अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

December 31st, 01:51 pm

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या पावन प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आणि जगभरातील भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन

December 15th, 08:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 75 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सरदार पटेलांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाला एकसंध करण्यासाठी आणि भारताला एकतेच्या सूत्रात गुंफण्यासाठी समर्पित केले.

उत्तराखंडच्या स्थापनच्या रौप्य महोत्सवानिमित्त निमत्त डेहराडून इथल्या समारंभात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा

November 09th, 01:00 pm

9 नोव्हेंबरचा हा दिवस एका दीर्घ तपस्येचे फळ आहे. आजचा दिवस आपण सर्वांसाठी अभिमानाची अनुभूती देणारा आहे. उत्तराखंडच्या देवतुल्य जनतेने अनेक वर्षांपासून जे स्वप्न पाहिले होते, ते अटलजींच्या सरकारच्या काळात, 25 वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, आणि आता गेल्या 25 वर्षांच्या प्रवासानंतर, आज उत्तराखंड ज्या उंचीवर पोहचले आहे, ते पाहून त्या प्रत्येक व्यक्तीला आनंद होणे स्वाभाविक आहे, ज्यांनी या सुंदर राज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष केला होता. ज्यांचे पर्वतांवर प्रेम आहे, ज्यांना उत्तराखंडची संस्कृती, इथले नैसर्गिक सौंदर्य, देवभूमीच्या लोकांशी जिव्हाळा आहे, त्यांचे मन आज प्रफुल्लित आहे, ते आनंदित आहेत.

डेहराडून येथे उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

November 09th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये उत्तराखंडच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याला संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान , पंतप्रधानांनी 8140 कोटी रुपये मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन केले. या समारोहाला संबोधित करताना, मोदी यांनी देवभूमी उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांप्रती आदर, सन्मान आणि सेवाभाव व्यक्त केला.

उत्तराखंडच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

November 09th, 09:05 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त उत्तराखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. निसर्गाच्या कुशीत वसलेली ही दिव्य भूमी आज पर्यटनासह प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे, असे मोदी यांनी संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम विलास पासवान यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली

October 08th, 10:20 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे लोकप्रिय नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानांची आदरांजली

September 26th, 08:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 वर्षपूर्तीप्रसंगी पंतप्रधानांचे अभिवादन

September 25th, 01:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताच्या आर्थिक प्रवासावर आणि उद्योजकीय परिसंस्थेवर झालेल्या परिवर्तनात्मक परिणामाचा गौरव केला. पंतप्रधानांनी नमूद केले की, मेक इन इंडियाने भारतातील उद्योजकांना प्रचंड बळ दिले असून, त्यातून जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण झाला आहे.

शिकागो येथे 1893 मध्ये भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेले ऐतिहासिक भाषण पंतप्रधानांनी सामायिक केले

September 11th, 08:49 am

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या घटनेला 132 वर्षे पूर्ण झाल्याच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की तो एक असा निर्णायक क्षण होता ज्याने सुसंवाद आणि वैश्विक बंधुत्वावर अधिक भर दिला.ते पुढे म्हणाले की तो खरोखरीच आपल्या इतिहासातील सर्वात प्रसिध्द आणि प्रेरणादायक क्षणांपैकी एक होता.

मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

July 26th, 06:47 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या माले इथल्या आपल्या भेटीदरम्यान, मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला भारतीय पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच, राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आदरातिथ्य केलेले पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

May 21st, 08:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आज आदरांजली वाहिली आहे.

सिक्कीम राज्याच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी सिक्कीमच्या जनतेला दिल्या शुभेच्छा

May 16th, 10:13 am

सिक्कीम राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ''या वर्षी हा दिवस अधिक खास आहे, कारण सिक्कीम राज्य स्थापनेचा हा 50 वा वर्धापनदिन आहे ! सिक्कीम हे शांत सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मेहनती लोकांचे राज्य आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त या योजनेच्या परिवर्तनकारी परिणामांची केली प्रशंसा.

April 08th, 09:08 am

देश #10YearsOfMUDRA साजरे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या (पीएमएमवाय) लाभार्थ्यांचे अभिनंदन केले.

महान स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली

March 30th, 11:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत जहान-ए-खुसरो 2025 सुफी संगीत महोत्सवात सहभागी होणार

February 27th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सुमारे 7.30 वाजता सुंदर नर्सरी, नवी दिल्ली येथे जहान-ए-खुसरो 2025 या भव्य सूफी संगीत महोत्सवात सहभागी होणार आहेत.

महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 30th, 09:06 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, आज महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, आदरांजली वाहिली आहे. आपल्या देशासाठी शहीद झालेल्या सर्वांसाठी मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली; तसेच त्यांच्या सेवेचे आणि बलिदानाचे स्मरण केले.

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

January 11th, 09:53 am

अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक शतकांचे समर्पण, तपस्या आणि संघर्षानंतर स्थापन करण्यात आलेले हे मंदिर आपली समृद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

December 15th, 09:32 am

सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. पटेल यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशाचे ऐक्य, अखंडता आणि विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणा देशाच्या नागरिकांना कायम देत राहील असे उद्गार त्यांनी काढले

पंतप्रधान 11 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन समारंभात सहभागी होणार

November 10th, 07:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:15 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे गुजरातमधील वडताल येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या 200 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

February 08th, 01:00 pm

हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.