मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाच्या पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मूळ मजकूर
December 25th, 01:00 pm
वीरांची भूमी बुंदेलखंडातील माझ्या सर्व बांधवांना माझा नमस्कार. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, येथील कार्यतत्पर मुख्यमंत्री भाई मोहन यादवजी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंहजी, वीरेंद्रकुमारजी, सीआर पाटीलजी, उपमुख्यमंत्री जगदीश देवडाजी, राजेंद्र शुक्लाजी, अन्य मंत्रीगण, खासदार, आमदार, अन्य मान्यवर, पूज्य संत मंडळी आणि मध्यप्रदेशातील माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी
December 25th, 12:30 pm
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याची आठवण करत मोदी यांनी मध्य प्रदेशच्या जनतेला वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या एका वर्षात हजारो कोटी रुपयांच्या नव्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे विकासकामांना गती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. आज ऐतिहासिक केन-बेतवा नदी जोड प्रकल्प, दौधन धरण आणि ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प या मध्य प्रदेशच्या पहिल्या सौर प्रकल्पाची पायाभरणी झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यासाठी त्यांनी मध्य प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन केले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी
December 24th, 11:46 am
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत.