राजे जिग्मे सिंग्ये वांगचुक यांना शुभेच्छा दिल्या. राजघराण्यातील सन्माननीय सदस्य, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि इतर उपस्थित मान्यवरांना त्यांनी आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या.PM Modi arrives in Bhutan for a two-day state visit
November 11th, 10:42 am
PM Modi arrived in Bhutan a short while ago. His two-day visit seeks to strengthen the special ties of friendship and cooperation between the two countries. The PM was given a warm welcome by Prime Minister of Bhutan Mr. Tshering Tobgay at the airport.पंतप्रधानांचे भूतानला रवाना होण्याआधीचे निवेदन
November 11th, 07:28 am
मी 11-12 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भूतान राज्याला भेट देणार आहे.भूतानमध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल पंतप्रधानांकडून भूतानच्या नेत्यांचे आणि नागरिकांचे कौतुक
November 09th, 03:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून भूतानमध्ये गेलेल्या बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल, भूतानच्या जनतेचे आणि नेत्यांचे मनापासून कौतुक केले. हे अवशेष शांतता, करुणा आणि सौहार्दाचा कालातीत संदेश देत असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले आहे. भगवान बुद्धांची शिकवण ही उभय राष्ट्रांच्या सामाईक आध्यात्मिक वारसातील पवित्र दुवा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.Prime Minister Narendra Modi to pay a State visit to Bhutan
November 09th, 09:59 am
PM Modi will pay a State visit to Bhutan from 11-12 November 2025 to strengthen the ties between the two countries. During the visit, the PM will meet His Majesty Jigme Khesar Namgyel Wangchuck, the King of Bhutan and Bhutanese PM Tshering Tobgay. The PM will also attend the 70th birth anniversary celebrations of His Majesty Jigme Singye Wangchuck, the Fourth King of Bhutan and the Global Peace Prayer Festival.भूतानच्या पंतप्रधानांच्या श्री रामजन्मभूमी मंदिर भेटीचे पंतप्रधानांनी केले स्वागत
September 06th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात भूतानचे पंतप्रधान टोबगे आणि त्यांच्या पत्नीला प्रार्थना करताना पाहून आनंद व्यक्त केला आहे. प्रभु श्री राम यांचे आदर्श जगभरातील लाखो लोकांना शक्ती आणि प्रेरणा देतात, असे मोदी यांनी नमूद केले आहे.79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी मानले जगभरातील नेत्यांचे आभार
August 15th, 07:26 pm
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल जगभरातील नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सिटी गॅस वितरण प्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 29th, 01:30 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सुकांत मजूमदार, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, अलीपुरद्वारचे लोकप्रिय खासदार भाई मनोज तिग्गा, इतर खासदार, आमदार आणि पश्चिम बंगालच्या माझ्या आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार येथे 1010 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या शहर गॅस वितरण प्रकल्पाची पायाभरणी
May 29th, 01:20 pm
भारतात शहर गॅस वितरण (सीजीडी) जाळे विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे सीजीडी प्रकल्पाची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांचे अलीपुरद्वारच्या ऐतिहासिक भूमीवरून अभिनंदन केले. या प्रदेशाचे समृद्ध सांस्कृतिक महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. हे केवळ त्याच्या सीमांनीच नव्हे तर खोलवर रुजलेल्या परंपरा आणि संबंधांनी देखील ते परिभाषित केले आहे, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी नमूद केले की,अलीपुरद्वारच्या सीमेपलिकडे एका बाजूला भूतान आहे, तर दुसऱ्या बाजूला आसाम आहे, जलपायगुडीच्या नैसर्गिक सौंदर्याने आणि कूचबिहारच्या अभिमानाने या प्रदेशाचा अविभाज्य भाग जोडलेला आहे. बंगालच्या वारसा आणि एकतेमध्ये त्याची भूमिका अधोरेखित करून त्यांनी या समृद्ध भूमीला भेट देताना विशेष आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, बंगालचा सहभाग अपेक्षित आणि आवश्यक आहे, यावर भर देत मोदी यांनी या प्रदेशात पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि गुंतवणूकीला गती देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले निरंतर प्रयत्न अधोरेखित केले.