व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार निवेदनादरम्यान पंतप्रधानांनी केलेले संबोधन
May 06th, 01:00 pm
भारत आणि व्हिएतनामच्या भागीदारीमध्ये, वारसा आणि विकास - या दोन्ही बाबींना महत्त्व आहे. गेल्या वर्षी, जेव्हा भारतातून बौद्ध अवशेष व्हिएतनामला नेण्यात आले, तेव्हा त्यांचे दर्शन 1.5 कोटींहून अधिक, म्हणजेच संपूर्ण व्हिएतनामच्या लोकसंख्येच्या 15 टक्के लोकांनी घेतले होते. आपला सामायिक वारसा जतन करण्यासाठी, आपण व्हिएतनामच्या प्राचीन चंपा संस्कृतीच्या 'मी सॉन' आणि 'न्हान टॉवर' मंदिरांचे पुनरुज्जीवन करत आहोत. यासोबतच, आता आपण चंपा संस्कृतीतील हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून ही अमूल्य परंपरा भावी पिढ्यांसाठी सुरक्षित करत आहोत.The Dehradun-Delhi Economic Corridor will transform the entire region: PM Modi in Uttarakhand
April 14th, 01:25 pm
PM Narendra Modi inaugurated the Delhi-Dehradun Economic Corridor in Dehradun. In his address, he detailed the transformative benefits of the corridor and highlighted the project's multi-dimensional impact on the region. He also spoke about the construction of a nearly 12-kilometre elevated wildlife corridor as part of the expressway and urged tourists and pilgrims to keep sacred spaces clean and plastic-free.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन
April 14th, 01:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली-देहरादून आर्थिक मार्गिकेचे उद्घाटन केले. उत्तराखंड आणि विस्तारित क्षेत्राच्या विकासात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. देहरादून इथे आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बैसाखी, बोहाग बिहू आणि पुथांडू या सणांच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. देशभरात सध्या सणांचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.मन की बात फेब्रुवारी 2026
February 22nd, 11:30 am
‘मन की बात’ मध्ये आपले स्वागत आहे, शुभेच्छा आहेत. (अभिनंदन आहे.) मन की बात हे देशाच्या आणि देशवासियांच्या कार्यकर्तृत्वाला (उपलब्धी) सर्वांसमोर आणण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिटमध्ये देशाने अशीच एक उपलब्धी पाहिली. अनेक देशांतील नेते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, नवोन्मेषक आणि स्टार्ट अप क्षेत्राशी संबंधित लोक, एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारत मंडपम मध्ये एकत्र आले होते. आगामी एआय च्या शक्तीचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दृष्टीने ही शिखर परिषद एक महत्त्वाचे वळण ठरली.आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत
November 19th, 01:46 pm
साई रामचा दिव्य मंत्रोच्चार होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे पोहोचले आणि तेथील हार्दिक स्वागताचा त्यांनी स्वीकार केला.प्राण्यांचे संरक्षण करण्यात भारत नेहमीच आघाडीवर राहील: पंतप्रधान
March 09th, 12:10 pm
भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचे संरक्षण सिद्धता करणारी संस्कृती लाभली आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान देण्यात आम्ही कायमच आघाडीवर राहू, असे मोदी पुढे म्हणाले.पंतप्रधान मोदींचा वनतारा येथील एक दिवस: आशा बाळगून वन्यजीवांवर उपचार
March 05th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी गुजरातमधील जामनगर येथे वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले. रिलायन्स जामनगर रिफायनरीच्या परिसरात 3,500 एकरांवर उभारण्यात आलेले वनतारा हे जगातील सर्वात मोठे वन्यजीव केंद्र असून ते 2,000 हून अधिक प्रजातींच्या 1.5 लाखांहून अधिक संकटातून सोडवण्यात आलेल्या, धोक्यात असलेल्या आणि जीव गमावण्याची भीती असलेल्या प्राण्यांना मुक्तपणे वावरण्याचे आश्रयस्थान आहे. वनतारा हे केवळ आश्रयस्थान नाही तर प्राण्यांच्या नैतिक हिताचे आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या भारताच्या वाढत्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.वन्यजीव संवर्धन प्रयत्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा
March 03rd, 12:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वन्यजीव संवर्धनासाठी देशाच्या समर्पित प्रयत्नांचे हार्दिक अभिनंदन केले. गेल्या दशकभरात, वाघ, बिबट्या आणि गेंड्यांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ देशाची समृद्ध जैवविविधता जपण्यातील दृढ बांधिलकी दर्शवते.रतन टाटा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
October 10th, 05:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी म्हणाले की, टाटा हे एक दूरदर्शी उद्योजक, दयाळू मन असलेले एक असाधारण व्यक्तिमत्व होते. आपल्या विनम्र, दयाळू स्वभावाने आणि आपला समाज अधिक चांगला बनवण्याप्रति अतूट बांधिलकीने त्यांनी अनेकांना आपलेसे केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण 'दीपज्योती' असे केले
