पंतप्रधानांकडून सशस्त्र सेना ध्वज दिन निमित्त सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त
December 07th, 10:58 am
आज पंतप्रधानांनी सशस्त्र सेना ध्वज दिन निमित्त सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांप्रती आपली मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.आयएनएस विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 20th, 10:30 am
आजचा हा दिवस अद्भुत आहे, आजचा हा क्षण संस्मरणीय आहे, हे दृश्य अद्भुत आहे. आज माझ्या एका बाजूला अथांग समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या वीर सैनिकांचे अथांग सामर्थ्य आहे. आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितिज आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तींना सामावून घेणारे हे विशाल, विराट आयएनएस विक्रांत आहे. सागराच्या पाण्यावर सूर्याच्या किरणांची ही चमक एका प्रकारे वीर जवानांनी उजळवलेले दिवाळीचे दिवे आहेत. या आमच्या अलौकिक दीपमाळा आहेत, यावेळी नौदलाच्या तुम्हा सर्व शूर सैनिकांमध्ये मी दिवाळीचे पवित्र पर्व साजरे करत आहे हे माझे भाग्य आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर साजरी केली दिवाळी
October 20th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. आजचा दिवस म्हणजे एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आहे आणि समोर एक उल्लेखनीय दृश्य आहे असे नमूद करून, मोदी यांनी एका बाजूला विशाल महासागर आणि दुसरीकडे भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट शक्ती असल्याचे अधोरेखित केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे, तर दुसऱ्या बाजूला आयएनएस विक्रांतची प्रचंड शक्ती आहे, जी अनंत शक्तीचे मूर्त रूप आहे, असे त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाची चमक दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी लावलेल्या दिव्यांशी मिळती जुळती आहे, त्यामुळे दिव्यांची दिव्य माला तयार होते असं ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या शूर जवानांमध्ये ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हा आपला बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.सशस्त्र दलांच्या परिचालन सज्जतेत वाढ होण्याच्या दृष्टीने संयुक्तता, आत्मनिर्भरता आणि नवोन्मेष यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे झालेल्या संयुक्त कमांडर्स परिषदेत दिला भर
September 15th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे 16 व्या संयुक्त कमांडर्स परिषद -2025 चे उद्घाटन केले. दर दोन वर्षांनी एकदा आयोजित होणारी ही परिषद म्हणजे सशस्त्र दलांचा सर्वोच्च स्तरीय विचारमंथन मंच आहे, जो देशाच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्वाला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि भारताच्या लष्करी तयारीच्या भविष्यातील विकासासाठी पाया घालण्यासाठी तयार करण्यात आला आहे. या वर्षीच्या परिषदेची संकल्पना 'सुधारणांचे वर्ष - भविष्यासाठी परिवर्तन' अशी असून ती सध्या सुरु असलेल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण आणि परिवर्तन यावर आधारित आहे.माओवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याच्या सैन्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक
May 21st, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि माओवादाचा धोका संपवण्यासाठी आणि आपल्या जनतेला शांततामय आणि प्रगतीशील जीवनाची सुनिश्चिती करण्यासाठी सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.आदमपूर हवाई तळावर पंतप्रधानांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधलेला संवाद
May 13th, 03:45 pm
या जयघोषाचे सामर्थ्य नुकतेच जगाने पाहिले आहे. भारत माता की जय हा केवळ जयघोष नव्हे तर भारत मातेची प्रतिष्ठा राखण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या देशाच्या प्रत्येक सैनिकाची ही शपथ आहे.देशासाठी काही करू इच्छिणाऱ्या, देशहितासाठी जगणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा आवाज आहे. भारता माता की जय हा जयजयकार मैदानातही घुमतो आणि मोहिमांमधेही. भारतीय सैनिक जेव्हा भारत मातेचा जयजयकार करतात तेव्हा शत्रूचाही थरकाप उडतो.जेव्हा आपली ड्रोन्स, शत्रूची तटबंदी ढासळवतात, जेव्हा सणसणत जाणारी आपली क्षेपणास्त्रे अचूक लक्ष्यभेद करतात तेव्हा शत्रूला ऐकू येतो भारत मातेचा जयजयकार ! जेव्हा रात्रीच्या अंधारातही आम्ही सूर्याप्रमाणे लखलखीत उजेड करणारी कामगिरी करतो तेव्हा शत्रूसमोर तरळतो भारत मातेचा जयजयकार. शत्रूची अण्वस्त्रांची धमकी जेव्हा आपली सैन्यदले पोकळ ठरवितात तेव्हा आकाशापासून पाताळापर्यंत एकच जयजयकार दुमदुमतो-भारत माता की जय!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी साधला संवाद
