भारत टेक्स 2025 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
February 16th, 04:15 pm
आज, भारत मंडपम्, दुसऱ्या भारत टेक्स प्रदर्शनाच्या आयोजनाचा साक्षीदार होते आहे. त्यामध्ये आपल्या परंपरांसोबतच विकसित भारताच्या संधींचे दर्शन होते आहे. आपण ज्या रोपाचे बीज रोवले, ते आज वटवृक्ष होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, ही देशासाठी नक्कीच समाधानाची बाब आहे. भारत टेक्स आता एक मोठा जागतिक कार्यक्रम बनू पाहातो आहे. यावेळी मूल्य साखळीची संपूर्ण श्रेणी, त्याच्याशी निगडीत 12 समूह एकाच वेळी इथे सहभागी होत आहेत. अक्सेसरीज, कपडे, यंत्रसामग्री, रसायने आणि रंग देखील यामध्ये प्रदर्शित केले जात आहेत. जगभरातले धोरणकर्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योग नेतृत्वासाठी सगहभाग, सहकार्य आणि भागीदारीसाठी, भारत टेक्स हे मजबूत व्यासपीठ होत आहे. या आयोजनासाठी सर्वच भागदारांचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आहेत, या कामाशी निगडीत असलेल्या सर्व लोकांना मनपासून खूप खूप शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत टेक्स 2025 मंचाला केले संबोधित
February 16th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित भारत टेक्स 2025 या वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. आपल्या संबोधनातून त्यांनी भारत टेक्स 2025 या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे स्वागत केले. हे या उपक्रमाचे दुसरे पर्व असून, भारत मंडपम हा यंदाच्या पर्वाचा साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या वारशाचे दर्शन तर घडलेच, आणि त्याच वेळी विकसित भारताच्या भवितव्याची झलकही पाहायला मिळली, आपल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब असल्याची भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. भारत टेक्स आता भव्य स्वरुपातील जागतिक वस्त्रोद्योग सोहळा झाला असल्याच्या शब्दांत पंतप्रधानांनी या उपक्रमाचे महत्व अधोरेखीत केले. मूल्यसाखळीच्या परिघाशी जोडलेल्या सर्व बारा घटकांचे प्रतिनिधी यंदाच्या उपक्रमात सहभागी झाले असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. या उपक्रमाच्या निमित्ताने उपयुक्त पुरक साधने , कपडे, यंत्रसामुग्री, रसायने आणि कापडांसाठीचे रंग या आणि अशा इतर घटकांचे प्रदर्शन भरवले असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारत टेक्स हा उपक्रम जगभरातील धोरणकर्ते, या उद्योग क्षेत्रातील अग्रणी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकरता परस्पर सहकार्य आणि भागिदारी प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने परस्परांसोबत जोडून घेण्यासाठीचा एक मजबूत मंच बनला असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक हितधारकाने केलेल्या प्रयत्नांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.पंतप्रधान 16 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभागी होणार
February 15th, 01:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे होणाऱ्या भारत टेक्स 2025 या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील.