पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार
September 16th, 02:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता धार येथे 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' आणि '8 व्या राष्ट्रीय पोषण माह' अभियानाचा प्रारंभ होईल. यावेळी ते इतर अनेक उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील आणि उपस्थितांना संबोधित करतील.उत्तर प्रदेशात कानपुर येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 30th, 03:29 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, इथले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेश सरकार मधील मंत्री , खासदार , आमदार आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन
May 30th, 03:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे 24 एप्रिल 2025 रोजीचा पूर्वनियोजित कानपूरचा दौरा रद्द करावा लागला होता. या अमानुष कृत्याचे बळी ठरलेले कानपूरचे सुपुत्र शुभम द्विवेदी यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. देशभरातील भगिनी आणि कन्यांच्या वेदना, दुःख, राग आणि सामूहिक रोष यांनी आपण अंतर्मुख झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच, हा सामूहिक रोष जगभरात उमटला. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैन्याला संघर्ष संपवण्याची विनंती करण्यास भाग पाडण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचे यश त्यांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यलढ्याच्या भूमीवर सशस्त्र दलांच्या धाडसाला, शौर्याला पंतप्रधानांनी सलाम केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दयेची याचना करणाऱ्या शत्रूने कोणत्याही भ्रमात राहू नये, कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असा त्यांनी ठामपणे सांगितले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची तीन तत्वे असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पहिले म्हणजे, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला भारत निर्णायक प्रत्युत्तर देईल. या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि अटी केवळ भारतीय सशस्त्र दलच ठरवतील. दुसरे म्हणजे, भारत आता अण्विक धमक्यांना घाबरणार नाही आणि अशा पध्दतीने दिलेल्या इशाऱ्यांवर आधारित आपले निर्णयही घेणार नाही. तिसरे म्हणजे, भारत दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणारी सरकारे या दोघांनाही एकाच दृष्टिकोनातून पाहतो - पाहणार आहे. पाकिस्तानच्या राज्यातील आणि राज्याबाहेरील घटकांमधील फरक आता अस्वीकारार्ह असेल. शत्रू कुठेही असला तरी त्याचा बिमोड केला जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.दिनांक 29 आणि 30 मे रोजी पंतप्रधान सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशला देणार भेट
May 28th, 12:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 आणि 30 मे रोजी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांना भेट देणार आहेत.उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विविध प्रकल्पांचा शिलान्यास आणि नवीन प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 11th, 11:00 am
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक, उपस्थित असलेले मंत्री, इतर लोकप्रतिनिधी, बनास दुग्धालयाचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी आणि येथे इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आलेले माझे सर्व कुटुंबिय,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
April 11th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. काशीसोबत आपले गहीरे नाते असल्याचे ते म्हणाले. इथले लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखेच आहेत आणि त्यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण त्यांचा अत्यंत आभारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांनी दिलेल्या याच प्रेम आणि पाठबळामुळे आपण धन्य झालो असल्याचेही त्यांनी नमूद केले. काशी आपली आहे आणि आपण काशीचे आहोत, असेही ते म्हणाले. उद्या हनुमान जन्मोत्सवाचा शुभ प्रसंग आहे, याचा उल्लेख करत काशीमध्ये संकट मोचन महाराजांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळणे, हे आपले भाग्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हनुमान जन्मोत्सवापूर्वी, काशीतील नागरिक विकासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.