संयुक्त निवेदन: संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भारत भेट

January 19th, 08:10 pm

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी 19 जानेवारी 2026 रोजी भारताला अधिकृत भेट दिली. महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची गेल्या दहा वर्षांतील ही पाचवी भेट असून संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ही त्यांची तिसरी भेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली येथे भारत मार्टची केली पायाभरणी

February 14th, 03:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी दुबईमध्ये जेबेल अली फ्री ट्रेड झोन येथे डीपी वर्ल्डद्वारे बांधल्या जात असलेल्या भारत मार्टची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 14 फेब्रुवारी 2024 रोजी पायाभरणी केली.