स्वाभिमान अपार्टमेंट्सच्या लाभार्थ्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

January 03rd, 08:30 pm

होय, सर, मला मिळाले आहे. आम्ही तुमचे अपार ऋणी आहोत. आम्हाला झोपडीतून बाहेर काढून तुम्ही महाल दिलात. एवढ्या भव्य गोष्टीची आम्ही कधी कल्पनाही केलेली नाही, पण तुम्ही आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणले... होय, सर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमान अपार्टमेंटच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

January 03rd, 08:24 pm

'सर्वांसाठी घरे' या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमधील अशोक विहार येथील स्वाभिमान अपार्टमेंट येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झुग्गी झोपडी (जेजे) क्लस्टरमधील रहिवाशांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिकांना भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमान अपार्टमेंटच्या लाभार्थ्यांशी संवादही साधला. स्वाभिमान अपार्टमेंटमध्ये राहायला आलेल्या लाभार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या गृहनिर्माण उपक्रमाने घडवलेल्या परिवर्तनाबद्दल समाधान व्यक्त केले. आतापर्यंत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि आता कायमस्वरूपी घरे मिळालेल्या कुटुंबांच्या जीवनातील सकारात्मक बदल या संवादामधून प्रतिबिंबित झाला.