पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय पॅरा-ॲथलीट खेळाडूंच्या चमूचे कौतुक
October 06th, 04:28 pm
नवी दिल्ली इथे आयोजित जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पॅरा-ॲथलीट खेळाडूंच्या चमूचे कौतुक केले. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 6 सुवर्ण पदकांसह 22 पदके जिंकून, या स्पर्धेच्या पदकतालिकेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीने देशाच्या पॅरा-क्रीडा प्रवासातील एक नवीन टप्पा गाठला गेला आहे. भारताने पहिल्यांदाच या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 01st, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी देण्यात आली. देशाच्या क्रीडा क्षेत्राला नव्याने दिशा देण्यासाठी आणि खेळाद्वारे नागरिकांना सक्षम बनवण्याच्या दिशेने केंद्र सरकारने टाकलेले हे म्हत्वाचे पाऊल ठरले आहे.भारत मंडपम, नवी दिल्ली येथे विकित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 02:15 pm
भारताच्या युवाशक्तीच्या ऊर्जेमुळेच आज हा भारत मंडपमही ऊर्जेने व्यापून गेला आहे आणि ऊर्जामय झाला आहे. आज संपूर्ण देश स्वामी विवेकानंद यांचे स्मरण करत आहे, त्यांना अभिवादन करत आहे. स्वामी विवेकानंदांचा देशातील तरुणांवर प्रचंड विश्वास होता. स्वामीजी म्हणत, की माझा तरुण पिढीवर, नव्या पिढीवर विश्वास आहे. स्वामीजी म्हणत की, माझे कार्यकर्ते तरुण पिढीतून येतील, सिंहाप्रमाणे ते प्रत्येक समस्येवर तोडगा काढतील. विवेकानंदजींचा जसा तुमच्यावर विश्वास होता, तसाच माझा विवेकानंदजींवर विश्वास आहे, त्यांच्या प्रत्येक शब्दावर माझा विश्वास आहे. त्यांनी भारतातील तरुणांसाठी जे काही विचार केले आणि सांगितले, त्यावर माझी अंधश्रद्धा आहे. खरोखरच, आज स्वामी विवेकानंद असते, आणि त्यांनी एकविसाव्या शतकातील तरुणांमधील ही ऊर्जा, त्यांचे सक्रीय प्रयत्न पहिले असते, तर त्यांनी भारतासाठी नवा विश्वास, नवी ऊर्जा, आणि नव्या स्वप्नांचे बीज पेरले असते.विकसित भारत युवा नेते संवाद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी
January 12th, 02:00 pm
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद 2025 या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात भारतभरातील 3,000 उत्साही तरुण नेत्यांनी सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या चैतन्यपूर्ण उर्जेने भारत मंडपममध्ये आणलेले सळसळते चैतन्य अधोरेखित केले. देशातील तरुणांवर अपार विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुण पिढीतून येणारे त्यांचे शिष्य, सिंहांप्रमाणे निधड्या छातीने प्रत्येक समस्येचा सामना करतील, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे स्वामीजींनी तरुणांवर विश्वास ठेवला त्याचप्रमाणे स्वामीजींवर माझी पूर्ण स्वामीजींवर, विशेषत: तरुणांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर पूर्ण श्रद्धा आहे, असेही ते म्हणाले. आज जर स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये असते तर 21 व्या शतकातील तरुणांची जागृत शक्ती आणि सक्रिय प्रयत्न पाहून ते नव्या आत्मविश्वासाने भारले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.संविधान हा आपला मार्गदर्शक दीपस्तंभ: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
December 29th, 11:30 am
मित्रांनो, पुढील महिन्याच्या 13 तारखेपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाही सुरू होणार आहे. संगमाच्या काठावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. मला आठवतं, काही दिवसांपूर्वी मी प्रयागराजला गेलो होतो तेव्हा हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचा संपूर्ण परिसर बघून खूप आनंद झाला होता. इतका महाकाय! इतका सुंदर! एवढा भव्यपणा !10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी गुलवीर सिंगचे केले कौतुक.
