जी-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांची ब्रिटनच्या पंतप्रधानांशी भेट

June 17th, 12:36 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फ्रान्स मधील एवियान शहरात सुरु असलेल्या जी-7 परिषदेच्या निमित्ताने, आज ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली.

आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्रात पंतप्रधानांनी घेतली श्री श्री रवीशंकर यांची भेट

May 10th, 07:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांची भेट घेतली. मोदी यांनी श्री श्री रवीशंकर यांच्याशी विविध विषयांवर, विशेषतः आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने सुरू असलेल्या कार्याबद्दल अत्यंत सखोल चर्चा झाली असे सांगितले. सामाजिक हिताला प्रोत्साहन देण्याविषयी असलेली श्री श्री रविशंकर यांच्या तळमळीचे कौतुक केले आणि संस्थेने आपल्या विविध उपक्रमांद्वारे समाजाची सेवा करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची दखल घेतली.

बंगळुरू येथील 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांच्या संबोधनाचा मूळ मजकूर

May 10th, 11:05 am

आजची ही सकाळ एक वेगळीच अनुभूती घेऊन आली आहे. मुलांच्या वैदिक मंत्रांनी झालेले स्वागत, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जींची 70 वर्षे आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'ची 45 वर्षे; हे असे क्षण आहेत जे माझ्या स्मरणात कायम राहतील. या अद्भुत सोहळ्यात मला आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी

May 10th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक मधील बंगळुरू इथे आयोजित द आर्ट ऑफ लिविंगच्या 45 व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी झाले. हा सोहळा म्हणजे मंगलमय प्रसंग असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. सोहळ्याच्या आजच्या दिवशी सकाळी मुलांनी गायलेले वैदिक मंत्र, भगवान श्री गणेशाचे दर्शन, श्री श्री रविशंकर जी यांचे 70 वे वर्ष आणि आर्ट ऑफ लिविंगच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन, अशा अनेक सुखद घडामोडींमुळे आजची सकाळ समृद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे क्षण सदैव आपल्या स्मरणात राहतील अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसच्या सत्तेच्या पुस्तकात सुशासनाचा कोणताही धडा नाही: बंगळुरूंमध्ये पंतप्रधान मोदी

May 10th, 09:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.

पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील बंगळूर येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले.

May 10th, 09:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बंगळुरू, कर्नाटक येथे एका भव्य जाहीर सभेला संबोधित केले आणि दक्षिण भारतात भाजपला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याचे कौतुक केले, तसेच देशातील जनता अस्थिरता आणि घोटाळ्यांऐवजी 'स्थिरता, गती आणि उपाय' निवडत असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की आज बंगळुरूच्या भूमीवरून भगवा सूर्य उगवला आहे.

पंतप्रधान 10 मे रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार

May 09th, 11:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे 2026 रोजी कर्नाटक आणि तेलंगणाला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी साधारण 11 वाजता बंगळूरु येथे 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या 45 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी होतील आणि याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. त्यानंतर पंतप्रधान हैदराबादला रवाना होतील आणि दुपारी 3 च्या सुमारास ते, अंदाजे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करतील. याप्रसंगीही ते उपस्थितांना संबोधित करतील. दुपारी 3:45 वाजता पंतप्रधान हैदराबादमधील सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील.

Prime Minister condoles the loss of lives due to the wall collapse in Bengaluru, Karnataka

April 29th, 11:22 pm

Prime Minister Shri Narendra Modi has expressed deep grief over the unfortunate mishap due to the collapse of a wall in Bengaluru, Karnataka.

Tiruchirappalli turns out in huge numbers for PM Modi’s public meeting

March 11th, 06:00 pm

At a massive public meeting in Tamil Nadu’s Tiruchirappalli, Prime Minister Narendra Modi hailed Tiruchirappalli as a land of courage and faith, recalling the bravery of the Marudu Brothers and paying tribute to Major M. Saravanan for his sacrifice during the Kargil War. “Trichy is a land of courage and faith,” he said, adding that the Centre proudly honours Tamil Nadu’s culture and heritage. He also highlighted that C. P. Radhakrishnan, a son of the state, serves as the Vice President of India.

