नवी दिल्लीत भारत मंडपम येथे आयोजित वाययुजीएम (युग्म) बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 29th, 11:01 am

आज येथे सरकार, शिक्षण क्षेत्र, विज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विविध क्षेत्रातील मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. ही एकजूट, हे ऐक्य, यालाच युग्म असे म्हणतात. हे एक असे युग्म आहे ज्यामध्ये विकसित भारताच्या भविष्यकालीन तंत्रज्ञानाशी संबंधित भागधारक एकत्र आले आहेत, एकजूट झाले आहेत. भारताची नवोन्मेष क्षमता आणि गहन-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारताचे स्थान बळकट करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत त्यांना या कार्यक्रमाच्या आयोजनाद्वारे आणखी बळकटी मिळेल असा विश्वास मला वाटतो. आज आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई या संस्थांमध्ये कृत्रिम प्रज्ञा , गुप्तहेर यंत्रणा आणि जैवविज्ञान, जैव तंत्रज्ञान तसेच आरोग्य आणि वैद्यकीय सेवा यांच्याशी संबंधित सुपर हब्सची सुरुवात होत आहे. आज वाधवानी नवोन्मेष नेटवर्कची देखील सुरुवात झाली आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेसोबत मिळून संशोधनाला चालना देण्याचा देखील निर्धार करण्यात आला आहे. या प्रयत्नासाठी वाधवानी प्रतिष्‍ठानचे, आमच्या आयआयटी संस्थांचे, आणि इतर सर्व भागधारकांचे मी अभिनंदन करतो. तुमची समर्पणवृत्ती आणि सक्रियतेमुळे खासगी आणि सरकारी क्षेत्राने एकत्र येऊन देशाच्या शिक्षण प्रणालीमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘युग्म’ नवोन्मेष परिषदेला केले संबोधित

April 29th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित युग्म नवोन्मेष परिषदेला संबोधित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, त्यांनी सरकारी अधिकारी, शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आणि संशोधन व्यावसायिकांच्या महत्त्वपूर्ण मेळाव्यावर प्रकाश टाकला आणि युग्म - विकसित भारतासाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचा विकास करण्याच्या उद्देशाने एक सहकार्य - म्हणून हितधारकांच्या मिलाफावर भर दिला. या कार्यक्रमाद्वारे भारताची नाविन्यपूर्ण क्षमता आणि सखोल तंत्रज्ञानातील त्याची भूमिका वाढविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आयआयटी कानपूर आणि आयआयटी मुंबई येथे कृत्रिम प्रज्ञा , सक्षम प्रणाली आणि जैवविज्ञान, जैवतंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या सुपर हबच्या उदघाटनाचा त्यांनी उल्लेख केला. राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या सहयोगातून संशोधनाला चालना देण्याच्या बांधिलकीला दुजोरा देणाऱ्या वाधवानी नवोन्मेष नेटवर्कच्या उदघाटनाचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी वाधवानी प्रतिष्‍ठान, आयआयटी आणि या उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या सर्व हितधारकांचे अभिनंदन केले. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील सहयोगाद्वारे देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आणि सक्रिय भूमिकेबद्दल त्यांनी रोमेश वाधवानी यांचे विशेष कौतुक केले.

पंतप्रधान 29 एप्रिल रोजी वाययुजीएम परिषदेत होणार सहभागी

April 28th, 07:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे वाययुजीएम, युग्म परिषदेत सहभागी होणार आहेत. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

The vision of Investment in People stands on three pillars – Education, Skill and Healthcare: PM Modi

March 05th, 01:35 pm

PM Modi participated in the Post-Budget Webinar on Employment and addressed the gathering on the theme Investing in People, Economy, and Innovation. PM remarked that India's education system is undergoing a significant transformation after several decades. He announced that over one crore manuscripts will be digitized under Gyan Bharatam Mission. He noted that India, now a $3.8 trillion economy will soon become a $5 trillion economy. PM highlighted the ‘Jan-Bhagidari’ model for better implementation of the schemes.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीला चालना - लोकांमध्ये गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित

March 05th, 01:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगारविषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. या वेबिनारमधील उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी “लोकांमध्ये गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष” या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले ज्यामध्ये विकसित भारताच्या आराखड्याची व्याख्या करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या संकल्पनेचे प्रतिबिंब अतिशय व्यापक स्तरावर दिसत आहे आणि भारताच्या भवितव्याची ब्लूप्रिंट म्हणून ती काम करणार आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पायाभूत सुविधा, उद्योग, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष यांना गुंतवणुकीसाठी समान प्राधान्य देण्यात आले असल्यावर त्यांनी भर दिला. क्षमता उभारणी आणि गुणवत्तेची जोपासना या देशाच्या प्रगतीचा पाया असल्याचे अधोरेखित करत मोदी यांनी सर्व हितधारकांना एक पाऊल पुढे येण्याचे आणि विकासाच्या पुढच्या टप्प्याची गरज म्हणून या क्षेत्रांमध्ये अधिकाधिक गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. देशाच्या आर्थिक यशस्वितेसाठी ही बाब अत्यावश्यक आहे आणि प्रत्येक संघटनेच्या यशाचा हा आधार आहे, यावर त्यांनी भर दिला

केंद्रीय मंत्रिमंडळाची वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेला मंजुरी

November 25th, 08:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांची देशव्यापी उपलब्धता निर्माण करणाऱ्या वन नेशन वन सबस्क्रिप्शन या केंद्रीय योजनेला मंजुरी दिली. एका साध्या, वापरकर्ता स्नेही आणि संपूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे ही योजना राबवली जाईल. सरकारी उच्च शिक्षण संस्था आणि केंद्र सरकारच्या संशोधन आणि विकास प्रयोगशाळांसाठी ही एक ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ सुविधा असेल. वन नेशन वन सबस्क्रिप्शनसाठी 2025,2026 आणि 2027 या तीन कॅलेंडर वर्षांकरिता एक नवी केंद्रीय योजना म्हणून सुमारे 6,000 कोटी रुपयांची एकूण तरतूद केली आहे. वन नेशन वन सबस्क्रिप्शन भारतातील तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षण जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी, शिक्षण क्षेत्रात गेल्या दशकभरात भारत सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांची व्याप्ती आणि पोहोच वाढवेल. यामुळे संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि संशोधनाची आणि नवोन्मेषाची संस्कृती सरकारी विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळा या सर्वच ठिकाणी निर्माण करण्यासाठी हाती घेतलेल्या एएनआरएफ उपक्रमाला पूरक बळ मिळेल.

ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथे सेमीकॉन इंडिया 2024 कार्यक्रमात झालेले पंतप्रधानांचे भाषण

September 11th, 12:00 pm

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री-योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी-अश्विनी वैष्णव आणि जितीन प्रसाद, जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाशी संबंधित सर्व दिग्गज, शिक्षण-संशोधन आणि नवोन्मेष क्षेत्रातील सर्व भागीदार, इतर मान्यवर पाहुणे, स्त्री-पुरुष आणि सज्जनहो, सर्वांना नमस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन

September 11th, 11:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. यानिमित्त आयोजित प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजित या तीन दिवसीय परिषदेत भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित केले जाणार आहे ज्यामध्ये भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाच्या पहिल्या बैठकीचे भूषवले अध्यक्षस्थान

September 10th, 04:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाची पहिली बैठक 7, लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी झाली. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राविषयी तसेच संशोधन आणि विकास कार्यक्रमांची पुनर्रचना करण्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.