इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

October 17th, 04:22 pm

इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बदर अब्देलअती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी गाझा शांतता करारात इजिप्तच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रपती अब्दुल फत्तेह अल सिसी यांचे अभिनंदन केले. हा करार प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित करण्यास मदत करेल,अशी आशा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री अब्देलअती यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान आयोजित होणाऱ्या पहिल्या भारत–इजिप्त धोरणात्मक संवादाची माहिती दिली.