वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 07th, 10:00 am
वंदे मातरम, हे शब्द एक मंत्र आहेत,एक उर्जा आहे,एक स्वप्न आहे,एक संकल्प आहे.वंदे मातरम,हे शब्द भारत मातेची साधना आहेत,भारत मातेची आराधना आहे. वंदे मातरम हे शब्द आपल्याला इतिहासात घेऊन जातात.आपल्या आत्मविश्वासाला,आपल्या वर्तमानाला आत्मविश्वासाचे बळ देतात आणि आपल्या भविष्याला नवी उमेद देतात की असा कोणताही संकल्प नाही, असा कोणताही संकल्प नाही जो साध्य होऊ शकत नाही.असे कोणतेही लक्ष्य नाही जे आपण भारतवासीय साध्य करू शकत नाही.“वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
November 07th, 09:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर केल्या जाणाऱ्या उत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे मातरम् हे केवळ शब्द नव्हेत – हा एक मंत्र आहे, एक उर्जा, एक स्वप्न आणि एक पवित्र निश्चय आहे. वंदे मातरम् हे भारतमातेप्रति भक्ती आणि आध्यात्मिक समर्पण यांचे मूर्त रूप आहे हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की हा एक शब्द आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतो, आपला वर्तमानकाळ आत्मविश्वासाने भरून टाकतो आणि आपल्या भविष्यकाळाला असा धीर देण्यासाठी प्रेरित करतो की, कोणताही निश्चय पूर्ण होणार नाही असा नसतो आणि कोणतेही ध्येय आपल्या आवाक्याबाहेर नसते.We are making Delhi a model of growth that reflects the spirit of a developing India: PM Modi
August 17th, 12:45 pm
During the inauguration of road projects worth ₹11,000 crore in Delhi, PM Modi said that the Dwarka Expressway and UER-II will enhance convenience for the people of Delhi and the entire NCR. He highlighted that a key feature of the UER is its role in freeing Delhi from garbage mounds, with millions of tonnes of waste material used in its construction. The PM also urged that “Vocal for Local” should become a life mantra for every citizen.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 11,000 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
August 17th, 12:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव द्वारका आहे आणि हा कार्यक्रम रोहिणी येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश टाकला आणि आपण स्वतः द्वारकाधीशांच्या भूमीतून आलो आहेत या योगायोगाचा त्यांनी उल्लेख केला. संपूर्ण वातावरण भगवान श्रीकृष्णाच्या भावनेने ओथंबून गेले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.दिल्लीत लाल किल्ल्यावर झालेल्या 79 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची झलक
August 15th, 11:02 am
पंतप्रधान मोदींनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात घटना समिती, स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यघटनेच्या निर्मात्यांना आदरांजली वाहिली. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी –GST सुधारणा, प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, राष्ट्रीय क्रीडा धोरण आणि सुदर्शन चक्र मिशन प्रमुख उपक्रम हाती घेण्यात असल्याचे स्पष्ट केलेToday, with our efforts, we are taking forward the vision of a developed Tamil Nadu and a developed India: PM Modi in Thoothukudi
July 26th, 08:16 pm
PM Modi launched development projects worth ₹4,800 crore in Thoothukudi, spanning ports, railways, highways, and clean energy. He inaugurated the new ₹450 crore airport terminal, raising annual capacity from 3 to 20 lakh. Emphasising Tamil Nadu’s role in Make in India, he said the India–UK FTA will boost opportunities for youth, MSMEs, and strengthen regional growth.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूमधील तुतिकोरिन इथे 4,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण
July 26th, 07:47 pm
यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. चार दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर थेट भगवान रामेश्वराच्या पवित्र भूमीवर पोहोचणे, हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी परदेश दौऱ्यादरम्यान भारत आणि ब्रिटन दरम्यान झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराबद्दलही उपस्थितांना सांगितले. ही प्रगती भारताबद्दल वाढत असलेल्या जागतिक विश्वासार्हतेचे आणि राष्ट्राच्या नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. हाच आत्मविश्वास विकसित भारत आणि विकसित तामिळनाडूच्या निर्मितीला चालना देईल असे त्यांनी नमूद केले. आज भगवान रामेश्वर आणि भगवान तिरुचेंदूर मुरुगन यांच्या आशीर्वादाने तुतिकोरिनमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे, असेही त्यांनी सांगितले. 2014 मध्ये तामिळनाडूला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम तुतिकोरिनमध्ये आजही सुरू आहे, असे पंतप्रधान म्हणाले.श्री नारायण गुरु आणि गांधीजी यांच्यातील संवादाच्या शताब्दीनिमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 24th, 11:30 am
आज हा परिसर देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व घटनेचे स्मरण करण्याचा साक्षीदार होतो आहे. ती एक अशी ऐतिहासिक घटना होती, ज्या घटनेने आपल्या स्वातंत्र्य चळवळीला केवळ एक नवीन दिशा दिली नाही तर स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाला, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला ठोस अर्थ दिला. शंभर वर्षांपूर्वीची श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांची ती भेट आजही तितकीच प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे. शंभर वर्षांपूर्वी झालेली ती भेट आजही सामाजिक सौहार्द आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक मोठा स्रोत आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, मी श्री नारायण गुरुंच्या चरणी प्रणाम करतो. गांधीजींनाही मी आदरांजली वाहतो.श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
