केंद्रीय मंत्रिमंडळाने शेड्यूल्ड भारतीय विमान कंपन्यांसाठी विमान इंधनाच्या किंमती स्थिर राखण्यासाठी निधीला दिली मंजुरी
June 03rd, 03:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शेड्यूल्ड भारतीय विमान कंपन्यांना त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामकाजासाठी विमान इंधनाच्या किमतीत स्थैर्य आणण्यास पाठबळ देण्याकरता, तेल विपणन कंपन्यांसाठी 10,000 कोटी रुपये मर्यादेपर्यंतच्या एकरकमी अर्थसंकल्पीय साहाय्याला मंजुरी दिली आहे. तेल विपणन कंपन्यांना हे अर्थसंकल्पीय साहाय्य, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांच्या माध्यमातून आणि बिनव्याजी अग्रिम रकमेच्या स्वरूपात दिले जाईल. पश्चिम आशियातील संकटामुळे इंधनाच्या किमतींमध्ये सध्या सुरू असलेल्या चढ उतारांच्या परिस्थितीत, विमान कंपन्यांकरता स्थिर विमान इंधन दर सुनिश्चित करता यावेत या उद्देशाने तेल विपणन कंपन्यांना हे पाठबळ पुरवले जाणार आहे.Rozgar Mela reflects our Government’s commitment to empowering the Yuva Shakti with new opportunities: PM Modi
May 23rd, 11:15 am
At the 19th Rozgar Mela, PM Modi distributed over 51,000 appointment letters and said India’s growing investments, global partnerships and expanding sectors are creating new opportunities for the youth. He highlighted rising opportunities across technology, manufacturing, startups, defence, infrastructure and public service as India moves towards the vision of Viksit Bharat.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात 51,000 हून अधिक तरुणांना शासकीय नियुक्ती पत्रांचे वाटप
May 23rd, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 19 व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हा दिवस देशभरातील हजारो तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सरकारी सेवेत नव्याने रुजू झालेल्या सर्व तरुणांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी रेल्वे, बँकिंग, संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील भारताच्या विकासात हे तरुण लवकरच महत्त्वपूर्ण योगदान देतील, यावर त्यांनी भर दिला. येत्या काळात तुम्ही सर्वजण विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहात, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.Uttar Pradesh has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM Modi in Jewar
March 28th, 12:15 pm
PM Modi inaugurated Phase 1 of Noida International Airport at Jewar in Uttar Pradesh and said that the occasion marks a new chapter in the Viksit UP, Viksit Bharat Abhiyan. He noted that the government has resolved to make India self-reliant in the MRO sector. Highlighting the government’s achievements in recent weeks, even as the world grapples with the conflict in West Asia, he called for collective effort and national unity.उत्तरप्रदेशात नोएडा इथे, सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
March 28th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात जेवर इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या प्रगतीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करत, हा सोहळा, विकसित उत्तरप्रदेश आणि विकसित भारताच्या गाथेत एक नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज दुहेरी आनंदाचा प्रसंग आहे. पहिले कारण म्हणजे, आपणच या विमानतळाच्या कामाची पायाभरणी केली होती, आणि आज आपल्यालाच त्याचे उद्घाटनही करण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरे आनंदाचे कारण या भव्य विमानतळाच्या नावाचा उत्तरप्रदेशशी जवळचा संबंध आहे. “या प्रदेशाचा खासदार म्हणून, हे राज्य माझ्या विशेष जवळचे राज्य आहे, आणि आता या शहराची ओळखच या भव्य विमानतळाशी जोडलेली असेल.” असे सांगत, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील लोकांचे अभिनंदन केले.पंतप्रधान 28 मार्च रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
March 26th, 09:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मार्च 2026 रोजी उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ते गौतम बुद्ध नगर, जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीला भेट देतील. त्यानंतर, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास, पंतप्रधान नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार असून यानिमित्त होणाऱ्या जाहीर सभेलाही ते संबोधित करतील.पंतप्रधानांनी हैदराबादमधील विंग्स इंडिया 2026 कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना केलेले भाषण
January 28th, 06:00 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राम मोहन नायडू जी, मुरलीधर मोहोळ जी, जगभरातून आलेले माननीय मंत्री, जागतिक हवाई वाहतूक उद्योगातील नेते, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, मान्यवर प्रतिनिधी, महिला आणि सज्जनांनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथे 'विंग्स इंडिया 2026' कार्यक्रमाला केले संबोधित
January 28th, 05:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तेलंगणातील हैदराबाद येथे 'विंग्ज इंडिया 2026' कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी उद्योगपती, तज्ञ आणि गुंतवणूकदारांचे स्वागत केले आणि हवाई वाहतूक उद्योगाचा आगामी काळ महत्त्वाकांक्षेने भरलेला असून भारत एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे, असे नमूद केले. त्यांनी विमान निर्मिती, वैमानिक प्रशिक्षण, प्रगत हवाई वाहतूक आणि विमान भाडेतत्त्वावर देण्याच्या क्षेत्रात भारतामध्ये असलेल्या प्रचंड संधींवर प्रकाश टाकला आणि सर्व संबंधितांसाठी 'विंग्ज इंडिया' शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले.हैदराबादमधील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मराठी अनुवाद
November 26th, 10:10 am
“भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी जी, सफ्रान समूहाशी संबंधित सर्व मान्यवर, आणि उपस्थित बंधू-भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 26th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत जागतिक एमआरओ अर्थात देखभाल, दुरुस्ती आणि संधारण केंद्र म्हणून उदयाला येईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे देखभाल, दुरुस्ती आणि संधारण सुविधा केंद्र युवकांसाठी उच्च तंत्रज्ञानाधारित हवाई वाहतूक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करेल, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपण 24 नोव्हेंबर रोजी सफ्रानच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाशी संवाद साधला होता आणि त्यांच्याबरोबर याआधीही झालेल्या चर्चेत भारताबद्दलचा त्यांचा विश्वास आणि आशा दिसून आली होती, असे पंतप्रधान म्हणाले. सफ्रानची भारतातील गुंतवणूक देखील त्याच गतीने कायम राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांची सफ्रानच्या टीमचे नवीन सुविधेबद्दल अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे 26 नोव्हेंबर रोजी करणार उद्घाटन
November 25th, 04:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क - सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन करतील.