पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्तर पंडुम या महोत्सवाच्या विशेष सोहळ्याबद्दल छत्तीसगडच्या नागरिकांचे अभिनंदन केले

February 10th, 10:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या बस्तर पंडुम या महोत्सवाच्या विशेष सोहळ्याबद्दल छत्तीसगडच्या नागरिकांचे अभिनंदन केले. या महोत्सवादरम्यान बस्तर इथल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि आदिवासी वारशाचे अदभुतरम्य दर्शन घडले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सांस्कृतिक वारसा जपण्यात आणि स्थानिक समुदायांना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जाते असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.