Today’s projects will play a pivotal role in fulfilling our resolve for a 'Viksit Keralam': PM Modi in Ernakulam
March 11th, 02:00 pm
PM Modi launched development projects worth around ₹11,000 crore in Ernakulam, Keralam, and extended his congratulations to the people of Keralam on these initiatives. The projects cover sectors such as petroleum, floating solar power, regional connectivity and road infrastructure. He expressed his firm belief that these multi-sectoral projects are essential building blocks for the state’s prosperous future.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळम मध्ये एर्नाकुलम येथे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच लोकार्पण
March 11th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोची या चैतन्यमय तटवर्ती शहराला भेट देऊन केरळमच्या विकासाला वेग देण्यासाठी विविध उच्च-परिणामकारक विकास प्रकल्पांची सुरुवात करून दिली. गुंतवणुकीचे प्रमाण अधिक ठळकपणे नोंदवत पंतप्रधानांनी यावेळी सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करून पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की कोची शहराला भेट देणे हा नेहमीच एक भव्य अनुभव असतो.“या प्रकल्पांसाठी मी केरळमच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन करतो,” ते म्हणाले.गुजरातमध्ये मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 28th, 02:45 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा,अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर, उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेनंतर आजआपण येथे आणखी एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार बनत आहोत. एआय परिषदेने जगाला भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेची ओळख करून दिली, आजचादिवस हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या वचनबद्धतेचा आणखीएक वस्तुपाठ आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे उद्घाटन
February 28th, 02:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन एटीएमपी (असेंब्ली, टेस्ट, मार्किंग आणि पॅकेजिंग) सुविधेचे उद्घाटन केले. व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात हा जागतिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाच्या दिशेने भारताच्या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे.रोजगार मेळ्या अंतर्गत नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 24th, 11:30 am
सन 2026 ची सुरुवात तुमच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात घेऊन येत आहे. वसंत पंचमी कालच साजरी झाली असून, तुमच्या आयुष्यातही नव्या वसंताची सुरुवात होत आहे. हा काळ तुम्हाला संविधानाबद्दलच्या तुमच्या जबाबदाऱ्यांशीही जोडणारा आहे. योगायोगाने, या काळात देशात प्रजासत्ताकाचा महोत्सव सुरू आहे. काल 23 जानेवारी रोजी आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी केली आणि उद्या 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन आहे. त्यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आजचा दिवस ही विशेष आहे. आजच्याच दिवशी आपल्या संविधानाने ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले होते. आजच्या या महत्त्वाच्या दिवशी देशातील 61 हजारांहून अधिक युवक आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. आज तुम्हा सर्वांना सरकारी सेवांसाठी नियुक्तीपत्रे मिळत आहेत. ही नियुक्तीपत्रे म्हणजे राष्ट्रनिर्माणासाठीचे आमंत्रणपत्र आहे. हे विकसित भारताच्या उभारणीला गती देणारे संकल्पपत्र आहे. तुमच्यापैकी अनेक जण देशाची सुरक्षा अधिक मजबूत करतील, आपल्या शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यवस्थेला अधिक सक्षम करतील. काही युवक आर्थिक सेवा आणि ऊर्जा सुरक्षेला बळकटी देतील, तर काही युवक आपल्या सरकारी कंपन्यांच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतील. मी आपणा सर्व युवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.अलीकडच्या काळात रोजगार मेळावा ही एक संस्था म्हणून विकसित झाली असून, या माध्यमातून लाखो तरुणांना विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्तीपत्रे मिळाली आहेत: पंतप्रधान
January 24th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 18व्या रोजगार मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, 2026 हे वर्ष नागरिकांच्या जीवनात नवे आनंद घेऊन सुरू झाले असून, त्याच वेळी नागरिकांना त्यांच्या घटनात्मक कर्तव्यांशी जोडणारेही ठरत आहे. हा काळ प्रजासत्ताकाच्या भव्य उत्सवाशी संबंधित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.Our relationship carries the permanence of platinum and the shine of silver: PM Modi at India-Germany CEOs Forum
January 12th, 01:35 pm
