15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेतील संयुक्त निवेदन: आपल्या भावी पिढीच्या सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी भागीदारी

August 29th, 07:06 pm

जपानचे पंतप्रधान महामहीम इशिबा शिगेरू यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानला अधिकृत कार्य भेट दिली. 29 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी पंतप्रधान मोदींचे स्वागत पंतप्रधान इशिबा यांनी पंतप्रधान कार्यालयात (कांटेई) केले, जिथे त्यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. दोन्ही पंतप्रधानांनी शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा केली. यावेळी त्यांनी भारत आणि जपानमधील दीर्घकाळापासून कायम राहिलेल्या मैत्रीची आठवण केली, जी ऐतिहासिक संबंध, सामायिक मूल्ये आणि हितसंबंध, समान धोरणात्मक दृष्टिकोन आणि परस्परांबद्दलचा आदर यामध्ये रुजलेली आहे. दोन्ही पंतप्रधानांनी गेल्या दशकात भारत-जपान भागीदारीने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले आणि आगामी दशकात परस्पर सुरक्षितता आणि समृद्धी साधण्यासाठी धोरणात्मक आणि दूरगामी भागीदारी मजबूत करण्याच्या मार्गांवर रचनात्मक चर्चा केली.

जपान आणि चीन दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

August 28th, 08:40 pm

पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून, मी 15 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहे.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

June 04th, 04:52 pm

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री, रिचर्ड मार्लेस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मार्लेस यांनी अलीकडेच झालेल्या फेडरल निवडणुकीत ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाने (Australian Labor Party) ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.