पंतप्रधान येत्या 26 सप्टेंबर रोजी बिहारमधील मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा करणार शुभारंभ

September 25th, 06:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करतील. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान बिहारमधील 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये थेट हस्तांतरित करतील, अशा प्रकारे एकूण 7,500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

August 23rd, 10:10 pm

येथे जागतिक परिस्थिती, भू-अर्थशास्त्र यावर सविस्तर चर्चा झाली आहे आणि जेव्हा आपण जागतिक संदर्भात पाहतो तेव्हा आपल्याला भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद लक्षात येते. आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. तज्ज्ञ म्हणत आहेत की जागतिक विकासात भारताचे योगदान लवकरच सुमारे 20 टक्के असणार आहे. ही वाढ, ही लवचिकता, जी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेत पाहत आहोत, ती गेल्या दशकात भारताने मिळवलेल्या स्थूल-आर्थिक स्थिरतेमुळे आहे. आज आपली राजकोषीय तूट 4.4% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. आणि हे असे घडत आहे जेव्हा आपण कोविडच्या इतक्या मोठ्या संकटाचा सामना केला आहे. आज आपल्या कंपन्या भांडवली बाजारातून विक्रमी निधी उभारत आहेत. आज आपल्या बँका पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महागाई खूप कमी आहे, व्याजदर कमी आहेत. आज आपली चालू खात्यातील तूट नियंत्रणात आहे. परकीय चलन साठा देखील खूप मजबूत आहे. इतकेच नाही तर दरमहा लाखो देशांतर्गत गुंतवणूकदार एस.आय.पी. द्वारे बाजारात हजारो कोटी रुपये गुंतवत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला केले संबोधित

August 23rd, 05:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरमला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड लीडर्स फोरमसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागतही केले. हा उपक्रम अतिशय योग्य वेळी आयोजित केला असल्याचेही त्यांनी नमूद केले, आणि त्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांची प्रशंसाही केली. मागच्या आठवड्यातच आपण लाल किल्ल्यावरून पुढच्या पिढीच्या सुधारणांबद्दल (नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स) भाषण केले होते आणि हा मंच त्याच भावनेला अधिक बळ देत आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या TV9 शिखर परिषद 2025 मधील भाषणाचा मराठी अनुवाद

March 28th, 08:00 pm

श्रीयुत रामेश्वर गारू जी, रामू जी, बरुण दास जी, TV9 ची संपूर्ण टीम, मी आपल्या नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांचे, इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो, या शिखर परिषदेसाठी अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 शिखर परिषदेत केले भाषण

March 28th, 06:53 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित टीव्ही 9 शिखर परिषदेत भाग घेतला. या परिषदेमध्‍ये संबोधित करताना त्यांनी टीव्ही9च्या संपूर्ण टीमला आणि त्याच्या प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, टीव्ही9 चा विस्तृत प्रादेशिक प्रेक्षकवर्ग आहे आणि आता जागतिक प्रेक्षकवर्गही तयार होत आहे. त्यांनी या कार्यक्रमात दूरदृश्‍य प्रणालीद्वारे जोडलेल्या परदेशस्थ भारतीयांचेही स्वागत केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अल्प मूल्याच्या भीम-यूपीआय व्यवहारांना(पी2एम) चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

March 19th, 04:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अल्प मूल्याच्या भीम-यूपीआय व्यक्ती ते व्यापारी (पी2एम ) व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रोत्साहन योजनेला आज खालील स्वरुपात मंजुरी दिली.

कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 28th, 01:49 pm

उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीप पुरी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, साध्वी निरंजन ज्योती, भानुप्रताप वर्मा, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री सतीश महाना, नीलिमा कटियार, रणवेंद्र प्रताप, लखन सिंह, अजीत पाल, इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय खासदार, सर्व आदरणीय आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! ऋषी आणि मुनींचे तपस्थान, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतीकारकांचे प्रेरणा स्थान, स्वतंत्र भारतामध्ये औद्योगिक सामर्थ्याला शक्ती-ऊर्जा देणा-या कानपूरला माझे शत-शत प्रणाम! ज्या शहराने पंडित दीनदयाळ उपाध्याय, सुंदरसिंह भंडारी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या महान द्रष्ट्या नेत्यांचे नेतृत्व तयार करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ते कानपूर हे शहर आहे. आणि आज फक्त कानपूरला आनंद होतो आहे असे नाही, कार वरूणदेवालाही या आनंदामध्ये सहभागी होण्याची इच्छा झाली आहे.

कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले उद्घाटन

December 28th, 01:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर पर्यंत मेट्रोने प्रवासही केला. बिना-पानकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचेही त्यांनी उद्घाटन केले. मध्य प्रदेशातल्या बिना तेल शुद्धीकरण कारखान्यापासून कानपूरमधल्या पानकी पर्यंतच्या या प्रकल्पामुळे बीना तेल शुद्धीकरण कारखान्यातली उत्पादने या प्रदेशासाठी सहजसाध्य राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अखिल भारतीय महापौर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 17th, 05:32 pm

कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री- जनता जनार्दनासाठी उपयोगी कार्य करणारे योगी आदित्यनाथ, मंत्रिमंडळातले माझे सहकारी हरदीपसिंह पुरी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आशुतोष टंडन, नीलकंठ तिवारी, अखिल भारतीय महापौर मंडळाचे अध्यक्ष नवीन जैन, काशीमध्ये उपस्थित असलेले आणि देशाच्या काना-कोप-यातून जोडले गेलेले आपण सर्व महापौर सहकारी मंडळी, आणि इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे केले उद्घाटन

December 17th, 10:09 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अखिल भारतीय महापौर परिषदेचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते.

बँक ठेव विमा कार्यक्रमात उद्या पंतप्रधान ठेवीदारांना संबोधित करणार

December 11th, 09:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान भवनात 12 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता “डिपॉझिटर्स फर्स्ट: गॅरंटिड टाइम-बाउंड डिपॉझिट इन्शुरन्स पेमेंट अपटू रुपीस 5 लाख” (ठेवीदार प्रथम : पाच लाख रुपयांपर्यंत कालनिर्धारित ठेवी विमा भरणा हमी) या कार्यक्रमाला संबोधित करतील.

सुविहित पत प्रवाह आणि आर्थिक वाढीसाठी समन्वय निर्माण करण्यासंदर्भातील परिषदेत पंतप्रधानांचे भाषण

November 18th, 12:31 pm

देशाच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी, वित्त राज्यमंत्री श्री पंकज चौधरीजी, डॉ. भागवत कराडजी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दासजी, बँकिंग क्षेत्रातील सर्व दिग्गज, भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्व आदरणीय सहकारी, कार्यक्रमाशी संबंधित इतर सर्व मान्यवर आणि येथे उपस्थित सभ्य स्त्री-पुरूषहो,

‘निर्वेध पतपुरवठा आणि आर्थिक वृद्धीसाठी एकत्रित उर्जा निर्माण करणे’या विषयावरील परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण

November 18th, 12:30 pm

‘निर्वेध पतपुरवठा आणि आर्थिक वाढ होण्यासाठी एकत्रित उर्जा निर्माण करणे’ विषयावरील परिषदेच्या समारोप कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भाषण झाले.

पंतप्रधान 18 नोव्हेंबर रोजी ‘अखंड पत प्रवाह आणि आर्थिक वाढीसाठी समन्वय निर्माण’ या विषयावरील परिषदेला करणार संबोधित

November 18th, 12:10 pm

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 18 नोव्हेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथील अशोक हॉटेलमध्ये दुपारी 12 वाजता ‘अखंड पत प्रवाह आणि आर्थिक वाढीसाठी समन्वय निर्माण’ या विषयावरील परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करतील.

पंतप्रधानांनी पहिल्या लेखापरीक्षण दिवस समारंभ कार्यक्रमाला संबोधित केले

November 16th, 12:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या लेखापरीक्षण दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.

देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेले संबोधन

August 15th, 02:49 pm

स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र प्रसंगी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे भारतमातेच्या लाखो मुलामुलींचे त्याग, बलिदान, आणि भारतमातेला स्वतंत्र बनवण्याप्रती त्यांचा संकल्प, अशा सर्व आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे, स्वातंत्र्यवीरांचे, नरवीरांना, शहीदांना वंदन करण्याचे हे पर्व आहे. आपले सैन्यातील शूर जवान, निमलष्करी जवान, पोलीस, सुरक्षा दलाशी संबंधित प्रत्येकजण, भारतमातेच्या रक्षणात सामान्य माणसांच्या सुरक्षेसाठी काम करत असतात, आज त्या सर्वांना हृदयपूर्वक, आदरपूर्वक स्मरण करण्याचा, त्यांच्या महान त्याग तपस्येला वंदन करण्याचे पर्व आहे.

74 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण

August 15th, 02:38 pm

माझ्या प्रिय देशबांधवांनो ,स्वातंत्र्यदिनाच्या या मंगल प्रसंगी मी सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

India celebrates 74th Independence Day

August 15th, 07:11 am

Prime Minister Narendra Modi addressed the nation on the occasion of 74th Independence Day. PM Modi said that 130 crore countrymen should pledge to become self-reliant. He said that it is not just a word but a mantra for 130 crore Indians. “Like every young adult in an Indian family is asked to be self-dependent, India as nation has embarked on the journey to be Aatmanirbhar”, said the PM.

No matter how much the ‘Mahamilawati’ groups come together, the Chowkidaar is going to stay alert of their corrupt actions: PM

February 08th, 01:02 pm

Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Raigarh, Chhattisgarh today.

PM Modi addresses public meeting in Raigarh, Chhattisgarh

February 08th, 01:01 pm

Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Raigarh, Chhattisgarh today.