महाराष्ट्रात बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले.
January 28th, 11:22 am
महाराष्ट्रात बारामती येथील दुर्दैवी विमान दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या विमान अपघातात प्राण गमावलेल्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. या अत्यंत दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबांना सामर्थ्य आणि धैर्य मिळो, यासाठी मी प्रार्थना करतो. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.