जगातील सर्व देशांचे लक्ष आता भारतीय स्टार्ट-अप्सकडे असणार आहे: अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी
August 23rd, 11:42 am
पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्ट-अप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि एका नव्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या त्यांच्या धैर्याचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक अंतराळयाने, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारतातील पहिले अंतराळ-औषध क्षेत्रातील स्टार्टअप यासह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता.पंतप्रधान मोदींनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी साधला संवाद
August 23rd, 11:30 am
पंतप्रधानांनी अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप्सच्या सीईओंशी संवाद साधला; ज्यामध्ये त्यांनी नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. या संवादात खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्र खुले करणे, भारतीय कंपन्यांना सरकारी पाठिंबा, रोबोटिक स्पेसक्राफ्ट, वारंवार होणारे रॉकेट प्रक्षेपण आणि भारताची पहिली स्पेस-फार्मा स्टार्ट-अप यासह अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा
August 21st, 02:21 pm
पंतप्रधानांनी 20 स्पेस स्टार्ट-अप्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या खाजगी अंतराळ परिसंस्थेवर आणि जागतिक प्रतिभा, कंपन्या व गुंतवणूक आकर्षित करण्याच्या तिच्या क्षमतेवर भर दिला. त्यांनी अंतराळ तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर, उद्योग क्षेत्रातील मजबूत सहकार्य आणि तरुण पिढीला अंतराळाविषयी प्रेरित करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील प्रमुख मुद्दे.
August 15th, 04:44 pm
पंतप्रधान मोदी यांनी आज 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी गेल्या 12 वर्षांतील उत्पादन, डिजिटल विकास आणि नागरिक सेवा पुरवठ्यातील भारताच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल मांडला. राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सात महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश असलेल्या परिवर्तनात्मक 'सप्तधारा' संकल्पनेचेही अनावरण केले.परिवर्तनाची 12 वर्षे : स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली भारताची प्रगती
August 15th, 01:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, गेल्या 12 वर्षात देशात झालेले परिवर्तन अधोरेखित करत, उत्पादन क्षेत्र, डिजिटल पायाभूत सुविधा, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुरक्षा, युवा सक्षमीकरण, नवोन्मेष, सामाजिक सुरक्षा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रात झालेल्या सुधारणा आणि प्रगती विशद केली.80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर
August 15th, 07:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केले देशाला संबोधित
August 15th, 06:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित केले. त्यांनी देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ‘वंदे मातरम्’च्या 150व्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा करत असताना देशभरातील प्रत्येक घर आणि प्रत्येक हृदयात तिरंग्याची भावना आणि नव्या संकल्पांचा उत्साह प्रतिबिंबित होत असल्याचे त्यांनी सांगितले. “त्यागाची महान परंपरा जागृत करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि महान क्रांतिकारकांना मी आदरपूर्वक नमन करतो,” असे मोदी यावेळी म्हणाले.भारताने 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
August 15th, 06:45 am
पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित करताना, 140 कोटी भारतीयांच्या शक्ती आणि संकल्पाच्या जोरावर 2047 पर्यंत 'विकसित भारत' घडवण्याचे स्वप्न मांडले. त्यांनी शांती कायदा, रेल्वेचे विद्युतीकरण, भारताचे व्यापार करार, नक्षलवादाचा अंत आणि इतर महत्त्वपूर्ण उपक्रमांवर भर दिला. तसेच, त्यांनी देशवासीयांना 'शक्तीची सप्तधारा' स्वीकारण्याचे आवाहन केले.म्हैसूर येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र – विवेक स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर
August 01st, 04:53 pm
सर्वप्रथम मी म्हैसूरच्या अधिष्ठात्री देवी माता चामुंडेश्वरी यांना साष्टांग प्रणाम करतो. अवघ्या दोन दिवसांपूर्वी आपण सर्वांनी गुरुपौर्णिमा साजरी केली. आपण सर्व जाणता की, माझ्या जीवनप्रवासाची सुरुवात जिथून झाली आणि आज मी ज्या स्थानावर आहे, त्या प्रवासात रामकृष्ण मिशनचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. तीन महिन्यांपूर्वी मला हावडा येथील बेलूर मठाला भेट देण्याची संधी मिळाली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे केले उद्घाटन
August 01st, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकातील मैसुरू येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र - विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या विशाल जनसमुदायाला अभिवादन करून पंतप्रधानांनी शहराची अधिष्ठात्री देवता असलेल्या देवी चामुंडेश्वरीला आदराने वंदन केले.Our guiding spirit is - Grow More, Achieve More: PM Modi at the community programme in Melbourne, Australia
July 09th, 03:22 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 09th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले. विशेष आदराची भावना दर्शवत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 27th, 11:01 am
