पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण

June 21st, 06:45 am

आदरणीय राज्यपाल आर. एन. रवी जी, उर्जावान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी जी, केंद्र सरकारमधील माझे सहकारी प्रतापराव जाधव जी, मंचावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर, कोलकाता येथे जमलेले सर्व सहभागी, तसेच भारतभरातून आणि जगभरातून या योग उत्सवात सहभागी होणारे सर्वजण आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालच्या कोलकाता मधील 'रेड रोड' येथे 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन

June 21st, 06:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथील 'रेड रोड'वरून 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचे नेतृत्व केले. मोदी हजारो योग साधकांसोबत 'सामायिक योग प्रोटोकॉल' सत्रात सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरातील लोकांना शुभेच्छा देताना मोदी यांनी नमूद केले की, 21 जून हा दिवस जगाच्या अनेक भागांमध्ये वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगच्या माध्यमातून मानवतेचा एक सर्वात मोठा सामूहिक उत्सवाचा दिवसही बनला आहे.

पंतप्रधानांनी रशियाच्या अध्यक्षांचे केले स्वागत

December 05th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे भारतात स्वागत केले आहे.

गीता जयंतीच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

December 01st, 06:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या अवतरणाशी संबंधित 'गीता जयंती'च्या पवित्र दिनानिमित्त देशभरातील सर्व परिवार सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कर्तव्यपूर्तीच्या अमूल्य संदेशांनी सुशोभित या दिव्य ग्रंथाचे भारतीय कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनात अत्यंत विशिष्ट स्थान आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यातील दिव्य श्लोक प्रत्येक पिढीला निःस्वार्थ कर्मासाठी प्रेरणा देत राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.

मन की बात’ हे देशातील लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ : पंतप्रधान मोदी

November 30th, 11:30 am

या महिन्याच्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी संविधान दिन सोहळा, वंदे मातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन, अयोध्येत धर्मध्वजारोहण, आयएनएस 'माहे'चा नौदलात समावेश आणि कुरुक्षेत्र येथे झालेला आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव यासह नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवर प्रकाश टाकला. देशात यंदा झालेले अन्नधान्याचे आणि मधाचे विक्रमी उत्पादन, भारताचे क्रीडा क्षेत्रातील यश, संग्रहालये आणि नैसर्गिक शेती अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनाही त्यांनी स्पर्श केला. पंतप्रधानांनी सर्वांना काशी-तमिळ संगमचा भाग होण्याचेही आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार

November 27th, 12:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबर रोजी कर्नाटक आणि गोव्याला भेट देणार आहेत. सकाळी साडे अकराच्या सुमाराला पंतप्रधान कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठाला भेट देणार आहेत. त्यांनतर ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'सार्ध पंचशतमानोत्सव' सोहळ्यानिमित्त पंतप्रधान दुपारी सव्वा तीनच्या सुमारास येथे भेट देणार आहेत.

पंतप्रधान 25 नोव्हेंबर रोजी कुरुक्षेत्रला देणार भेट

November 24th, 12:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी हरियाणातील कुरुक्षेत्राला भेट देणार आहेत.

नवी दिल्लीत सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानात पंतप्रधानांचे भाषण

November 17th, 08:30 pm

आज आपण सर्वजण अशा एका महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी येथे जमलो आहोत, ज्यांनी भारतीय लोकशाहीमध्ये पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोकचळवळीच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथजी यांनी एक दूरदर्शी म्हणून, एक संस्था निर्माते म्हणून, एक राष्ट्रवादी म्हणून आणि एक माध्यम अग्रणी म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र नाही, तर एक मिशन म्हणून भारतातील लोकांसमोर स्थापित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह, भारताची लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. म्हणूनच 21 व्या शतकातील या कालखंडात जेव्हा भारत विकसित होण्याचा संकल्प घेऊन पुढे जात आहे, तेव्हा रामनाथजी यांची बांधिलकी, त्यांचे प्रयत्न, त्यांची दूरदृष्टी आपल्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. मी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानतो, त्यांनी मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केले, मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमध्ये मांडले आपले विचार

November 17th, 08:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत द इंडियन एक्सप्रेसने आयोजित केलेल्या सहाव्या रामनाथ गोएंका व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. मोदी म्हणाले की, आज आपण अशा एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करण्यासाठी एकत्र जमलो आहोत, ज्यांनी भारतातील लोकशाही, पत्रकारिता, अभिव्यक्ती आणि लोक चळवळींच्या शक्तीला नवी उंची दिली. रामनाथ गोएंका यांनी एक दूरदर्शी, संस्था निर्माते, राष्ट्रवादी आणि माध्यम नेते म्हणून, इंडियन एक्सप्रेस समूहाला केवळ एक वृत्तपत्र म्हणून नव्हे तर एक ध्येय म्हणून भारतातील लोकांमध्ये स्थापित केले. पंतप्रधानांनी नमूद केले की त्यांच्या नेतृत्वाखाली हा समूह भारताच्या लोकशाही मूल्यांचा आणि राष्ट्रीय हितांचा आवाज बनला. 21 व्या शतकाच्या या युगात, भारत विकसित होण्याच्या संकल्पाने पुढे जात असताना, रामनाथ गोएंका यांची वचनबद्धता, प्रयत्न आणि दूरदृष्टी खूप मोठी प्रेरणा स्रोत आहे यावर त्यांनी भर दिला. हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी इंडियन एक्सप्रेस समूहाचे आभार मानले आणि उपस्थित सर्वांचे अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवनच्या उद्घाटन कार्यक्रमात केलेले भाषण

