पंतप्रधानांनी जेष्ठ अभिनेत्री बी. सरोजा देवी यांच्या निधनावर व्यक्त केला शोक
July 14th, 03:40 pm
पंतप्रधान म्हणाले की, “त्या भारतीय चित्रपटसृष्टी आणि संस्कृतीच्या एक आदर्श प्रतीक म्हणून कायम सर्वांच्याच स्मरणात राहतील. त्यांच्या विविध भूमिकांनी अनेक पिढ्यांवर आपला ठसा उमटवला. वेगवेगळ्या भाषा आणि विषयांवरच्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकांमधून त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे दर्शन होते.“