मंत्रिमंडळातील माझे सहकारी, जी. किशन रेड्डीजी, आंध्र प्रदेशचे उद्योग मंत्री, टी.जी. भरतजी, इन-स्पेसचे अध्यक्ष, पवन गोएंकाजी, टीम स्कायरूट, इतर मान्यवर, आणि सभ्य स्त्री-पुरूषहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
November 27th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी भर दिला. स्कायरूटचे इन्फिनिटी कॅम्पस भारताची नवीन विचारसरणी, नवोन्मेष आणि युवाशक्तीचे प्रतिबिंब आहे यावर भर देत त्यांनी अधोरेखित केले की देशातील नवोन्मेष , युवकांची जोखीम घेण्याची क्षमता आणि उद्योजकता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात जागतिक उपग्रह प्रक्षेपण परिसंस्थेत भारत आघाडीचा देश म्हणून कसा उदयास येईल याचे प्रतिबिंब म्हणजे आजचा कार्यक्रम आहे असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका यांना शुभेच्छा दिल्या आणि नमूद केले की हे दोन्ही युवा उद्योजक देशभरातील असंख्य तरुण अंतराळ उद्योजकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. दोघांनीही स्वतःवर विश्वास ठेवला, जोखीम घेण्यास मागेपुढे पाहिले नाही आणि परिणामी आज संपूर्ण देश त्यांचे यश पाहत आहे आणि देशाला त्यांचा अभिमान वाटत आहे यावर त्यांनी भर दिला .उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
November 03rd, 11:00 am
आजचा कार्यक्रम विज्ञानाशी संबंधित आहे, मात्र मी आधी भारताच्या क्रिकेटमधील दिमाखदार विजयाबद्दल बोलेन. आपल्या क्रिकेट संघाच्या यशाने संपूर्ण भारत आनंदित आहे. हा भारताचा पहिला महिला विश्वचषक आहे. मी आपल्या महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करतो. आम्हाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या यशामुळे देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा मिळेल.पंतप्रधानांनी उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष 2025 बैठकीला केले संबोधित
November 03rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष 2025 (ईएसटीआयसी) बैठकीला संबोधित केले.याप्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी देश-परदेशातील विज्ञानिक, नवोन्मेषकर्ते, शिक्षण क्षेत्राचे सदस्य तसेच इतर सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत केले. आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेत भारतीय संघाने मिळवलेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल बोलताना, भारतीय क्रिकेट संघाच्या या यशामुळे संपूर्ण देश आनंदित झाला आहे हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. भारताने मिळवलेला हा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक होता यावर अधिक भर देत त्यांनी महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. देशाला या क्रिकेटपटूंचा अभिमान आहे असे सांगत या खेळाडूंचे यश देशभरातील लाखो तरुणांना प्रेरणा देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.नवी दिल्ली 7 लोक कल्याण मार्ग इथे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
September 04th, 05:35 pm
आपल्याकडे शिक्षकांप्रति नैसर्गिक आदर, सन्मानाची भावना असते आणि ते समाजाची मोठी ताकद असतात. शिक्षकांना आशीर्वाद देणे, हे अयोग्य/पाप आहे. त्यामुळे मी हे पाप करू इच्छित नाही. मी आपल्याशी जरूर संवाद साधू इच्छितो. माझ्यासाठी हा एक खूपच छान अनुभव होता की तुम्हा सगळ्यांना... खरं तर तुम्हा सगळ्यांना नाही तर तुम्हांला मला भेटणे, कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात स्वतःची एक कहाणी असेल, त्याशिवाय इथपर्यंत पोहोचू शकला नसतात. पण इतका वेळ काढणे कठीण असते. तरीही मला तुमच्या सर्वांकडून तुमच्याबद्दल थोडंफार जाणून घेण्याची संधी मिळाली, ती नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणे हा शेवट असू शकत नाही. आपल्या सर्वांवर सगळ्यांचे लक्ष असेल, या पुरस्कारानंतर सर्वांचे लक्ष असेल. याचा अर्थ आपल्या सर्वांची पोहोच वाढली आहे. यापुर्वी तुमचे प्रभाव क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र असेल ते या पुरस्कारानंतर वृद्धिंगत होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले
September 04th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या शिक्षकांना संबोधित केले. शिक्षक वर्गाला राष्ट्र-उभारणीतील मजबूत शक्ती संबोधत पंतप्रधान मोदी यांनी शिक्षकांना भारतीय समाजात दिल्या जात असलेल्या नैसर्गिक सन्मानाचे कौतुक केले. शिक्षकांचा गौरव करणे ही केवळ एक रीत किंवा पद्धत नसून त्यांच्या आयुष्यभराच्या समर्पणाला आणि प्रभावाला दिलेली मान्यता असते यावर त्यांनी अधिक भर दिला.18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
August 12th, 04:34 pm
64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. शतकानुशतके, भारतीय आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत. उदाहरणार्थ, 5 व्या शतकात, आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला. पृथ्वी आपल्या अक्षावर फिरते असे सांगणारे ते पहिलेच होते. अक्षरशः त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला!,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिंपियाडला केले संबोधित
August 12th, 04:33 pm
भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी, अध्यात्माचा विज्ञानाशी आणि कुतूहलाचा सर्जनशीलतेशी संगम होतो. भारतीय शतकानुशतकांपासून आकाशाचे निरीक्षण करत आहेत आणि मोठे प्रश्न विचारत आहेत, असे मोदी म्हणाले. त्यांनी आर्यभट्ट यांचे उदाहरण दिले, ज्यांनी 5 व्या शतकात शून्याचा शोध लावला आणि पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते असे विधान प्रथम केले. शब्दशः, त्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि इतिहास घडवला! असे पंतप्रधानांनी नमूद केले.