गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्वादरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 11th, 12:00 pm

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, तडफदार युवा उपमुख्यमंत्री हर्ष संघवी जी, गुजरात सरकारमधील मंत्री जीतू भाई वाघाणी, अर्जून भाई मोढवाड़िया, डॉ प्रद्युम्न वाजा, कौशिक भाई वेकरिया, खासदार राजेश भाई, अन्य मान्यवर , महिला आणि पुरुषगण. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत , त्यांनाही माझ्याकडूनही जय सोमनाथ।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व ला केले संबोधित

January 11th, 11:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा काळ अद्भुत आहे, हे वातावरण अद्भुत आहे आणि हा सोहळा देखील अद्भुत आहे. एका बाजूला स्वतः भगवान शंकर आहेत तर दुसरीकडे हा महासागर, सूर्याच्या हजारो किरणांच्या साक्षीने मंत्रांच्या जयघोषात श्रद्धेची लाट आहे. या अतिशय पवित्र वातावरणात, भगवान सोमनाथांच्या सर्व भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच दैवी आणि भव्य अनुभूती देणारा झाला आहे. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपल्याला सोमनाथ स्वाभिमान पर्व समारंभात सक्रिय सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण अतिशय भाग्यवान आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 72 तास अखंड चाललेला ओंकाराचा जप आणि 72 तास चाललेले मंत्रांचे अखंड पठण याची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की काल संध्याकाळी वेदिक गुरुकुलातील हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हजारो ड्रोननी सोमनाथच्या हजारो वर्षांची गाथा साकार केली आणि आज 108 अश्वांसह मंदिरात शौर्य यात्रेचे आगमन झाले. मंत्र आणि भजन यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण हे शब्दातीत असून हा अनुभव केवळ काळच टिपू शकतो.

रिपब्लिक टीव्ही कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांचे भाषण

April 26th, 08:01 pm

अर्णब गोस्वामी जी, रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सर्व सहकारी, रिपब्लिक टीव्हीचे देश-विदेशातील सर्व प्रेक्षक, महिला -पुरुषगण , माझे म्हणणे मांडण्यापूर्वी मला तुम्हाला माझ्या लहानपणी जो विनोद ऐकायचो, तो सांगायचा आहे. एक प्राध्यापक होते आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केली, मी जीवनाला कंटाळले आहे, मला जगायचे नाही, म्हणून मी कांकरिया तलावात उडी मारून जीव देईन अशा आशयाची चिट्ठी तिने लिहून ठेवली होती . सकाळी पाहिले की मुलगी घरात नाही. तेव्हा पलंगावर चिट्ठी बघून वडिलांना खूप राग आला. ते म्हणाले, मी प्राध्यापक आहे, इतकी वर्षे मी शिकवले, तरीही कांकरिया स्पेलिंग चुकीचं लिहून गेली आहे. असो, मला आनंद आहे की अर्णब उत्तम हिंदी बोलू लागले आहेत . ते काय म्हणाले मी ऐकले नाही, मात्र हिंदी बरोबर आहे की नाही, हे मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो आणि कदाचित मुंबईत राहिल्यामुळे तुम्ही हिंदी चांगले शिकले असावेत .

नवी दिल्लीत आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधानांनी केले संबोधित

April 26th, 08:00 pm

नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

श्री स्वामीनारायण गुरूकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 24th, 11:10 am

पूज्य शास्त्रीजी महाराज धर्मजीवन दासजी स्वामींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने राजकोट गुरूकुलाला 75 वर्ष होत आहेत. राजकोट गुरूकुलच्या 75 वर्षांच्या या प्रवासाबद्दल मी आपल्या सर्वांचे अगदी हृदयापासून अभिनंदन करतो. भगवान श्री स्वामी नारायण यांच्या नामःस्मरणानेच एका नवचैतन्याचा संचार होतो आणि आज तुम्हा सर्व संतांच्या सानिध्यामध्ये स्वामीनारायण यांचे नामःस्मरण करण्‍याची एक वेगळीच संधी मला मिळाली आहे. या ऐतिहासिक संस्थानाचे भविष्य अधिक उज्ज्वल असेल, ही संस्था अधिक उत्तम प्रकारे आपले योगदान देईल, असा मला विश्वास आहे.

श्री स्वामीनरायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सवी समारंभात पंतप्रधानांचे दृकश्राव्य पद्धतीने संबोधन

December 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला दुरदृश्य प्रणालीद्वारे आज संबोधित केले.

नैसर्गिक शेती परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

July 10th, 03:14 pm

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे लोकप्रिय मृदू आणि खंबीर मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारमधील मंत्रीवर्ग, उपस्थित खासदार आणि आमदार, सूरतचे महापौर आणि जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, सर्व सरपंच मंडळी, कृषी क्षेत्रातले सर्व तज्ञ मित्र आणि भारतीय जनता पार्टी गुजरात प्रदेशचे अध्यक्ष सी आर पाटील आणि माझ्या सर्व प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो!

