बार्बाडोसमधील निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांचे केले अभिनंदन
February 13th, 12:17 pm
बार्बाडोसमधील निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मिया अमोर मॉटली यांचे अभिनंदन केले आहे. बार्बाडोससोबतच्या आपल्या दीर्घकालीन मैत्रीचा भारताला आदर आहे, सहकार्यविषयक विविध क्षेत्रांमध्ये ही मैत्री अधिक विस्तारत आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी नमूद केले आहे. 2024 मधील भारत कॅरीकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत झालेली भेट मला आठवते. दोन्ही देशांतील जनतेच्या हितासाठी आपली भागीदारी अधिक दृढ करण्याकरता त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली
March 07th, 10:02 am
‘ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस’ या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोस सरकार आणि तेथील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार 1.4 अब्ज भारतीय तसेच भारत आणि बार्बाडोस यांच्यातील दृढ संबंधांना समर्पित केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 09:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया अमोर मोटली यांची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे भारत-CARICOM शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. या उच्च-स्तरीय भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि बार्बाडोस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना दुजोरा दिला आणि मजबूत करण्यासाठी संमती दर्शवली.