September 30th, 08:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकल्याबद्दल गुलवीर सिंगचे कौतुक केले आहे.Prime Minister coveys best wishes to Indian contingent for Asian Games
September 23rd, 08:14 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has conveyed his best wishes to Indian contingent for Asian Games.4x400 मीटर रिले धावण्याच्या प्रकारात भारतीय पुरुष संघाने केलेल्या शानदार कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
August 27th, 07:03 pm
जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या 4x400 मीटर रिले धावण्याच्या प्रकारात, अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या भारतीय पुरुष संघातील अनस, अमोज, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल या चौघा धावपटूंच्या कामगिरीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(104 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
August 27th, 11:30 am
माझ्या प्रिय परिवारातील सदस्यांनो, नमस्कार. मन की बात च्या ऑगस्ट भागात आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मला आठवत नाही की असं झालं असेल की श्रावणाचा महिना असेल आणि दोन दा मन की बातचा कार्यक्रम प्रसारित झाला असेल. पण यावेळी असंच होत आहे. श्रावण म्हणजे सदाशिवाचा महिना, उत्सव आणि उल्हासाचा महिना. चांद्रयानाच्या यसस्वीतेने या उत्सवाच्या वातावरणाला कित्येक पटींनी उत्साहपूर्ण बनवलं आहे. चांद्र यान चंद्रमावर पोहचण्याच्या घटनेस आता तीन दिवसांहून अधिक काळ गेला आहे. हे यश इतकं मोठं आहे की त्याची चर्चा जितकी केली तर ती कमीच आहे. जेव्हा मी आपल्याशी चर्चा करत आहे तर मला एक जुनी कविता आठवत आहे.वीस वर्षांखालील 20 व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
June 09th, 08:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वीस वर्षांखालील गटासाठीच्या 20 व्या आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे कौतुक केले.रशियातील मॉस्को येथे झालेल्या वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत देशासाठी 17 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले महिला खेळाडूंचे अभिनंदन
May 08th, 11:03 pm
रशियातील मॉस्को येथे झालेल्या वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंनी देशासाठी 17 पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.उत्तर प्रदेशातील जालौन येथे बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:17 pm
उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उत्तर प्रदेशचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, उप-मुख्यमंत्री ब्रजेश पाठक जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इथले रहिवासी भानूप्रताप सिंह जी, उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिगण, खासदार, आमदार, अन्य लोक प्रतिनिधी आणि बुंदेलखंडच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची उत्तर प्रदेशला भेट आणि बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
July 16th, 10:25 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात जलौनच्या ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.For us, development means empowerment of poor, deprived, tribal, mothers and sisters: PM Modi
July 07th, 04:31 pm
PM Modi inaugurated and laid foundation stones of multiple projects worth over Rs. 1800 crores at an event at Dr Sampurnanand Sports Stadium, Sigra, Varanasi. He praised the local people for preferring long-lasting solutions and projects over temporary and short-cut solutions.PM inaugurates and lays the foundation stone of multiple development initiatives worth over Rs. 1800 crores
July 07th, 04:30 pm
PM Modi inaugurated and laid foundation stones of multiple projects worth over Rs. 1800 crores at an event at Dr Sampurnanand Sports Stadium, Sigra, Varanasi. He praised the local people for preferring long-lasting solutions and projects over temporary and short-cut solutions.ब्राझीलमध्ये आयोजित डेफलिम्पिक 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
May 01st, 09:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझील मध्ये आयोजित डेफलिम्पिक 2021 मध्ये सहभागी होणाऱ्या प्रतिभावान खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या क्रीडास्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला खेळाडूंनी दिलेली भेट मनाला खरोखरच स्पर्श करून गेली,असे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
August 29th, 11:30 am
आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धा 2021 मध्ये पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन
August 23rd, 03:02 pm
जागतिक ज्युनियर कुस्ती स्पर्धा 2021 मध्ये पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधानांनी नैरोबी येथे झालेल्या 20 वर्षांखालील क्रीडापटूंच्या जागतिक अथलेटिक्स स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले
August 23rd, 02:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड अथलेटिक्स अंडर 20 नैरोबी-2021 अर्थात नैरोबी येथे यावर्षी झालेल्या 20 वर्षांखालील क्रीडापटूंच्या जागतिक स्पर्धेत पदक मिळविल्याबद्दल भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.PM felicitates medal winners of 2018 Asian Para Games
October 16th, 05:34 pm
PM Narendra Modi met and felicitated the medal winners of the 2018 Asian Para Games. He urged the athletes to keep up their spirit of optimism, and persevere to achieve even greater heights.