पोप फ्रान्सिस यांनी जॉर्ज जेकब कूवाकड यांची पवित्र रोमन कॅथॉलिक चर्चचे कार्डिनल म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अत्यंत आनंद झाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी

December 08th, 09:48 am

पोप फ्रान्सिस यांनी जॉर्ज जेकब कूवाकड यांची पवित्र रोमन कॅथॉलिक चर्चचे कार्डिनल म्हणून नियुक्ती केल्याबद्दल आपल्याला अत्यंत आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर संदेश लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

परमपूज्य पोप फ्रान्सिस हे आर्चबिशप जॉर्ज कूवाकड यांची कार्डिनल पदी नियुक्ती करणार आहेत, ही घटना भारतासाठी अत्यंत अभिमानाचा प्रसंग असेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

December 07th, 09:31 pm

परमपूज्य पोप फ्रान्सिस हे आर्चबिशप जॉर्ज कूवाकड यांची कार्डिनल पदी नियुक्ती करणार असल्याची घटना ही भारतासाठी अभिमानाची घटना असेल, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.