भारत-कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदेतील पंतप्रधानांच्या सीईओ फोरम मधील भाषणाचा मजकूर

March 02nd, 02:30 pm

आज आपण भारत-कॅनडा संबंधांमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहोत. पंतप्रधान कार्नी यांचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, परंतु आपल्या संबंधांनी जणू एका प्रकाशवर्षाची झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत विश्वास वाढला आहे, स्पष्टता आली आहे आणि नवीन गती निर्माण झाली आहे. हे सर्व त्या काळात घडत आहे, जेव्हा जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे आणि जागतिक आर्थिक व्यवस्था दबावाखाली आहे. अशा वेळी भारत आणि कॅनडातील व्यावसायिक नेत्यांचे हे चिंतन आपल्या भागीदारीचा नवीन आराखडा तयार करेल. आपणा सर्वांच्या दृष्टीकोन आणि बांधिलकीचे मी अभिनंदन करतो.

तामिळनाडूच्या मदुराई येथे विविध पायाभूत सुविधांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 01st, 03:30 pm

मी पवित्र आणि ऐतिहासिक शहर मदुराईमध्ये येऊन सन्मानित झाल्याचा अनुभव घेत आहे. मी मीनाक्षी अम्मन आणि भगवान सुंदरेश्वर यांना नमन करतो. आजचा कार्यक्रम तामिळनाडूच्या विकास यात्रेतील एका गौरवपूर्ण अध्यायाचे प्रतीक आहे. आम्ही 4,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन केले आणि ते राष्ट्राला समर्पित केले आहेत. हे प्रकल्प संपर्कव्यवस्थेत बदल घडवून आणतील, अर्थव्यवस्थेला चालना देतील, रोजगार निर्माण करतील आणि लाखो लोकांचे जीवन बदलून टाकतील. यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळेल आणि तीर्थयात्री व पर्यटकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच व्यवसायांसाठी जलद वाहतुकीची सोय होईल. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे लोकांना सक्षम बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदुराईमध्ये रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण तसेच भूमिपूजन

March 01st, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील मदुराई येथे रु. 4,400 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पवित्र मदुराई नगरीत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस तामिळनाडूच्या विकास प्रवासातील अभिमानास्पद अध्याय आहे. हे प्रकल्प संपर्क व्यवस्थेचा आमूलाग्र बदल, अर्थव्यवस्थेला चालना आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यासोबतच राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवतील.

पुद्दुचेरीमधील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

March 01st, 12:00 pm

पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी मनसुख मांडवीय, पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन, सभापती आर. सेल्वम, गृहमंत्री ए. नमस्सिवायम, इतर नेते, पुद्दुचेरीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, वणक्कम्!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुद्दुचेरीमध्ये 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली

March 01st, 11:45 am

यावेळी आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, पुद्दुचेरी ही सिद्ध, संत, कवी आणि स्वातंत्र्यसैनिकांची भूमी आहे, जिथे महाकवी सुब्रमण्य भारती यांनी राष्ट्रवादाची ज्योत पेटवली आणि श्री अरविंद व माताजींनी जगाला आध्यात्मिक दृष्टी प्रदान केली.

पहिल्या मतदानापासून ते स्टार्टअप इंडियापर्यंत, मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केली भारतातील तरुणांचे कौतुक

January 25th, 11:30 am

राष्ट्रीय मतदार दिनी प्रसारित झालेल्या या वर्षीच्या पहिल्या मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येकाचे कौतुक केले. त्यांनी स्टार्टअप्स, जलसंवर्धन, गुणवत्ता, संस्कृती आणि उत्सव आणि स्वच्छता यासारख्या प्रमुख विषयांवरही प्रकाश टाकला. पुढील महिन्यात होणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जगभरातील तज्ञ सहभागी होणार असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

Prime Minister Congratulates Shri S. Suresh Kumar Ji on Inspiring Cycling Feat

January 01st, 10:01 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today lauded the remarkable achievement of Shri S. Suresh Kumar Ji, who successfully cycled from Bengaluru to Kanniyakumari.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (127 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

