22व्या आसियान - भारत शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे प्रारंभिक भाषण

October 26th, 02:20 pm

आसियानच्या यशस्वी अध्यक्षतेसाठी, मी पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारताच्या समन्वयक देशाची भूमिका कौशल्यतेने पार पाडल्याबद्दल फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांचे आभार मानतो. आणि आसियानच्या नव्या सदस्याच्या रूपात तिमोर लेस्टे चे स्वागत करतो.

मलेशियात क्वालालंपूर येथे झालेल्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग

October 26th, 02:06 pm

22 वी आसियान-भारत शिखर परिषद 26 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. पंतप्रधान आणि आसियान नेत्यांनी आसियान-भारत संबंधांमधील प्रगतीचा संयुक्तपणे आढावा घेतला आणि सर्वंकष धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या उपक्रमांवर चर्चा केली. पंतप्रधानांचा भारत-आसियान शिखर परिषदेतील हा 12 वा सहभाग होता.

पंतप्रधानांनी मलेशियाच्या पंतप्रधानांशी साधला संवाद; आसियानच्या अध्यक्षपदाबद्दल केले अभिनंदन

October 23rd, 10:55 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी स्नेह आणि सौहार्दपूर्ण संवाद साधला. यावेळी, मलेशियाने आसियानचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान इब्राहिम यांचे हार्दिक अभिनंदन केले. मलेशियाच्या नेतृत्वाखाली आगामी आसियानसंबंधित शिखर परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी मलेशियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट

July 07th, 05:13 am

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो मध्ये 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मलेशियाचे पंतप्रधान महामहिम अन्वर बिन इब्राहिम यांची भेट घेतली.