August 06th, 07:00 pm

केंद्रिय मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, इथे उपस्थित असलेले संसद सदस्य, सरकारी कर्मचारी, अन्य मान्यवर आणि बंधु भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला केले संबोधित

August 06th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे कर्तव्य भवन-3 च्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित केले. क्रांतीचा महिना असलेल्या या ऑगस्ट महिन्यात, 15 ऑगस्टच्या आधी आणखी एक ऐतिहासिक घटना जोडली गेली असल्याचे ते म्हणाले. भारत आधुनिक भारताच्या निर्मितीशी संबंधित एकामागोमाग एक महत्त्वाचे यश पाहतो आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. नवी दिल्लीतील कर्तव्य पथ, नवीन संसद भवन, संरक्षण कार्यालयाचे नवीन संकुल, भारत मंडपम, यशोभूमी, शहीदांना समर्पित राष्ट्रीय युद्ध स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, आणि आता कर्तव्य भवन अशा अलीकडील महत्वाच्या पायाभूत सुविधांचा त्यांनी उल्लेख केला. या केवळ नवीन इमारती किंवा नेहमीच्या पायाभूत सुविधा नाहीत, असे पंतप्रधान म्हणाले. अमृत काळात, विकसित भारताला आकार देणारी धोरणे याच वास्तुंमध्ये आखली जातील आणि येणाऱ्या दशकात देशाची वाटचाल या संस्थांमधूनच निश्चित होईल, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी कर्तव्य भवनाच्या उद्घाटनाबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि या वास्तूच्या उभारणीत सहभागी असलेल्या अभियंत्यांचे आणि श्रमजीवींचे आभारही मानले.

युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राच्या समावेशाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

April 18th, 10:43 am

युनेस्कोच्या जागतिक स्मरण पुस्तिकेत गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश होणे म्हणजे आपल्या कालातीत विद्वत्तेला आणि समृद्ध संस्कृतीला मिळालेली जगन्मान्यता आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समावेशाची प्रशंसा केली आहे.

नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

February 21st, 05:00 pm

संमेलनामध्ये उपस्थित ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सर्व सदस्य आणि मराठी भाषेचे सर्व विद्वत्तजन आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

February 21st, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या या भव्य सोहोळ्यात सर्व मराठी भाषिकांचे स्वागत केले. ते म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणतीही भाषा अथवा प्रदेशापुरते सीमित नाही. ते पुढे म्हणाले की या संमेलनात महाराष्ट्र आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे सार तसेच सांस्कृतिक वारसा अंतर्भूत आहे.

तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 11th, 02:00 pm

आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन

December 11th, 01:30 pm

महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा.

December 11th, 10:24 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गीता जयंतीनिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी जोनास मसेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली; वेदांत आणि गीता यात त्यांना असलेल्या रुची बद्दल केले कौतुक

November 20th, 07:54 am

वेदांत आणि गीता याविषयी असलेल्या रुचीबाबत जोनास मासेट्टी यांचे कौतुक करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असे नमूद केले की भारतीय संस्कृती जगभरात जो प्रभाव पाडत आहे ते कौतुकास्पद आहे. संस्कृतमधील रामायणाचे जोनास मासेट्टी आणि त्यांच्या सहकार्याने केलेले सादरीकरण पाहून पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली.

मुंबईतल्‍या 'अभिजात मराठी भाषा' कार्यक्रमात पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

October 05th, 07:05 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजित पवार जी, माझे केंद्रातील सर्व सहकारी, अनेक पिढ्यांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या आशाताई जी. अभिनेते बंधू सचिन जी, नामदेव कांबळे जी, सदानंद मोरे जी, महाराष्ट्र सरकारचे मंत्री बंधू दीपक जी, मंगलप्रभात लोढा जी, भाजपा मुंबई अध्यक्ष बंधू आशिष जी, इतर मान्यवर बंधू आणि भगिनी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात मुंबई येथे अभिजात मराठी भाषा कार्यक्रमात सहभाग

October 05th, 07:00 pm

मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारने मराठी भाषेला अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा क्षण महत्वाचा असून, हे मराठी भाषेच्या इतिहासातील सोन्याचे पान असल्याचे ते म्हणाले. मराठी भाषिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित आकांक्षा पूर्ण झाल्या असून, महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले आणि या ऐतिहासिक कामगिरीचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आल्याचे सांगून, पंतप्रधानांनी या भाषांशी संबंधित जनतेचे अभिनंदन केले. मराठी भाषेचा इतिहास खूप समृद्ध आहे आणि या भाषेतून निर्माण झालेल्या ज्ञानाच्या प्रवाहांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि आजही ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत, असे पंतप्रधानांनी विशेष नमूद केले. ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी लोकांना वेदांमधील ज्ञानाशी जोडले आणि ज्ञानेश्वरीने गीतेचा बोध लोकांपर्यंत पोहोचवून भारताचे आध्यात्मिक ज्ञान पुन्हा जागे केले.