Today's projects will boost energy access, connectivity and create jobs for the youth of Tamil Nadu: PM Modi in Tiruchirappalli
March 11th, 05:45 pm
PM Modi launched several developmental projects worth around ₹5,650 crore in Tiruchirappalli, aimed at bolstering the infrastructure and economy of Tamil Nadu. These initiatives span clean energy, petroleum-related manufacturing and enhanced multi-modal connectivity through highways, railways and rural roads. He dedicated the Indian Oil Corporation’s Lube Blending Plant in Chennai, strengthening the ‘Make in India’ initiative.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, पायाभरणी आणि सुरुवात
March 11th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऐतिहासिक त्रिची शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी परिवर्तनकारी विकास प्रकल्पांच्या मालिकेचा शुभारंभ केला. एकूण पाच हजार सहाशे कोटी रुपये गुंतवणुकीच्या या उपक्रमांमध्ये स्वच्छ ऊर्जा, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन आणि महामार्ग, रेल्वे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांद्वारे विस्तारीत मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, याचा समावेश आहे.पंतप्रधान 11 मार्च रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार
March 09th, 09:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 मार्च 2026 रोजी केरळ आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. दुपारी 1:30 वाजता पंतप्रधान केरळमधील एर्नाकुलम येथे सुमारे 10,800 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि हिरवा झेंडा दाखवतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. त्यानंतर सायंकाळी 5:45वाजता पंतप्रधान तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे सुमारे 5,650 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करतील.पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा
July 17th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे.पंतप्रधान, 12 जुलैला देवघर आणि पाटण्याला देणार भेट
July 09th, 09:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जुलै 2022 रोजी दुपारी 1:15 वाजताच्या सुमाराला देवघर आणि पाटण्याला भेट देणार आहेत. देवघरमध्ये 16,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास पंतप्रधान करतील. त्यानंतर दुपारी 2.40 च्या सुमारास बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बाबा बैद्यनाथ मंदिरात ते दर्शन घेतील आणि पूजा करतील. संध्याकाळी 6 च्या सुमारास, पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी समारंभाच्या समारोप समारंभाला पंतप्रधान संबोधित करतील.पंतप्रधान येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार
February 12th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी 14 तारखेला सकाळी 11 च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.