June 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात भारताचे दोन महान आध्यात्मिक आणि नैतिक नेते श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यातील ऐतिहासिक संवादाच्या शताब्दी समारंभाला संबोधित केले. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आदरपूर्वक अभिवादन केले आणि सांगितले की आज हे ठिकाण देशाच्या इतिहासातील एका अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार आहे. आपल्या स्वातंत्र्यचळवळीला नवी दिशा देणारी ही एक ऐतिहासिक घटना होती, स्वतंत्र भारताच्या स्वप्नाला आणि स्वातंत्र्याच्या उद्दिष्टांना तिने ठोस अर्थ दिला,असे त्यांनी सांगितले. श्री नारायण गुरू आणि महात्मा गांधी यांच्यात 100 वर्षांपूर्वी झालेली ही भेट आजही प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहे, आणि सामाजिक सलोखा आणि विकसित भारताच्या सामूहिक उद्दिष्टांसाठी उर्जेचा एक शक्तिशाली स्रोत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी, त्यांनी श्री नारायण गुरूंच्या चरणी वंदन केले आणि महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.भोपाळ येथील देवी अहिल्याबाई महिला सशक्तिकरण महासंमेलनात विविध प्रकल्पांच्या शुभारंभाच्या वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील मजकूर
May 31st, 11:00 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री मंगूभाई पटेल, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री मोहन यादव जी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले केंद्रीय मंत्री इंदूरचे तोखन साहू जी, दतियाहून राम मोहन नायडू जी, सतना इथून मुरलीधर मोहोळ जी, राज्याचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा जी, राजेंद्र शुक्ला जी, लोकसभेतील माझे सहकारी व्ही. डी. शर्मा जी, इतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी आणि येथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो….पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात भोपाळ येथे लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित महिला सशक्तीकरण महासंमेलनाला केले संबोधित
May 31st, 10:27 am
लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात भोपाळ येथे लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी भोपाळमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'माँ भारती'ला अभिवादन केले आणि भारतातील महिलांच्या सामर्थ्याचे महत्त्व विशद करत आपल्या संबोधनाची सुरूवात केली. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या भगिनी आणि कन्यांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांची आज असलेली 300 वी जयंती म्हणजे 140 कोटी भारतीयांसाठी प्रेरणादायी दिवस आहे आणि राष्ट्रउभारणीच्या उल्लेखनीय प्रयत्नांमध्ये योगदान देण्याचा क्षण आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. देवी अहिल्याबाई यांचे विचार उद्धृत करत, खरे शासन म्हणजे लोकांची सेवा करणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हे आहे, असे त्यांनी सांगितले. आजचा कार्यक्रम त्यांच्या दृष्टीकोनाला सामावून घेणारा आणि त्यांच्या सिद्धांतांना पुढे नेणारा आहे, असे त्यांनी नमूद केले. दतिया आणि सतनासाठी एयर कनेक्टिव्हिटीच्या समावेशाबरोबरच इंदूर मेट्रोचा शुभारंभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल, विकासाला चालना मिळेल आणि नव्या रोजगार संधी निर्माण होतील यावर त्यांनी भर दिला.गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 27th, 11:30 am
मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
May 27th, 11:09 am
गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आज गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी शहरी विकास वर्ष 2005 ची 20 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून शहरी विकास वर्ष 2025 ला सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या त्यांच्या भेटीदरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जयघोष आणि फडकणारे तिरंगी ध्वज या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह त्यांना अनुभवायला मिळाला आहे. ही दृश्य संस्मरणीय असून, ही भावना केवळ गुजरातमध्येच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती, असे ते म्हणाले.भारताने दहशतवादाचा काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दृढनिश्चयाने तो पूर्ण केला , असे पंतप्रधान म्हणाले.प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
April 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज मी तुमच्याशी 'मन की बात' मधून संवाद साधत आहे, मात्र माझे मन अतिशय व्यथित आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति प्रत्येक भारतीयाच्या मनात सहानुभूती आहे. भले ते कुठल्याही राज्यातील असो, कोणतीही भाषा बोलणारे असो, मात्र या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांचे दुःख त्यांना जाणवत आहे. मला जाणीव आहे, दहशतवादी हल्ल्याची छायाचित्रं पाहून प्रत्येक भारतीयाचे रक्त खवळलं आहे. पहलगाममधील या हल्ल्यातून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची उद्विग्नता दिसून येते, त्यांचा भेकडपणा दिसून येतो. