दिग्गज आणि अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
April 12th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. भारताने आजवर अनुभवलेल्या अत्यंत दिग्गज आणि अष्टपैलू गायकांपैकी त्या एक होत्या, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. अनेक दशकांचा प्रदीर्घ काळ व्यापलेल्या त्यांच्या असामान्य सांगीतिक प्रवासाने देशाचा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील अगणित लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांचे भावस्पर्शी सुरावटींचे गाणे असो वा चैतन्यमयी रचना, त्यांच्या आवाजात एक अजरामर प्रतिभा होती, असे सांगत मोदी यांनी त्यांच्यासोबत झालेल्या संवादाच्या आठवणींना उजाळा दिला.आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधानांकडून तीव्र चिंता व्यक्त.
April 12th, 10:56 am
आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आशा भोसले यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी केली आहे.PM condoles the demise of singer Asha Bhosle's son
October 01st, 05:00 pm