वाराणसीहून चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 08th, 08:39 am
उत्तर प्रदेशचे उर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यासाठी आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या उत्कृष्ट कामाचे नेतृत्व करणारे अश्विनी वैष्णव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमात आपल्यासोबत एर्नाकुलम इथून सहभागी झालेले केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकर जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुरेश गोपी जी, जॉर्ज कुरियन जी, केरळमधील या कार्यक्रमात उपस्थित असलेले इतर सर्व मंत्री आणि लोकप्रतिनिधी, फिरोजपूर इथून जोडले गेलेले केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी आणि पंजाबचे नेते रवनीत सिंग बिट्टू जी, तेथे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी, लखनौ इथून जोडले गेलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, इतर मान्यवर आणि काशीतील माझे कुटुंबीय.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीहून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा
November 08th, 08:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. देशाच्या आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि बाबा विश्वनाथांचे पवित्र शहर असलेल्या वाराणसीतील सर्व कुटुंबांना आदरपूर्वक शुभेच्छा दिल्या. देव दिवाळीच्या काळात झालेल्या अद्वितीय उत्सवाचे त्यांनी कौतुक केले आणि आजचा दिवसदेखील एक शुभ प्रसंग असल्याचे सांगितले. विकासाच्या या उत्सवासाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.The World This Week on India
April 22nd, 12:27 pm
From diplomatic phone calls to groundbreaking scientific discoveries, India’s presence on the global stage this week was marked by collaboration, innovation, and cultural pride.पंतप्रधान 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी गुजरात आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर
February 21st, 11:41 am
पंतप्रधान, 22 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, अहमदाबाद येथे, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते दुपारी 12:45 वाजता महेसाणा येथे पोहोचतील आणि वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 1 वाजता, महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे 8,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. पंतप्रधान, दुपारी 4:15 च्या सुमारास नवसारी येथे पोहोचतील. तिथे ते सुमारे 24,700कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ करतील. संध्याकाळी सुमारे 6:15 वाजता, काक्रापार अणुऊर्जा केंद्राला ते भेट देतील.