Prime Minister wishes speedy recovery to Begum Khaleda Zia

December 01st, 10:30 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed his deep concern about the health of Begum Khaleda Zia, who has contributed to Bangladesh’s public life for many years and wished speedy recovery to her. Shri Modi stated that India stands ready to extend all possible support, in whatever way we can.

ढाका येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

July 21st, 07:07 pm

ढाका येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अनेक तरुण विद्यार्थ्यांसह कित्येक जण मृत्युमुखी पडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले. या प्रसंगी भारत बांगलादेशासोबत एकजुटीने उभा आहे आणि सर्व प्रकारचा पाठींबा आणि मदत देण्यासाठी तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बिमस्टेक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांची घेतली भेट

April 04th, 03:49 pm

बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मुहम्मद युनूस यांची भेट घेतली.

पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार

April 02nd, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.

पंतप्रधानांची श्री श्री हरिचंद ठाकूर यांना जयंतीदिनी आदरांजली

March 27th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री श्री हरिचंद ठाकूर यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे. ठाकूर यांनी उपेक्षितांच्या कल्याणासाठी व समता, बंधुता आणि न्याय यांच्या प्रसारासाठी केलेल्या कामाची प्रशंसा करुन मोदी यांनी 2025 च्या मातुआ धर्म महामेळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी घडवून आणली MEGA भारत-अमेरिका भागीदारी

February 14th, 06:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अमेरिकेला दिलेली भेट ही दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ होत असल्याचे प्रतिबिंबित करणारा एक महत्त्वाचा प्रसंग होता. त्यांच्या मुक्कामात, पंतप्रधान मोदींनी संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि मुत्सेद्दीगिरी यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भात, अमेरिकेतील नेते, व्यापारी आणि भारतीय समुदायातील यांच्याशी हाय-प्रोफाइल गाठीभेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या. या भेटीने भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत संबंधांवर शिक्कामोर्तब झाले तसेच नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देण्यात दोन्ही देशांची जागतिक भागीदार म्हणून प्रतिमा निर्माण झाली .

भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.

January 14th, 10:45 am

केंद्रीय मंत्री मंडळातील माझे सोबती डॉ. जितेंद्र सिंह जी, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिव प्रोफेसर सेलेस्ते साउलो जी, परदेशातून आलेले आपले विशेष अतिथी गण, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन जी, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा जी, इतर महानुभाव, सर्व वैज्ञानिक आणि विविध विभाग तसेच संस्थांचे अधिकारी, बंधू आणि भगिनींनो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभाला केले संबोधित

January 14th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मधील भारत मंडपम येथे भारतीय हवामान विभागाच्या 150 व्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी साधला संवाद.

August 26th, 10:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडन यांच्याशी दूरध्वनी संवाद साधला.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार प्रा. मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद

August 16th, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार प्रा.मोहम्मद युनूस यांच्यात आज दूरध्वनीद्वारे संवाद झाला.

नोबेल विजेते प्रा.मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशमध्ये नव्या पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले

August 08th, 10:26 pm

बांगलादेशमध्ये नव्याने स्थापन झालेल्या हंगामी सरकारच्या प्रमुख सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल नोबेल पारितोषिक विजेते प्रा.मोहम्मद युनुस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रसार माध्यम निवेदन.

June 22nd, 01:00 pm

मी पंतप्रधान शेख हसीना जी आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करत आहे. तसे पाहिले तर, गेल्या सुमारे एका वर्षाच्या काळात आम्ही दहा वेळा भेटलो आहोत. पण आजची भेट विशेष आहे. कारण आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात पंतप्रधान शेख हसीना जी आपल्या पहिल्या अतिथी आहेत.

बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले अभिनंदन

June 05th, 08:04 pm

देशात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला मिळालेल्या विजयाबद्दल बांग्लादेश प्रजासत्ताकाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांना अभिनंदनपर दूरध्वनी करून बातचीत केली.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

January 08th, 07:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संवाद साधला आणि संसदीय निवडणुकीत सलग चौथ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

त्रिपुरामधील खोवई-हरिना रस्त्यावरील 135 किमी मार्गाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

December 27th, 08:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने त्रिपुरा राज्यात राष्ट्रीय महामार्ग -208 वरील 101.300 किमी (खोवई) ते 236.213 किमी (हरीना) अशा एकूण 134.913 किमी लांबीच्या रस्त्याच्या दुतर्फा सुधारणा आणि रुंदीकरणाला मंजुरी दिली आहे.

भारताचे पंतप्रधान आणि बांगलादेशचे पंतप्रधान 1 नोव्हेंबर रोजी तीन विकास प्रकल्पांचे संयुक्तपणे उद्घाटन करणार

October 31st, 05:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे उद्या 1 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भारतातर्फे सहाय्यीकृत तीन विकास प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. अखौरा-आगरताळा सीमापार रेल्वे जोडणी,खुलना-मोंगला बंदर रेल्वे मार्ग; आणि मैत्री महा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे युनिट-2 हे ते तीन प्रकल्प आहेत.

पुरुषांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशच्या संघावर मिळवलेल्या प्रभावी विजयाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

October 19th, 10:25 pm

पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशच्या संघावर मिळवलेल्या प्रभावी विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संघाची प्रशंसा केली आहे.

जागतिक जैवइंधन आघाडीची (GBA) स्थापना

September 09th, 10:30 pm

नवी दिल्लीत G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली.

पंतप्रधानांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची घेतली भेट

September 08th, 07:53 pm

राजकीय, सुरक्षा, आर्थिक, कनेक्टिव्हिटी आणि लोकांमधील परस्पर संबंधांसह द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचे त्यांनी केले सकारात्मक मूल्यांकन .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नवी दिल्ली येथील आपल्या निवासस्थानी घेणार तीन द्विपक्षीय बैठका- मॉरिशसचे पंतप्रधान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत या तीन बैठकांमध्ये होणार चर्चा

September 08th, 01:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीटर संदेशात माहिती दिली आहे की ते आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी तीन द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. यामध्ये मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याबरोबरच्या बैठकीचा समावेश असेल.