पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची घेतली भेट

June 01st, 04:35 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. गेल्या दशकात भारताच्या जलद परिवर्तनाने असंख्य लोकांना सक्षम केले आहे आणि आम्ही या प्रवासाला आणखी गती देण्यासाठी काम करत आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आणि कौशल्य विकासासाठी पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

May 07th, 02:07 pm

भारतातील व्यावसायिक शिक्षणात परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने, राष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण (ITI) संस्थांचे अद्ययावतीकरण करण्यास तसेच पाच नव्या केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय उत्कृष्टता कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यास मंजूरी दिली आहे.