October 26th, 11:30 am

अशा कठीण काळात सुमारे वीस वर्षांचा एक युवक या अन्यायाविरुद्ध उभा राहिला. आज मी या तरुणाबद्दल एका खास कारणासाठी चर्चा करत आहे. त्याचे नाव उघड करण्यापूर्वी मी तुम्हाला त्याच्या शौर्याबद्दल सांगेन. मित्रांनो, त्या काळात जेव्हा निजामाविरुद्ध एकही शब्द बोलणे गुन्हा मानले जात असे, तेव्हा या तरुणाने सिद्दीकी नावाच्या निजामाच्या अधिकाऱ्याला उघडपणे आव्हान दिले. निजामाने सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचं पीक जप्त करण्यासाठी पाठवलं होते. परंतु अत्याचाराविरुद्धच्या या संघर्षात त्या तरुणानं सिद्दीकीची हत्या केली. तो अटकेपासून स्वतः ला वाचवण्यातही यशस्वी झाला. निजामाच्या जुलमी पोलिसांपासून सुटका करून घेऊन तो तरुण शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आसाममध्ये पोहोचला.

पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेले भाषण

September 21st, 06:09 pm

उद्यापासून शक्तीच्या उपासनेचा उत्सव अर्थात नवरात्र सुरू होत आहे. तुम्हा सर्वांना अनेकानेक शुभेच्छा! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आपला देश आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल टाकत आहे. उद्या, २२ सप्टेंबर रोजी, नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा सूर्य उगवताच पुढील टप्प्यातल्या जीएसटी सुधारणा लागू होतील. एका अर्थाने उद्यापासून देशात जीएसटी बचत महोत्सवाला सुरुवात होत आहे. या जीएसटी बचत महोत्सवामुळे तुमची बचत वाढेल आणि तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू अधिक सहजपणे खरेदी करू शकाल. आपल्या देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नव-मध्यमवर्गीय, युवा, शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी, उद्योजक या सर्वांना या बचत महोत्सवाचा मोठा फायदा होईल. याचा अर्थ असा की या उत्सवाच्या काळात प्रत्येकाला काहीतरी गोड खाण्यास मिळेल आणि देशातील प्रत्येक कुटुंबात आनंद वाढेल. पुढील टप्प्यातल्या या जीएसटी सुधारणा आणि बचत महोत्सवाबद्दल मी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. या सुधारणांमुळे भारताच्या विकासगाथेला वेग लाभेल, , व्यवसाय सुलभ होईल, गुंतवणूक अधिक आकर्षक होईल आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्य समान भागीदार होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केले संबोधित

September 21st, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाला संबोधित केले. शक्तीच्या उपासनेचे पर्व असलेल्या नवरात्रीच्या प्रारंभानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देत ते म्हणाले की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच देश आत्मनिर्भर भारत अभियानासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. 22 सप्टेंबर रोजी सूर्योदयाबरोबरच देशात नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांची अंमलबजावणी होईल. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की एका प्रकारे संपूर्ण भारतात जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात होत आहे. या उत्सवामुळे बचत वाढेल आणि लोकांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करणे सुलभ होईल यावर त्यांनी भर दिला. या बचत महोत्सवाचे लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय, युवक , शेतकरी, महिला, दुकानदार, व्यापारी आणि उद्योजकांपर्यंत पोहोचतील असे मोदी यांनी नमूद केले. या उत्सवाच्या काळात प्रत्येक घरामध्ये आनंद आणि गोडवा वाढेल असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी देशभरातील कोट्यवधी कुटुंबांना नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणा आणि जीएसटी बचत महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. या सुधारणा भारताच्या विकासगाथेला गती देतील, व्यवसाय सुलभ करतील, गुंतवणूक अधिक आकर्षक बनवतील आणि विकासाच्या शर्यतीत प्रत्येक राज्याला समान भागीदार बनवेल असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेंगलुरू येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन करताना केलेले भाषण

August 10th, 01:30 pm

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिध्दरमैया, केंद्रातील माझे सहकारी मनोहरलाल खट्टर, एच डी कुमारस्वामी, अश्विनी वैष्णव, व्ही सोमण्णा, शोभा जी, उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार, कर्नाटक सरकारचे मंत्री बी. सुरेश, विरोधी पक्षनेते आर अशोक, खासदार तेजस्वी सूर्या, डॉक्टर मंजूनाथ, आमदार विजयेंद्र येडियुरप्पा, आणि कर्नाटकमधील माझ्या बंधू, भगिनींनो,