May 13th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर येथील हवाई तळाला भेट दिली आणि या तळावरील शूर हवाई योद्धे आणि सैनिकांशी संवाद साधला.त्यांना संबोधित करताना, त्यांनी 'भारत माता की जय' या जयघोषाचे सामर्थ्य अधोरेखित केले. जगाने नुकतेच याचे सामर्थ्य अनुभवले आहे यावर त्यांनी भर दिला. हा केवळ जयजयकार नसून, भारतमातेची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या प्रत्येक सैनिकाची ही एक पवित्र शपथ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही घोषणा म्हणजे, राष्ट्रहितासाठी जगण्याची आणि अर्थपूर्ण योगदान देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक नागरिकाचा आवाज आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.‘भारत माता की जय’ हा जयघोष युद्धभूमी आणि महत्त्वाच्या मोहिमा अशा दोन्ही ठिकाणी घुमतो, असे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की जेव्हा भारतीय सैनिक ‘भारत माता की जय’ चा जयघोष करतात, तेव्हा शत्रूच्या मनात धडकी भरते. त्यांनी भारताच्या लष्करी सामर्थ्यावर भर दिला आणि सांगितले की जेव्हा भारतीय ड्रोन शत्रूच्या तटबंदी उद्ध्वस्त करतात आणि क्षेपणास्त्रे अचूकतेने हल्ला करतात, तेव्हा शत्रूला फक्त एकच वाक्य ऐकू येते—‘भारत माता की जय’. पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले की अंधाऱ्या रात्रीतही, भारताकडे आकाश उजळून टाकण्याची क्षमता आहे, ज्यामुळे शत्रूला देशाच्या अदम्य भावनेचे दर्शन घडते. त्यांनी सांगितले की ज्यावेळी भारताचे सैन्य अणुबॉम्बच्या धमक्या मोडून काढते, तेव्हा आकाशात आणि पाताळात एकच संदेश घुमतो—‘भारत माता की जय’!शूर हवाई योद्धे आणि सैनिकांना भेटण्यासाठी,पंतप्रधानांनी एएफएस आदमपूरला दिली भेट
May 13th, 01:04 pm
आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएफएस आदमपूरला जाऊन भेट दिली. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या आपल्यासारख्या योध्द्यांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव आहे, असे मोदी म्हणाले.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय बैठक
May 10th, 02:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आज नवी दिल्ली येथील 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी उच्च-स्तरीय बैठक पार पडली.संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि संरक्षणदल प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान, सशस्त्र दलांचे प्रमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न
May 09th, 10:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, आणि सशस्त्र दलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा
January 26th, 12:30 pm
कर्तव्य पथावर पार पडलेल्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात भारताची एकता, सामर्थ्य आणि वारशाचे दर्शन घडवण्यात आले. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय समर स्मारकावर आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांची प्रमुख उपस्थिती होती. शिस्तबद्ध पद्धतीने जाणाऱ्या सशस्त्र दलांच्या पथकांनी शिस्त आणि शौर्याची चुणूक दाखवली, तर विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणातून भारताच्या समृद्ध विविधतेवर प्रकाश टाकण्यात आला. भारतीय हवाई दलाच्या चित्तथरारक हवाई कसरतींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सोहळ्यासाठी जमलेल्या लोकांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांनी भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे
January 15th, 09:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या सेना दिनाप्रीत्यर्थ भारतीय लष्कराच्या अविचल साहसी वृत्तीला प्रणाम केला आहे. भारतीय सेना हे दृढनिश्चय , व्यावसायिकता आणि समर्पणभावाचे मूर्तिमंत प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. “सशस्त्र सेनेच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाप्रती आमचे सरकार वचनबद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक सुधारणा घडवून आणल्या असून आधुनिकीकरणावर भर दिला आहे.” असे मोदी म्हणाले.One Rank One Pension (OROP) scheme is a tribute to the courage and sacrifices of our veterans and ex-service personnel: PM Modi
