भगवान बुद्ध यांच्याशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद

January 03rd, 12:00 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, किरण रिजिजू जी, रामदास आठवले जी, राव इंद्रजीत जी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होता, त्यांना निघावे लागले आणि दिल्लीचे सर्व मंत्री सहकारी, दिल्लीचे नायब राज्यपाल सक्सेना जी, महामहीम, राजनैतिक समुदायाचे सर्व माननीय सदस्य, बौद्ध विद्वान, धम्माचे अनुयायी, भगिनी आणि बंधुंनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन

January 03rd, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राय पिथोरा सांस्कृतिक संकुलात, ‘द लाईट अँड द लोटस: रेलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ (प्रकाश आणि कमळ: प्रबुद्धाचे अवशेष) असे शीर्षक असणाऱ्या, भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सव्वाशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताचा वारसा परत आला आहे, भारताचा ठेवा परत आला आहे, असे या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. आजपासून भारतातील लोकांना भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष पाहता येतील आणि त्यांचे आशीर्वाद घेता येतील, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी या पावन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. बौद्ध परंपरेशी संबंधित भिक्खू आणि धर्माचार्य देखील यावेळी उपस्थित असल्याचे त्यांनी नमूद केले आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. भिक्खू आणि धर्माचार्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीला होणारा हा मंगल सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने 2026 हे वर्ष जगासाठी शांतता, समृद्धी आणि सलोख्याचा नवा अध्याय घेऊन येवो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी भूषवले ‘प्रगती’च्या 50 व्या बैठकीचे अध्यक्षपद

December 31st, 08:11 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'प्रगती' च्या 50 व्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. सक्रिय सुशासन आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानावर आधारित हे बहु-स्तरीय व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सहकार्यात्मक आणि परिणाम-केंद्रित प्रशासनाच्या दशकाच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तंत्रज्ञानावर आधारित नेतृत्व, थेट देखरेख आणि केंद्र-राज्य यांच्यातील निरंतर सहकार्याने कशा प्रकारे राष्ट्रीय प्राधान्यक्रमांना प्रत्यक्ष मोजता येण्याजोग्या परिणामांमध्ये रूपांतरित केले आहे, हे या टप्प्यावरून अधोरेखित होते.

'विकसित भारत'चा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

December 28th, 11:30 am

2025 मध्ये भारताने राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा आणि जागतिक व्यासपीठांवर आपला ठसा उमटवल्याचे पंतप्रधान मोदी मन की बातच्या या वर्षातील शेवटच्या भागात म्हणाले. 2026 मध्ये देश नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासही सज्ज असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, क्विझ स्पर्धा, स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2025 आणि फिट इंडिया चळवळ यासारख्या युवा-केंद्रित उपक्रमांवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

Prime Minister Narendra Modi to visit Jammu and Kashmir

June 04th, 12:37 pm

PM Modi will visit Jammu and Kashmir on 6th June to inaugurate the Chenab bridge and Anji bridge. He will also launch multiple development projects worth over Rs 46,000 crore at Katra and flag off two Vande Bharat Express trains. He will lay the foundation stone of Shri Mata Vaishno Devi Institute of Medical Excellence in Katra contributing to the healthcare infrastructure in the region.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 13th, 12:30 pm

नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितिन गडकरी जी, जितेंद्र सिंह जी, अजय टम्टा जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार चौधरी जी, विरोधी पक्षनेता सुनील शर्मा जी, सर्व खासदार, आमदार आणि जम्मू-कश्मीर च्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन

January 13th, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी जम्मू-काश्मीर आणि भारताच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या आणि आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या मजुरांचे आभार मानले. मोदी म्हणाले, आव्हाने असूनही आपला संकल्प डगमगला नाही. त्यांनी मजुरांच्या दृढ निर्धार आणि बांधिलकीचे तसेच काम पूर्ण करताना आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. 7 मजुरांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे करणार उद्घाटन आणि पायाभरणी

January 05th, 06:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(भाग 102) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 18th, 11:30 am

मित्रांनो, खूप लोकं सांगतात की, पंतप्रधान म्हणून मी अमुक एक चांगले काम केले आहे, एखादे मोठे काम केले आहे. ‘मन की बात’ चे कित्येक श्रोते पत्र लिहून खूप कौतुक करतात. कोणी म्हणतात हे केले, कोणी म्हणते ते काम केले, हे चांगले केले, हे अधिक चंगले केले, हे उत्कृष्ट केले परंतु, जेव्हा मी भारतातील सामान्य नागरिकांचे प्रयत्न, त्यांचे परिश्रम, त्यांची इच्छाशक्ती बघतो तेव्हा मी भारावून जातो. कोणतेही मोठे ध्येय असो, कठीणातील कठीण आव्हान असू दे, भारतीय जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक आव्हानावर तोडगा शोधून काढते. दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिमेकडे किती मोठे चक्रीवादळ आले हे आपण सगळ्यांनीच पाहिले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस. बिपरजॉय ने कच्छमध्ये किती मोठे नुकसान केले, परंतु कच्छ मधील लोकांनी हिंमतीने आणि सतर्कतेने इतक्या धोकादायक चक्रीवादळाचा सामना केला हे खूपच अभूतपूर्व आहे. दोन दिवसांनी कच्छ मधील लोकं, त्यांचे नवीन वर्ष अर्थात आषाढ बीज साजरे करणार आहेत. आषाढ बीज, कच्छ मध्ये पावसाच्या आगमनाचे प्रतिक मानले जाते हा देखील एक संयोगच आहे. मी इतकी वर्षे कच्छला येत-जातो, तिथल्या लोकांची सेवा करण्याचे भाग्यही मला लाभले आहे आणि म्हणूनच मला कच्छच्या लोकांची हिंमत आणि उपजीविकेविषयी माहिती आहे. दोन दशकांपूर्वी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर हा कच्छ पुन्हा कधीच सावरणार नाही, असे म्हंटले जायचे, तोच जिल्हा आज देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे कच्छमधील लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसातून देखील त्याच वेगाने बाहेर पडतील.

दुरध्वनीद्वारे पंतप्रधानांना उरी दहशतवादी हल्ल्याचा शोक संदेश

September 20th, 04:37 pm

President Ashraf Ghani of Afghanistan spoke on telephone today with Prime Minister Shri Narendra Modi to condole the terror attack in Uri, Jammu & Kashmir. President Ghani strongly condemned the cross-border terror attack and conveyed Afghanistan’s solidarity and support with India against all actions to eliminate the threat of terrorism.

पंतप्रधानांकडून उरीमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

September 18th, 02:15 pm

Prime Minister Narendra Modi strongly condemned the terror attack in Uri, Jammu and Kashmir. The PM said, We strongly condemn the cowardly terror attack in Uri. : assure the nation that those behind this despicable attack will not go unpunished.