बंगालचा विकास भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आहे,असे मोदी म्हणाले. आज या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी अलीपुरद्वार आणि कूचबिहारमध्ये शहर गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली, ज्यामुळे 2.5 लाखांहून अधिक कुटुंबांना वाहिनीद्वारे स्वच्छ, सुरक्षित आणि किफायतशीर गॅस उपलब्ध होईल. मोदींनी नमूद केले की या उपक्रमामुळे एलपीजी सिलिंडर खरेदी करण्याची चिंता दूर होईल आणि कुटुंबांना सुरक्षित गॅस पुरवठा सुनिश्चित होईल.पंतप्रधानांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट
April 04th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमधील बँकॉक येथे सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेच्या निमित्ताने भूतानचे पंतप्रधान त्सेरिंग टोबगे यांची भेट घेतली.पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.भारत आणि भूतानमधील अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध : पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 21st, 07:16 pm
भारत आणि भूतान दरम्यानची अनोखी आणि ऐतिहासिक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नवी दिल्लीतील सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये भूतानचे पंतप्रधान महामहिम त्शेरिंग तोबगे यांच्या भाषणाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी यांनी केले.नवी दिल्लीत सोल लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 21st, 11:30 am
भूतानचे पंतप्रधान, माझे बंधू दाशो शेरिंग तोबगे जी, सोल बोर्डाचे अध्यक्ष सुधीर मेहता, उपाध्यक्ष हसमुख अढिया, उद्योग विश्वातील दिग्गज, जे आपल्या जीवनात, आपापल्या क्षेत्रात नेतृत्व देण्यात यशस्वी झाले आहेत, अशा अनेक मान्यवरांना मी येथे पाहात आहे आणि भविष्य ज्यांची प्रतीक्षा करत आहेत, अशा माझ्या युवा सहकाऱ्यांना देखील येथे पाहात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोल (SOUL) लीडरशिप कॉन्क्लेव्ह या परिषदेच्या पहिल्या पर्वाचे उद्घाटन
February 21st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित येथे स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप (School of Ultimate Leadership - SOUL) कॉन्क्लेव्ह 2025 या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. आपल्या संबोधनातून त्यांनी परिषदेसाठी आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचे तसेच भविष्यातील उदयोन्मुख युवा नेत्यांचेही स्वागत केली. आपल्याला काही कार्यक्रम अतिशय आवडतात, आणि आजचा हा कार्यक्रम अशाच कार्यक्रमांपैकी एक असल्याचे ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत चांगल्या नागरिकांची जडणघडण गरजेची असते, त्याच प्रमाणे प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणेही अत्यावश्यक असते असे मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्येक क्षेत्रासाठी उत्कृष्ट नेतृत्वाची जडणघडण होणे ही आजच्या काळाची गरज असल्याची बाबही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. त्यामुळेच स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिप सारखा उपक्रम हा विकसीत भारताच्या विकासाच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले. सोल (SOUL) हे काही या संस्थेचे केवळ संक्षिप्त स्वरुपातील नाव नाही, तर या नावातून प्रतित होणारा आत्मा हा अर्थ, हा खऱ्या अर्थाने भारताच्या सामाजिक जीवनाचाही आत्मा असणार असल्याची बाब पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखीत केली. SOUL या शब्दांत अतिशह सुंदरपणे आध्यात्मिक अनुभवाचे सारही सामावलेली असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. यावेळी पंतप्रधानांनी सोल सोबत जोडल्या गेलेल्या सर्व भागधारकांना शुभेच्छा दिल्या. लवकरच गुजरातमधील गिफ्ट सिटी इथे सोलचे एक नवे, विस्तीर्ण प्रांगण - संकुल उभारले जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.