आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पंतप्रधान हरियाणाला भेट देणार
April 12th, 04:48 pm
आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला भेट देणार आहेत. ते हिसारला जातील आणि सकाळी 10:15 वाजता हिसार ते अयोध्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवतील तसेच हिसार विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. ते एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.