September 14th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी जन्मलेल्या वासराचे नामकरण 'दीपज्योती' असे केले आहे. याबाबत फोटो आणि व्हीडिओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करताना पंतप्रधानांनी लिहिले -अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
August 03rd, 09:35 am
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहान, कृषी अर्थशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. मतीन कैम, नीतीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन
August 03rd, 09:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या (एनएएससी) संकुलात आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (आयसीएई) उद्घाटन केले. 'शाश्वत कृषी-अन्न व्यवस्थेच्या दिशेने परिवर्तन' ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. हवामान बदल, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि उद्भवणारे विविध संघर्ष यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करत, नितांत गरजेची झालेली शाश्वत कृषी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करत राहणे हे या संकल्पनेत अ़तर्गतचे उद्दिष्ट आहे. जगभरातील जवळपास 75 देशांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.पशुसंवर्धन क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासनिधीला मंत्रिमंडळाची मंजुरी
February 01st, 11:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने येत्या तीन वर्षांसाठी म्हणजे 2025-26 पर्यंत 29,610.25 कोटी रुपयांचा विकास निधी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा निधी (AHIDF), या अंतर्गत येणाऱ्या,(IDF) पायाभूत सुविधांसाठी सुरू ठेवण्यास,मंजुरी दिली आहे. ही योजना दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया आणि उत्पादनांतील वैविध्य , मांस प्रक्रिया आणि उत्पादनाचे वैविध्य, पशुखाद्य वनस्पती, उच्च जातीच्या पशुंची पैदास, पशु कचरा त्यातून उत्पनांचे स्रोत तयार करणे(कृषी-कचरा व्यवस्थापन) तसेच पशुवैद्यकीय लस आणि औषध उत्पादन यासारख्या सुविधांमधील गुंतवणूकीला प्रोत्साहन देईल.India-Greece Joint Statement
August 25th, 11:11 pm
At the invitation of Prime Minister H.E. Kyriakos Mitsotakis, PM Modi paid an official visit to Greece. Both leaders held high level talks in a warm and friendly atmosphere. They noted the ongoing cooperation between the two sides and exchanged views on bilateral, regional and international issues of mutual interest.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे पंतप्रधान मित्सो-तकिस यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमधील निवेदन
August 25th, 02:45 pm
सर्वप्रथम, ग्रीसमध्ये जंगलातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल मी सर्व भारतीयांच्या वतीने शोक व्यक्त करतो, आणि आगीत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो.वन अर्थ वन हेल्थ - अॅडव्हान्टेज हेल्थकेअर इंडिया 2023 मधील पंतप्रधानांचे भाषण
April 26th, 03:40 pm
सन्माननीय मान्यवर, जगभरातील अनेक देशांतील आरोग्य मंत्री, पश्चिम आशिया, सार्क, आसियान आणि आफ्रिकी प्रदेशातील प्रतिष्ठित प्रतिनिधी, मी भारतात आपले हार्दिक स्वागत करतो. माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि भारतीय आरोग्य सेवा उद्योगाचे प्रतिनिधी, नमस्कार!"वन अर्थ वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया 2023" च्या 6 व्या आवृत्तीचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
April 26th, 03:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर वन अर्थ वन हेल्थ - अॅडव्हांटेज हेल्थकेअर इंडिया - 2023 चे उद्घाटन केले आणि उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.चिक्कबल्लापूर येथील श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 25th, 11:40 am
मोठ्या उमेदीने आणि उत्साहाने, तुम्ही सर्वजण अनेक स्वप्ने आणि नवीन संकल्पांसह सेवेच्या या विशाल कार्यामध्ये सामील झाला आहात. तुम्हाला भेटणे हे देखील माझ्यासाठी सौभाग्यच आहे . मी तुमचा अत्यंत आभारी आहे. चिक्क-बल्लापुरा हे आधुनिक भारताच्या शिल्पकारांपैकी एक सर एम. विश्वेश्वरय्या यांचे जन्मस्थान आहे. आत्ताच मला सर विश्वेश्वरय्यांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्याचे आणि त्यांच्या संग्रहालयाला भेट देण्याचे भाग्य लाभले. या पवित्र भूमीला मी नतमस्तक होऊन वंदन करतो. या पवित्र भूमीतून प्रेरणा घेऊन त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी नवनवीन संशोधन केले, उत्कृष्ट अभियांत्रिकी प्रकल्प निर्माण केले.पंतप्रधानांनी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथे श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे केले उद्घाटन
March 25th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिक्कबल्लापूर येथे श्री मधुसूदन साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन केले. ही संस्था सर्वांना पूर्णपणे मोफत वैद्यकीय शिक्षण आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करेल. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये संस्थेचे कामकाज सुरू होईल.