आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांनी आसामच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
December 02nd, 03:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम राज्य स्थापनादिनानिमित्त आसाममधील बंधु आणि भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वर्गदेव चाओलुंग सुकाफा यांचे स्वप्न पूर्ण करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा आजचा दिवस आहे; असे मोदी म्हणाले. गेल्या काही वर्षांत, केंद्र आणि आसाममधील रालोआ सरकार आसामच्या प्रगतीला चालना देण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.