फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
December 31st, 09:04 am
दोहा इथे झालेल्या फिडे जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. अलीकडेच फिडे रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्यापाठोपाठ अर्जुनने पुन्हा एकदा मिळविलेले यश जागतिक बुद्धिबळ क्षेत्रात भारतासाठी आणखी एक अभिमानास्पद क्षण ठरले आहे.पंतप्रधानांनी 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी चे केले अभिनंदन
December 29th, 03:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोहा येथे झालेल्या 2025 फिडे जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद स्पर्धेच्या खुल्या गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अर्जुन एरिगैसी याचे अभिनंदन केले आहे. त्याचा दृढनिश्चय कौतुकास्पद आहे. भविष्यातील वाटचालीसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुन एरिगैसीला दिल्या शुभेच्छा
October 27th, 11:08 am
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याचे लाइव्ह बुद्धिबळ मानांकनामध्ये 2800 गुणांचा आकडा पार केल्याबद्दल अभिनंदन केले.