Addressing the India-Germany CEOs Forum, PM Modi remarked that the partnership between the two countries is a seamless one, built on shared values and mutual trust. The PM highlighted several important decisions taken, such as deeper cooperation in strategic sectors, critical and emerging technologies, and AI. He invited German precision and innovation to connect with India’s scale and speed.The fact sheet on India's growth is a success story of the Reform-Perform-Transform mantra: PM Modi in Rajkot
January 11th, 02:45 pm
PM Modi inaugurated the Vibrant Gujarat Regional Conference for the Kutch and Saurashtra region in Rajkot. Recalling the devastating earthquake in Kutch and drought in Saurashtra, the PM said these regions are now emerging as major drivers of Aatmanirbhar Bharat and India’s rise as a global manufacturing hub. He highlighted the achievements India has made over the past 11 years.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये कच्छ आणि सौराष्ट्र विभागांसाठी व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेचे केले उद्घाटन
January 11th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या राजकोट येथे कच्छ आणि सौराष्ट्र क्षेत्रासाठी व्हायब्रंट गुजरात या प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, 2026 वर्षाच्या सुरुवातीनंतरचा त्यांचा हा गुजरातचा पहिलाच दौरा आहे. त्यांनी अधोरेखित केले की, आज सकाळीच त्यांनी भगवान सोमनाथांचे दिव्य दर्शन घेतले आणि आता ते राजकोटमधील या भव्य कार्यक्रमात सहभागी होत आहेत. विकास भी, विरासत भी हा मंत्र सर्वत्र घुमत आहे, असे त्यांनी नमूद केले.India and Russia are embarking on a new journey of co-innovation, co-production, & co-creation: PM Modi says during the India–Russia Business Forum
December 05th, 03:45 pm
In his address at the India–Russia Business Forum, PM Modi conveyed deep gratitude to his friend President Putin for joining the forum. He noted that discussions have commenced on a Free Trade Agreement between India and the Eurasian Economic Union. He remarked that meaningful discussions have taken place over the past two days and expressed his happiness that all areas of India–Russia cooperation were represented.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत झालेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
December 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष माननीय व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या भारत-रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीला संबोधित केले. पंतप्रधानांनी माननीय राष्ट्राध्यक्ष पुतीन, भारत आणि परदेशातील नेते आणि सर्व मान्यवर पाहुण्यांना अभिवादन करून आपल्या भाषणाची सुरुवात केली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन आपल्यासोबत मोठे शिष्टमंडळ घेऊन आले असल्याने भारत-रशिया व्यवसाय मंच हा त्यांच्या महत्त्वपूर्ण पुढाकाराचे द्योतक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी बैठकीत सहभागी होत असलेल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत त्यांच्यामध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांनी आपले मित्र राष्ट्रपती पुतीन यांचे या मंचाच्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि त्यांचे मोलाचे विचार मांडल्याबद्दल मनापासून आभार मानले. व्यवसायासाठी सुलभ आणि खात्रीलायक अशी यंत्रणा तयार केली जात असल्याचे स्पष्ट करत त्यांनी भारत आणि युरेशियन आर्थिक संघ यांच्यात मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू झाल्याचे नमूद केले.नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 17th, 11:09 pm
श्रीलंकेच्या पंतप्रधान महामहीम हरिणी अमरसूर्या महोदया, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान, माझे मित्र टोनी ऍबट महोदय, यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक महोदय, मान्यवर अतिथी, स्त्री-पुरुषहो नमस्कार!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला केले संबोधित
October 17th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद 2025 ला संबोधित केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोदी म्हणाले की एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषद उत्सवाच्या वातावरणात आयोजित केली जात आहे. त्यांनी सत्राची संकल्पना अजेय भारत ची प्रशंसा केली आणि ते खरोखरच समर्पक असल्याचे नमूद केले, कारण आज भारत थांबण्याच्या मनःस्थितीत नाही. पंतप्रधान म्हणाले की भारत थांबणार नाही किंवा वेग कमीही करणार नाही, 140 कोटी भारतीय पूर्ण गतीने एकत्रितपणे पुढील वाटचाल करत आहेत.दिल्लीमध्ये यशोभूमी येथे इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 04th, 10:45 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, राज्यमंत्री चंद्र शेखर पेम्मासानी जी,विविध राज्यांचे प्रतिनिधी,परदेशातून आपले अतिथी,टेलीकॉम क्षेत्रातले मान्यवर,विविध महाविद्यालयांमधून आलेले माझे युवा मित्र,महिला आणि पुरुष वर्ग,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 62,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या युवा केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ करताना, कौशल दीक्षांत समारोह कार्यक्रमाला केले संबोधित
