पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भगवान महावीर वनस्थली उद्यानात वृक्षारोपण करून एक पेड माँ के नाम उपक्रमाला दिले बळ, अरावली ग्रीन वॉल प्रकल्पांतर्गत अरावली पर्वतरांगांचे पुनर्वनीकरण करण्याचा केला संकल्प
June 05th, 01:33 pm
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त,पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथील भगवान महावीर वनस्थळी उद्यानात वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले आणि एक पेड माँ के नाम उपक्रमाला बळ दिले.पंतप्रधानांनी अरावली ग्रीन वॉल प्रकल्पांतर्गत अरावली पर्वतरांगांच्या पुनर्वनीकरणाचे महत्त्वही अधोरेखित केले.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक पेड माँ के नाम उपक्रमांतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम
June 04th, 01:20 pm
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जून 2025 रोजी सकाळी 10:15 वाजता नवी दिल्लीतील भगवान महावीर वनस्थळी पार्क येथे एका विशेष वृक्षारोपण उपक्रमाचे नेतृत्व करतील, ज्यामध्ये पर्यावरणीय देखभाल आणि हरित गतिशीलतेसाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली जाईल.