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदत होती, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती मिळाली होती, लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली होती, लोकांचे उत्पन्न वाढत होते, युवकांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. मात्र देशाच्या शत्रूंना हे पसंत नव्हतं. दहशतवादी आणि त्यांचे आश्रयदाते यांना काश्मीर पुन्हा उद्ध्वस्त व्हावं असं वाटत होतं आणि म्हणूनच एवढा मोठा कट रचण्यात आला. दहशतवादाविरोधातल्या या युद्धात देशाची एकता, 140 कोटी भारतीयांची एकजूट ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. हीच एकता दहशतवादाविरुद्ध आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे. देशासमोर उद्भवलेल्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपल्याला आपले संकल्प अधिक बळकट करायचे आहेत. एक राष्ट्र म्हणून आपल्याला प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल. आज जग पाहत आहे या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे.महाराष्ट्रात नागपूर येथील माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 30th, 11:53 am
गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा! कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी, स्वामी गोविंद गिरी महाराज जी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री जी, अन्य मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनो, आज या राष्ट्र यज्ञाच्या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. आजचा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवसही खास आहे. आजपासून नवरात्र सुरू होत आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह सण साजरा केला जात आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरू अंगद देव यांचा प्रकटदिन देखील आहे. आमचे प्रेरणास्थान, परमपूज्य डॉक्टरसाहेबांचीही आज जयंती आहे आणि याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली परंपरेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी स्मृती मंदिराला भेट देऊन पूज्य डॉक्टर साहेब आणि गुरुजी यांना आदरांजली अर्पण करता आली, हे मी माझं भाग्य समजतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची केली पायाभरणी
March 30th, 11:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पवित्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह असे सण साजरे केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच दिवसाला जोडून येणाऱ्या भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या जयंतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हा दिवस प्रेरणादायी डॉ. के. बी. हेडगेवार यांची जयंती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गौरवशाली प्रवासाच्या शताब्दी वर्षाची आठवण करून देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या महत्त्वपूर्ण दिवशी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती मंदिराला भेट देणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.नवी दिल्लीत संपन्न होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
February 21st, 05:00 pm
संमेलनामध्ये उपस्थित ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सर्व सदस्य आणि मराठी भाषेचे सर्व विद्वत्तजन आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
February 21st, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषेच्या या भव्य सोहोळ्यात सर्व मराठी भाषिकांचे स्वागत केले. ते म्हणाले की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणतीही भाषा अथवा प्रदेशापुरते सीमित नाही. ते पुढे म्हणाले की या संमेलनात महाराष्ट्र आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे सार तसेच सांस्कृतिक वारसा अंतर्भूत आहे.ईटी नाऊ जागतिक व्यापार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 15th, 08:30 pm
गेल्या वेळी मी ईटी समिट (जागतिक परिषद) मध्ये आलो होतो, तेव्हा निवडणुका होणार होत्या; आणि त्या वेळी मी तुम्हाला अगदी नम्रतेने सांगितले होते की, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल. आज हा वेग दिसत आहे, आणि देश त्याला समर्थनही देत आहे, याचा मला आनंद वाटतो. नवीन सरकार स्थापन झाल्यावर देशातील अनेक राज्यांमध्ये बीजेपी-एनडीएला जनतेचा सतत आशीर्वाद लाभत आहे. जून मध्ये ओदिशाच्या जनतेने विकसित भारताच्या संकल्पाला गती दिली, नंतर हरियाणाच्या जनतेने समर्थन दिले आणि आता दिल्ली मधील लोकांनी आम्हाला मोठे समर्थन दिले आहे. विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी देशातील जनता आज कशी खांद्याला खांदा लावून काम करत आहे, याची ही पावती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 ला केले संबोधित
February 15th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2025 अर्थात उद्योग व्यवसायविषयक जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. या शिखर परिषदेच्या याआधीच्या पर्वालाही आपण संबोधित केले होते, आणि त्यावेळी आपण आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत नव्या वेगाने काम करेल असे नम्रपणे नमूद केले होते याचे स्मरण पंतप्रधानांनी यावेळी करून दिले. त्यानुसार आता भारताने पकडलेली नवी गती सर्वांना दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेला देशभरातून पाठबळ मिळत असल्याबद्दलही पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ओदिशा, महाराष्ट्र, हरयाणा आणि नवी दिल्लीतल्या जनतेने विकसित भारताबद्दलच्या वचनबद्धतेला प्रचंड प्रमाणात पाठबळ दर्शवल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभारही मानले. जनतेचे हे पाठबळ म्हणजे देशातली जनता विकसित भारताच्या संकल्प पूर्ततेसाठी खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचेच द्योतक आहे असे पंतप्रधान म्हणाले.