October 04th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे कौशल्य दीक्षांत समारोहादरम्यान 62,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध युवा-केंद्रित उपक्रमांचा शुभारंभ केला. पंतप्रधानांनी देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिकणारे लाखो विद्यार्थी, तसेच बिहारमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आठवण करून दिली की काही वर्षांपूर्वी सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दीक्षांत समारंभ आयोजित करण्याची नवी परंपरा सुरू केली होती. आजचा दिवस त्या परंपरेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.जपानच्या प्रशासनिक राज्यपालांशी संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले मनोगत
August 30th, 08:00 am
या सभागृहात मला सैतामाची वेगवान धडपड जाणवते, मियागीचे जिद्दीपण जाणवते, फुकुओकाची चैतन्य आणि नाराच्या वारशाची सुगंधी झुळूक अनुभवायला मिळते. आपल्यामध्ये कुमामोतोची आत्मीयता आहे, नागानोची ताजेपणा आहे, शिझुओकाची रमणीयता आहे, आणि नागासाकीचे स्पंदन आहेत. आपण सर्व फुजी पर्वताच्या सामर्थ्याचे आणि साकुराच्या आत्म्याचे प्रतीक आहात. एकत्रितपणे आपण जपानला शाश्नत बनवत आहात.आगामी दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन: विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीसाठी आठ दिशानिर्देश
August 29th, 07:11 pm
भारत आणि जपान; मुक्त, खुला, शांत, समृद्ध आणि दडपशाहीमुक्त हिंद-प्रशांत प्रदेशाचा कायद्याच्या नियमांवर आधारित समान दृष्टिकोन असलेले दोन देश, पूरक संसाधन देणग्या, तांत्रिक क्षमता आणि किफायतशीर स्पर्धात्मकता असलेल्या दोन अर्थव्यवस्था तसेच मैत्री आणि परस्पर सद्भावनेची दीर्घ परंपरा असलेली दोन राष्ट्रे म्हणून पुढील दशकात आपल्या देशांमध्ये आणि जगात मोठ्या प्रमाणात बदल आणि संधी एकत्रितपणे वहन करण्याचा, आपली संबंधित देशांतर्गत उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्याचा तसेच आपल्या देशांना आणि पुढच्या पिढीतील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त जवळ आणण्याचा आपला हेतू याद्वारे व्यक्त करीत आहेत.भारत -जपान आर्थिक मंचाच्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 29th, 11:20 am
मी तुमच्यापैकी अनेकांना वैयक्तिकरित्या ओळखतो. गुजरातमधील माझ्या मुख्यमंत्री काळात तसेच दिल्लीला आल्यानंतरच्या काळात भेटलो आहे. तुमच्यापैकी अनेकांशी माझे निकटचे संबंध आहेत. आज तुम्हाला सर्वांना भेटण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद झाला आहे.भारत-जपान आर्थिक मंचाच्या बैठकीत पंतप्रधान सहभागी
August 29th, 11:02 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या यशावर, विशेषत: गुंतवणूक, वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर प्रकाश टाकला. जपानी कंपन्यांना भारतात आपला व्यवसाय आणखी वाढवण्यासाठी आमंत्रित करताना, त्यांनी नमूद केले की, भारताच्या विकासगाथेने त्यांच्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या अशांत जागतिक आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विश्वासू मित्रांमधील आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणे अधिक प्रासंगिक असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्थैर्य, धोरणात्मक अंदाज, सुधारणांप्रति बांधिलकी आणि व्यवसाय सुलभतेच्या प्रयत्नांमुळे भारतीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला असून, जागतिक संस्थांनी भारताच्या पतमानांकनात नुकत्याच केलेल्या सुधारणेत ते योग्यरित्या प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.कर्नाटक, तेलंगण, बिहार आणि आसाम या राज्यांना लाभदायक असलेल्या तीन प्रकल्पांच्या बहु-मार्गीकरणाला तसेच गुजरातमधील कच्छच्या दुर्गम भागांना जोडणाऱ्या एका नवीन रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मान्यता
August 27th, 04:50 pm
हे प्रकल्प प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ आणि जलद करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या उपक्रमांमुळे संपर्क व्यवस्था वाढेल आणि प्रवास अधिक सोयीचा होईल, शिवाय लॉजिस्टिक खर्च कमी होईल आणि तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होईल. याव्यतिरिक्त, हे प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावतील, ज्यामुळे शाश्वत आणि कार्यक्षम रेल्वे वाहतुकीस चालना मिळेल. या प्रकल्पांमुळे बांधकामाच्या कालावधीत सुमारे 251 लाख मानवी दिवसांसाठी थेट रोजगार निर्माण होईल.