The trust of 140 crore Indians is our greatest strength and responsibility: PM Modi at the NDA Leaders’ Conclave
June 10th, 06:33 pm
PM Modi addressed the NDA Leaders' Conclave in New Delhi, highlighting the government's commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians and accelerating India's journey towards a Viksit Bharat. Speaking at the NDA Conclave at Bharat Mandapam after becoming the longest continuously serving elected Prime Minister of India, he said, To have the opportunity to serve Maa Bharti for such a long time is possible only through God's blessings. For me, 'Janta Janardan' is God.PM Modi addresses NDA Leaders' Conclave, reaffirms commitment to Viksit Bharat
June 10th, 06:30 pm
PM Modi addressed the NDA Leaders' Conclave in New Delhi, highlighting the government's commitment to fulfilling the aspirations of 140 crore Indians and accelerating India's journey towards a Viksit Bharat. Speaking at the NDA Conclave at Bharat Mandapam after becoming the longest continuously serving elected Prime Minister of India, he said, To have the opportunity to serve Maa Bharti for such a long time is possible only through God's blessings. For me, 'Janta Janardan' is God.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात घेतले दर्शन
May 11th, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.प्रभास पाटण, गुजरात येथील सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर
May 11th, 10:20 am
आज प्रभास पाटणचे हे पवित्र क्षेत्र एका अद्भुत तेजाने उजळून निघाले आहे. महादेवाचा हे साक्षात दर्शन, हे सौंदर्य, धरती आणि आसमंतातून झालेली पुष्पवृष्टी, भगव्या ध्वजांची ही छटा, कला, संगीत आणि नृत्याची अप्रतिम सादरीकरणे, वेदमंत्रांचा उच्चार, गर्भगृहात होणारा शिव पंचाक्षरीचा अखंड पाठ आणि या सर्वांसोबत सागराच्या लाटांचा जयघोष; असे वाटत आहे जणू ही सृष्टी एका सुरात बोलत आहे- जय सोमनाथ! जय-जय सोमनाथ!PM Modi participates in Somnath Amrut Mahotsav, marking 75 years since the inauguration of the restored Somnath Temple, Gujarat
May 11th, 10:15 am
Addressing the Somnath Amrut Mahotsav at Somnath Temple, PM Modi described the 75th anniversary of the temple’s reconstruction as a milestone in Bharat’s civilisational journey and a symbol of India’s enduring spiritual consciousness. He said Somnath reflects the nation’s resilience, cultural continuity and unwavering faith, while also highlighting the importance of preserving heritage alongside development and modern progress.Uttar Pradesh has now emerged as one of the states with the highest number of international airports in India: PM Modi in Jewar
March 28th, 12:15 pm
PM Modi inaugurated Phase 1 of Noida International Airport at Jewar in Uttar Pradesh and said that the occasion marks a new chapter in the Viksit UP, Viksit Bharat Abhiyan. He noted that the government has resolved to make India self-reliant in the MRO sector. Highlighting the government’s achievements in recent weeks, even as the world grapples with the conflict in West Asia, he called for collective effort and national unity.उत्तरप्रदेशात नोएडा इथे, सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
March 28th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात जेवर इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या प्रगतीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करत, हा सोहळा, विकसित उत्तरप्रदेश आणि विकसित भारताच्या गाथेत एक नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज दुहेरी आनंदाचा प्रसंग आहे. पहिले कारण म्हणजे, आपणच या विमानतळाच्या कामाची पायाभरणी केली होती, आणि आज आपल्यालाच त्याचे उद्घाटनही करण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरे आनंदाचे कारण या भव्य विमानतळाच्या नावाचा उत्तरप्रदेशशी जवळचा संबंध आहे. “या प्रदेशाचा खासदार म्हणून, हे राज्य माझ्या विशेष जवळचे राज्य आहे, आणि आता या शहराची ओळखच या भव्य विमानतळाशी जोडलेली असेल.” असे सांगत, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील लोकांचे अभिनंदन केले.The greatest pride of my life is that I am a karyakarta of the Bharatiya Janata Party: PM Modi at BJP HQ
January 20th, 11:16 am
Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”PM Modi addresses BJP karyakartas at felicitation of New Party President
January 20th, 11:15 am
Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”लखनौ इथे राष्ट्र प्रेरणा स्थळ उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
December 25th, 06:16 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहयोगी आणि लखनौचे खासदार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी, उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्रीमान पंकज चौधरी जी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक जी, उपस्थित अन्य मंत्रीगण, लोकप्रतिनिधी,महिला आणि पुरुषहो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन
December 25th, 05:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधितही केले.आज लखनौ ची ही भूमी एका नव्या प्रेरणेची साक्षीदार बनली आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशासह जागतिक समुदायाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. भारतातही लाखो ख्रिश्चन कुटुंबे आज हा सण साजरा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. नाताळचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.पंतप्रधानांनी ‘सदैव अटल’येथे अटलबिहारी वाजपेयीजींना वाहिली श्रद्धांजली
December 25th, 11:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळ 'सदैव अटल' येथे श्रद्धांजली वाहिली. अटलजींचे जीवन जनसेवा व राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते; त्यांचे विचार नेहमीच देशातील जनतेला प्रेरणा देत राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.अटलजींच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत पंतप्रधानांनी सामायिक केले संस्कृत सुभाषित
December 25th, 08:58 am
माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्त, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
December 25th, 08:43 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सुशासन व राष्ट्र उभारणीसाठी समर्पित केले असे मोदी यांनी सांगितले. ते केवळ एक उत्तम वक्ते म्हणूनच नव्हे तर, एक उत्साही कवी म्हणूनही नेहमीच लक्षात राहतील. त्यांचे व्यक्तिमत्व, कार्य व नेतृत्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान 25 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देणार
December 24th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2025 रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील लखनौला भेट देतील. दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन करतील आणि यानिमित्त एका सार्वजनिक सभेला ते संबोधित करतील.आसाममधील गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 20th, 03:20 pm
आपले भाषण सुरू करण्यापूर्वी, मी आपल्या सर्वाना एक विनंती करीत आहे, आजचा हा 'विजय दिन' केवळ आसामसाठीच नाही तर संपूर्ण ईशान्येसाठी विकासाचा उत्सव आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपले मोबाईल फोन काढावेत, फोनचा टॉर्च, फ्लॅश लाईट सुरू करावा आणि विकासाच्या या उत्सवात सहभागी व्हावे. प्रत्येकाने आपल्या मोबाईल फोनचा टॉर्च-फ्लॅश सुरू करावा आणि प्रचंड टाळ्यांचा गजरही करावा. संपूर्ण देशाला ऐकू आले पाहिजे आणि दिसले पाहिजे की, आसाम आता विकासाचा उत्सव साजरा करत आहे. ज्यावेळी विकासाचा प्रकाश पोहोचतो, त्यावेळी जीवनाचा प्रत्येक मार्ग नवीन उंची गाठू लागतो. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन
December 20th, 03:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन झाले. या उद्घाटनामुळे आसामधील दळणवळणीय जोडणी, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक सहभागातील परिवर्तनाच्या दिशेने एक मोठा टप्पा गाठला गेला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधितही केले. आजचा दिवस आसाम आणि ईशान्य भारताच्या विकास आणि प्रगतीचा सोहळा आहे असे ते म्हणाले. जेव्हा प्रगतीची किरणे लोकांपर्यंत पोहोचतात, त्यावेळी जीवनातील प्रत्येक मार्ग नव्या उंचीला स्पर्श करू लागतो, असे त्यांनी अधोरेखित केले. आसामच्या भूमीशी आपली नाळ घट्टपणे जोडलेली असून, इथल्या लोकांचे प्रेम आणि स्नेह, तसेच विशेषतः आसाम आणि ईशान्य भारतातील माता-भगिनींमधला जिव्हाळा आपल्याला सातत्याने प्रेरणा देत आला आहे, त्यातूनच या क्षेत्राच्या विकासाचा सामूहिक संकल्पही मजबूत झाला आहे असे त्यांनी सांगितले. आज आसामच्या विकासात पुन्हा एकदा नवी अध्याय जोडला गेला आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.गुजरातमध्ये देडियापाडा येथे जनजातीय गौरव दिन कार्यक्रमातील पंतप्रधानांचे भाषण
November 15th, 03:15 pm
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, इथले लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, गुजरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगदीश विश्वकर्मा जी, गुजरात सरकारमधले मंत्री नरेश भाई पटेल, जयराम भाई गामीत जी, संसदेतले माझे जुने मित्र मनसुख भाई वसावा जी, भगवान बिरसा मुंडा यांचा परिवारातले व्यासपीठावर उपस्थित सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेले माझे आदिवासी बंधुभगिनी, अन्य सर्व आदरणीय व्यक्ती आणि आत्ता देशात सुरू असलेल्या अनेक कार्यक्रमांमधून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याशी जोडले गेलेले अनेक लोक, राज्याराज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री अशा सर्वांना जनजातीय गौरव दिनाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला केले संबोधित
November 15th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील देडियापाडा येथे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी 9,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. माँ नर्मदेची पवित्र भूमी आज आणखी एका ऐतिहासिक प्रसंगाची साक्षीदार होत आहे असे सांगून, मोदी यांनी भारताची एकता आणि विविधता साजरी करण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांची 150 वी जयंती याच ठिकाणी साजरी करण्यात आली होती, भारत पर्वाची सुरुवात झाली होती याची आठवण करून दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीच्या भव्य सोहळ्यासह भारत पर्वचा समारोप होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले .या शुभ प्रसंगी त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि संपूर्ण आदिवासी पट्ट्यात स्वातंत्र्याची भावना जागृत करणाऱ्या गोविंद गुरुंचे आशीर्वाद देखील या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. व्यासपीठावरून त्यांनी गोविंद गुरुंना आदरांजली वाहिली. थोड्या वेळापूर्वी देवमोगरा मातेच्या मंदिराला भेट देण्याचा आणि पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याचे सौभाग्य लाभले असे ते म्हणाले.उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा
November 09th, 01:00 pm
9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.