पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेंगलुरू येथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच उद्घाटन करताना केलेले भाषण
August 10th, 01:30 pm
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री सिध्दरमैया, केंद्रातील माझे सहकारी मनोहरलाल खट्टर, एच डी कुमारस्वामी, अश्विनी वैष्णव, व्ही सोमण्णा, शोभा जी, उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार, कर्नाटक सरकारचे मंत्री बी. सुरेश, विरोधी पक्षनेते आर अशोक, खासदार तेजस्वी सूर्या, डॉक्टर मंजूनाथ, आमदार विजयेंद्र येडियुरप्पा, आणि कर्नाटकमधील माझ्या बंधू, भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
August 10th, 01:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमध्ये बंगळूरु इथे सुमारे 7,160 कोटी रुपये खर्चाच्या बंगळूरु मेट्रोच्या यलो लाइनचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 15,610 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बंगळूरु मेट्रो टप्पा -3 प्रकल्पाची पायाभरणीही केली. यासोबतच त्यांनी के.एस.आर. रेल्वे स्थानकावर तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडाही दाखवला.गुजरात नगर विकास उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 27th, 11:30 am
मी दोन दिवस गुजरातमध्ये आहे. काल वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि आज सकाळी गांधीनगरला, मी जिथे जिथे गेलो तिथे असे वाटले की, देशभक्ती म्हणजे गर्जना करणारा सिंदूरिया सागर, सिंदूरिया सागराची गर्जना आणि फडकणारा तिरंगा ध्वज, लोकांच्या हृदयात मातृभूमीबद्दलचे अपार प्रेम, हे एक दृश्य होते, आणि हे फक्त गुजरातमध्येच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. शरीर कितीही निरोगी असले तरी, जर काटा टोचला तर संपूर्ण शरीर अस्वस्थ राहते. आता आपण तो काटा काढून टाकण्याचा निर्धार केला आहे.गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
May 27th, 11:09 am
गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशानिमित्त आज गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी शहरी विकास वर्ष 2005 ची 20 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून शहरी विकास वर्ष 2025 ला सुरुवात केली. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून वडोदरा, दाहोद, भुज, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या त्यांच्या भेटीदरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा जयघोष आणि फडकणारे तिरंगी ध्वज या माध्यमातून देशभक्तीचा उत्साह त्यांना अनुभवायला मिळाला आहे. ही दृश्य संस्मरणीय असून, ही भावना केवळ गुजरातमध्येच नाही तर भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात होती, असे ते म्हणाले.भारताने दहशतवादाचा काटा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दृढनिश्चयाने तो पूर्ण केला , असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनी केलेले भाषण
April 21st, 11:30 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी डॉ जितेंद्र सिंह जी, शक्तीकांत दास जी,डॉ. सोमनाथ जी, इतर वरिष्ठ अधिकारी वर्ग, देशभरातून जोडले गेलेले नागरी सेवेतील सर्व मित्र, महिला आणि सद्गृहस्थ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
April 21st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 17 व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. त्यांनी लोक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचे पंतप्रधान पुरस्कारदेखील प्रदान केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन केले आणि संविधानाचे 75 वे वर्ष आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती असल्याने या वर्षीच्या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. सरदार पटेल यांनी 21 एप्रिल1947 रोजी नागरी सेवकांना 'भारताची पोलादी चौकट' असे संबोधले होते. त्या संस्मरणीय संबोधनाची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी आणि अत्यंत समर्पणाने देशाची सेवा करणारी सनदी सेवा, या सरदार पटेल यांच्या दृष्टिकोनावर भर दिला. विकसित भारत निर्माण करण्याच्या भारताच्या संकल्पाच्या संदर्भात त्यांनी सरदार पटेल यांच्या आदर्शांची प्रासंगिकता अधोरेखित केली आणि सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीला आणि वारशाला मनापासून अभिवादन केले.