November 07th, 09:39 am
The Prime Minister, Shri Narendra Modi marking ten years of One Rank One Pension (OROP) scheme today said it was a tribute to the courage and sacrifices of our veterans and ex-service personnel who dedicate their lives to protecting our nation. He added that the decision to implement OROP was a significant step towards addressing this long-standing demand and reaffirming our nation’s gratitude to our heroes.पंतप्रधान 12 मार्च रोजी गुजराथ आणि राजस्थानला देणार भेट
March 10th, 05:24 pm
पंतप्रधान 12 मार्च 2024 रोजी गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन करतील तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरणही करतील. त्यानंतर पावणेदोन वाजता पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे भारत शक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या तिन्ही दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावाचे प्रात्यक्षिक बघतील.Glimpses from 75th Republic Day celebrations at Kartavya Path, New Delhi
January 26th, 01:08 pm
India marked the 75th Republic Day with great fervour and enthusiasm. The country's perse culture, prowess of the Armed Forces were displayed at Kartavya Path in New Delhi. President Droupadi Murmu, Prime Minister Narendra Modi, President Emmanuel Macron of France, who was this year's chief guest, graced the occasion.भारताला सामरिक दृष्ट्या नवे सामर्थ्य लाभले असून देशाच्या सीमा पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित झाल्या आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाल किल्यावरुन स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रतिपादन
August 15th, 02:46 pm
गेल्या काही वर्षात भारताला सामरिक दृष्ट्या नवे सामर्थ्य लाभले असून पहिल्यापेक्षा आपल्या सीमा अधिक सुरक्षित झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्याच्या बुरूजावरून ते राष्ट्राला संबोधित करत होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सध्याच्या जागतिक पटलावरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या ठाम निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करण्यासह ही दले अधिक तरुण आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने सज्ज राखण्यासाठी अनेक लष्करी सुधारणा हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांच्या 2022 च्या प्रशिक्षणार्थी तुकडीने पंतप्रधानांची भेट घेतली
July 25th, 07:56 pm
पंतप्रधानांनी या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि त्यांना सरकारी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर आतापर्यंत आलेल्या अनुभवांविषयी चौकशी केली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना ग्रामभेटी, भारत दर्शन आणि सशस्त्र दलांच्या भेटींसह प्रशिक्षणाच्या काळात मिळालेल्या शिकवणीबद्दल माहिती दिली. गावागावांमध्ये सरकारने सुरु केलेल्या, जल जीवन अभियान तसेच पंतप्रधान आवास योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या परिवर्तनशील प्रभावाबाबत देखील त्यांनी पंतप्रधानांना सांगितले.If the world praises India it's because of your vote which elected a majority government in the Centre: PM Modi in Mudbidri
May 03rd, 11:01 am
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.PM Modi addresses public meetings in Karnataka’s Mudbidri, Ankola and Bailhongal
May 03rd, 11:00 am
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.मध्य प्रदेशातील भोपाळ इथे संयुक्त कमांडर्स परिषदेत पंतप्रधान सहभागी
April 01st, 08:36 pm
‘सज्ज, पुनरुत्थानक्षम आणि संबंधित’ ही सैन्य दलातील कमांडर्सच्या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत राष्ट्रीय सुरक्षा, सैन्य दलांतील समन्वय आणि प्रत्येक दल प्रमुखाच्या अधिकारात लष्कर, नौदल आणि वायूदलाच्या तुकड्यांचा समावेश या विषयांशी संबंधित बाबींवर चर्चा झाली. ‘आत्मनिर्भरते’च्या दिशेने जाण्यासाठी सैन्य दलांची तयारी आणि प्रगतीचा आढावा या परिषदेत घेण्यात आला.