Assam’s progress is giving new momentum to entire Northeast: PM Modi in Guwahati
March 13th, 05:30 pm
PM Modi inaugurated and laid foundation stones for development projects worth around ₹19,480 crore in Guwahati, Assam. He transferred more than ₹18,000 crore under the PM Kisan Samman Nidhi scheme to Annadatas across the nation and distributed land pattas to tea plantation workers in Assam. He noted that the progress of Assam is giving new momentum to the entire North East and is emerging as a model state for the nation.PM Modi launches various development works in Guwahati, Assam
March 13th, 05:00 pm
PM Modi inaugurated and laid foundation stones for development projects worth around ₹19,480 crore in Guwahati, Assam. He transferred more than ₹18,000 crore under the PM Kisan Samman Nidhi scheme to Annadatas across the nation and distributed land pattas to tea plantation workers in Assam. He noted that the progress of Assam is giving new momentum to the entire North East and is emerging as a model state for the nation.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतरत्न डॉ. भुपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आसामच्या गुवाहाटी येथील समारंभातील संबोधन
September 13th, 08:57 pm
मी म्हणेन भुपेन दा! आपण म्हणा अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! अमर रहें! भुपेन दा, अमर रहे! भुपेन दा, अमर रहे! अमर रहे! आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य जी, लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा जी, अरुणाचल प्रदेश के युवा मुख्यमंत्री पेमा खांडू जी, केंद्रिय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्वांनंद सोनोवाल जी, व्यासपीठावर उपस्थित भूपेन हजारिका जी यांचे बंधू श्री समर हजारिका जी, भूपेन हजारिकाजींची बहिण श्रीमती कविता बरुआ जी, भूपेन दा यांचे पुत्र श्री तेज हजारिका जी, तेज, केम छो! उपस्थित इतर मान्यवर आणि आसामधील माझ्या बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्याला केले संबोधित
September 13th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील गुवाहाटी इथे झालेल्या भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या 100 व्या जयंती सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. या आजचा दिवस अत्यंत उल्लेखनीय असून, हा क्षण खऱ्या अर्थाने अनमोल असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. आपण पाहिलेले कलाविष्काराचे सादरीकरण, अनुभवलेला उत्साह आणि त्यातल्या समन्वयाने आपण खूप भारावून गेलो असल्याची भावनाही त्यांनी उपस्थितांसोबत सामायिक केली. या संपूर्ण कार्यक्रमात भूपेन दा यांच्या संगीताचा ताल निनादत होता ही बाब त्यांनी अधोरेखित केली. आपल्या मनात सतत भूपेन हजारिका यांच्या गाण्यातील काही शब्द रुंजी घालत असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांना सांगितला. भूपेन दा यांच्या संगीतलाटांचे तरंग सर्वत्र उमटत राहाव्यात अशी आपली आंतरिक इच्छाही त्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचे पंतप्रधानांनी मनःपूर्वक कौतुक केले. आसामध्ये सादर होणारा प्रत्येक कार्यक्रम एक नवा विक्रम प्रस्थापित करणारा कार्यक्रम ठरतो, अशीच इथली उर्जा आहे असे ते म्हणाले. आज झालेले कलाविष्काराचे सादरीकरण अपवादात्मक असल्याचे म्हणत, त्यांनी सर्व कलाकारांची प्रशंसा केली तसेच त्यांचे अभिनंदनही केले.रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 23rd, 11:00 am
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मजुमदार जी, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला जी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा जी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो जी, मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा जी, सर्व उद्योगपती, गुंतवणूकदार, बंधु आणि भगिनींनो…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन
May 23rd, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे रायझिंग ईशान्य गुंतवणूकदार शिखर परिषद 2025 चे उद्घाटन केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करताना, पंतप्रधानांनी ईशान्य प्रदेशाच्या भविष्याप्रति अभिमान, कळकळ आणि प्रचंड विश्वास व्यक्त केला. भारत मंडपम येथे अलिकडेच झालेल्या अष्टलक्ष्मी महोत्सवाची त्यांनी आठवण करून दिली आणि आजचा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे यावर भर दिला. शिखर परिषदेला उपस्थित असलेल्या उद्योग धुरिणांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. यातून या प्रदेशातील संधींबाबतचा उत्साह अधोरेखित झाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी सर्व मंत्रालये आणि राज्य सरकारांचे अभिनंदन केले तसेच गुंतवणूक-पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. शुभेच्छा देत, पंतप्रधानांनी नॉर्थ ईस्ट रायझिंग शिखर परिषदेचे कौतुक केले आणि या प्रदेशाच्या निरंतर विकास आणि समृद्धीप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.नवी दिल्ली येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 06th, 02:10 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा जी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा जी, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया जी, सुकांता मुजूमदार जी, अरुणाचल प्रदेशचे उप-मुख्यमंत्री, मिजोरम आणि नागालँडच्या सरकारचे मंत्रीगण, अन्य लोकप्रतिनिधी, ईशान्य प्रदेशातून आलेले सर्व बंधू आणि भगिनी, स्त्री आणि पुरुषगण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन
December 06th, 02:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान 6 डिसेंबर रोजी अष्टलक्ष्मी महोत्सवाचे करणार उद्घाटन
December 05th, 06:28 pm
ईशान्य भारतातील सांस्कृतिक चैतन्य प्रदर्शित करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे दुपारी 3 वाजता अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.