बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार बर्ट डी वेव्हर यांनी स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

February 04th, 09:00 am

महामहीम बर्ट डी वेव्हर यांनी बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि बेल्जियम मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.