टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

November 27th, 05:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकियो येथे झालेल्या 25 व्या उन्हाळी डेफलिंपिक्स 2025 मधील असामान्य कामगिरीबद्दल भारतीय डेफलिंपियन्सचे हार्दिक अभिनंदन केले.

जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी केल्याबद्दल भारताच्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

November 24th, 12:22 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मुष्ठियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

भारतीय तिरंदाजी संघाने आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे केले अभिनंदन

November 17th, 05:59 pm

भारतीय तिरंदाजी संघाने आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.

आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी युवा खेळाडूंचे केले अभिनंदन

November 02nd, 01:09 pm

आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये 48 पदके जिंकून आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

दिल्ली येथे होत असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे पंतप्रधानांकडून स्वागत

September 27th, 06:03 pm

नवी दिल्ली येथे आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रतिनिधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.

जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मीनाक्षीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

September 14th, 07:48 pm

लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेत 48 किलो वजनी गटात उत्कृष्ट विजय मिळवल्याबद्दल भारतीय महिला मुष्टीयोद्धा मीनाक्षीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.

जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल मुष्टीयोद्धा जस्मिन लंबोरियाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन.

September 14th, 07:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेमध्ये 57 किलो वजनी गटात मिळवलेल्या विजयाबद्दल, भारतीय मुष्टीयोद्धा जस्मिन लंबोरिया हिचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (125 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

August 31st, 11:30 am

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती, देशाची परीक्षा पाहत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून आपण पूर आणि दरडी कोसळल्यामुळे घडलेला हाहाःकार पाहिला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले, शेतं पाण्याखाली गेली, कुटूंबच्या कुटुंबे उध्वस्त झाली, पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेक पूल वाहून गेले, रस्ते वाहून गेले , लोकांवर संकट कोसळलं. या घटनांमुळे प्रत्येक भारतीयाला दुःख झालं आहे. ज्या कुटुंबांनी प्रियजनांना गमावले, त्यांचं दुःख आपणा सर्वांचं दुःख आहे. जिथे कुठे आपत्ती आली, तिथल्या लोकांना वाचवण्यासाठी आपले एनडीआरएफ-एसडीआरएफ चे जवान , अन्य सुरक्षा दले प्रत्येकजण रात्रंदिवस बचावकार्यात सहभागी झाले होते. जवानांनी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली आहे. थर्मल कॅमेरे , लाईव्ह डिटेक्टर , स्निफर डॉग्स आणि ड्रोन द्वारे देखरेख अशा अनेक आधुनिक संसाधनांच्या सहाय्यानं मदतकार्याला गती देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले गेले . या दरम्यानच्या काळात हेलिकॉप्टरद्वारे मदतसामग्री पोहचवण्यात आली, जखमींना हेलिकॉप्टरमधून उपचारांसाठी हलवण्यात आलं. या संकटसमयी सैन्यदलाची मोठी मदत झाली. स्थानिक लोक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्रशासन या सर्वांनी या संकटाच्या काळात शक्य ते सर्व प्रयत्न केले. या कठीण काळात मानवता धर्म सर्वोपरी मानून मदत करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मी मनापासून आभार मानतो.

उलानबटोर खुली स्पर्धा 2025 मधील कुस्तीपटूंच्या शानदार कामगिरीसाठी पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

June 02nd, 08:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलानबटोर खुली स्पर्धा 2025 मधील तिसऱ्या रँकिंग सिरीजमध्ये भारतीय कुस्तीपटूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल केले अभिनंदन

June 02nd, 03:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण कोरियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या 2025 आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय चमूच्या शानदार कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.प्रत्येक खेळाडूची मेहनत आणि चिकाटी संपूर्ण स्पर्धेदरम्यान स्पष्टपणे दिसून आली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये 33 पदके जिंकणाऱ्या भारतीय पथकाचे केले अभिनंदन

March 18th, 02:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक व्यक्त केले आहे. ट्युरिन,इटली येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय पथकाने 33 पदकांची घवघवीत कमाई करून देशाचा नावलौकिक वाढवला आहे.

The National Games are a celebration of India's incredible sporting talent: PM Modi in Dehradun

January 28th, 09:36 pm

PM Modi during the 38th National Games inauguration in Dehradun addressed the nation's youth, highlighting the role of sports in fostering unity, fitness, and national development. He emphasized the government's efforts in promoting sports, the importance of sports infrastructure, and India's growing sports economy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन

January 28th, 09:02 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील डेहराडून येथे 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की आज उत्तराखंड युवकांच्या ऊर्जेने अधिक झळाळून निघाले आहे. ते पुढे म्हणाले की, बाबा केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगा मातेच्या आशीर्वादाने आज 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. उत्तराखंडच्या स्थापनेचे हे 25 वे वर्ष आहे असे अधोरेखित करून,मोदी म्हणाले की या तरुण राज्यात देशभरातील युवक त्यांची क्षमता प्रदर्शित करणार आहेत.

भारतीय पॅरालिम्पिक चमूने आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रचंड अभिमान आणि आनंदाची भावना व्यक्त

September 04th, 04:33 pm

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरालिम्पिक दलाने आपल्या देशासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे. मोदी यांनी खेळाडूंच्या समर्पण आणि जिद्दीची प्रशंसा केली आणि प्रत्येक खेळाडूचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदींचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाशी संवाद

August 19th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी खेळीमेळीत संवाद साधला. पंतप्रधानांनी शीतल देवी, अवनी लेखरा, सुनील अंतील, मरियप्पन थंगावेलू आणि अरुणा तन्वर या खेळाडूंशी वैयक्तिकरित्या बातचीत केली. त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या सांगता प्रसंगी पंतप्रधानांनी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे केले कौतुक

August 11th, 11:40 pm

फ्रान्समधल्या पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक 2024 ची आज सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.