PM addresses Natural Farming Conclave

July 10th, 11:30 am

PM Modi addressed a Natural Farming Conclave in Surat via video conferencing. The PM emphasized, “At the basis of our life, our health, our society is our agriculture system. India has been an agriculture based country by nature and culture. Therefore, as our farmer progresses, as our agriculture progresses and prospers, so will our country progress.”

पंतप्रधान नैसर्गिक शेती परिषदेला करणार संबोधित

July 09th, 10:47 am

पंतप्रधान उद्या (10th July, 2022) सकाळी साडे अकरा वाजता (11:30AM) नैसर्गिक शेती परिषदेला व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे संबोधित करणार आहेत.

Our policy-making is based on the pulse of the people: PM Modi

July 08th, 06:31 pm

PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.

PM Modi addresses the first "Arun Jaitley Memorial Lecture" in New Delhi

July 08th, 06:30 pm

PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.

कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मृती भवनात बिप्लवी भारत कलादालनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 23rd, 06:05 pm

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ जी, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डी जी, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलशी संबंधित सर्व मान्यवर, विद्यापीठांचे कुलगुरू, कला आणि सांस्कृतिक विश्वातील दिग्गज, स्त्री आणि पुरुषहो,

शहीद दिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथील विक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे उद्घाटन

March 23rd, 06:00 pm

शहीद दिवसाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पश्चिम बंगालच्या कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

March 17th, 12:07 pm

फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल आपणा सर्व युवा मित्रांना खूप-खूप शुभेच्छा ! आज होळीचा सण आहे. देशवासियांना,आपणा सर्वाना, अकादमीच्या लोकांना आणि आपल्या कुटुंबियांना होळीच्या खूप-खूप शुभेच्छा !आज आपल्या अकादमी द्वारे सरदार वल्लभभाई पटेल जी, लाल बहादूर शास्त्री जी यांना समर्पित टपाल प्रमाणपत्रेही जारी करण्यात आली आहेत. आज नव्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन आणि हॅपी व्हॅली कॉम्प्लेक्सचे लोकार्पणही झाले आहे. या सुविधा संघ भावना, आरोग्य आणि फिटनेसची भावना बळकट करतील, प्रशासकीय सेवा अधिक नेटक्या आणि प्रभावी करण्यासाठी सहाय्य करतील.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 17th, 12:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीच्या 96 व्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या समारोप समारंभाला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. नव्या क्रीडा संकुलाचे त्यांनी उद्‌घाटन केले आणि पुनर्रचित हॅपी व्हाली कॉम्प्लेक्स राष्ट्राला अर्पण केले.

Today the development of the country is seen with the spirit of 'Ek Bharat, Shreshtha Bharat': PM Modi

November 14th, 01:01 pm

PM Narendra Modi transferred the 1st instalment of PMAY-G to more than 1.47 lakh beneficiaries of Tripura. More than Rs 700 crore were credited directly to the bank accounts of the beneficiaries on the occasion. He said the double engine government in Tripura is engaged in the development of the state with full force and sincerity.

PM Modi transfers the 1st instalment of PMAY-G to more than 1.47 lakh beneficiaries of Tripura

November 14th, 01:00 pm

PM Narendra Modi transferred the 1st instalment of PMAY-G to more than 1.47 lakh beneficiaries of Tripura. More than Rs 700 crore were credited directly to the bank accounts of the beneficiaries on the occasion. He said the double engine government in Tripura is engaged in the development of the state with full force and sincerity.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंतप्रधानांचे संबोधन

October 31st, 09:41 am

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा ! ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’साठी आयुष्याचा प्रत्येक क्षण ज्यांनी समर्पित केला, त्या राष्ट्रनायक सरदार वल्लभ भाई पटेल यांना आज देश श्रद्धांजली अर्पण करत आहे.

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला केले संबोधित

October 31st, 09:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणातून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या आदर्शासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सरदार पटेल यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेल हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून प्रत्येक देशवासीयाने आपल्या हृदयात त्यांना अढळ स्थान दिले आहे, आणि जे लोक त्यांचा एकतेचा संदेश पुढे नेत आहेत, तेच अखंड एकतेच्या‌ भावनेचे खरे प्रतीक आहेत. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील राष्ट्रीय एकता संचलन(कवायती)आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीवरील कार्यक्रम याच भावना प्रतिबिंबीत करत आहेत, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजादी@75 परिषद आणि लखनौमधील एक्स्पोच्या उद्घाटनाच्या वेळी केलेले भाषण

October 05th, 10:31 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि लखनौचे खासदार, आमचे ज्येष्ठ साथी श्रीयुत राजनाथ सिंह, श्री हरदीप सिंह पुरी, महेंद्र नाथ पांडे, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री श्री केशव प्रसाद मौर्य, श्री दिनेश शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्रीयुत कौशल किशोर, राज्य सरकारमधील मंत्रीगण, खासदार, आमदार, देशाच्या विविध भागातून आलेले तुम्ही सर्व आदरणीय मंत्रिगण, इतर सर्व मान्यवर आणि उत्तर प्रदेशातील माझ्या प्रिय बंधु भगिनींनो !