भारत-क्रोएशिया नेत्यांचे निवेदन
June 19th, 06:06 pm
क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहीम आंद्रेज प्लेन्कोविच यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी क्रोएशियाचा 18 जून 2025 रोजी सरकारी दौरा केला. दोन्ही देशांमधली वाढती उच्च स्तरीय देवाणघेवाण अधिक बळकट करण्यासाठी भारतीय पंतप्रधानांनी क्रोएशियाला दिलेली ही पहिलीच भेट होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्रोएशिया प्रजासत्ताकच्या पंतप्रधानांची भेट
June 18th, 11:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झाग्रेब येथे क्रोएशिया प्रजासत्ताकचे पंतप्रधान महामहिम आंद्रेज प्लेनकोविक यांची भेट घेतली. भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच क्रोएशिया भेट असल्यामुळे भारत आणि क्रोएशिया यांच्यातील संबंधांचा हा ऐतिहासिक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक बांस्की द्वोरी पॅलेस येथे आगमन होताच पंतप्रधान प्लेनकोविक यांनी स्वतः उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. त्याआधी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे झाग्रेब विमानतळावर आगमन झाले त्यावेळी विशेष बाब म्हणून पंतप्रधान प्लेनकोविक यांनी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले.क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन
June 18th, 09:56 pm
जाग्रेब या ऐतिहासिक आणि सुंदर शहरात माझे ज्या आपुलकीने , उत्साहाने आणि प्रेमाने स्वागत झाले त्याबद्दल मी पंतप्रधान आणि क्रोएशिया सरकारचे मनापासून आभार मानतो.पंतप्रधान मोदी क्रोएशियात झाग्रेब इथे पोहोचले
June 18th, 05:38 pm
पंतप्रधान मोदी क्रोएशियात झाग्रेब इथे पोहोचले. भारताच्या पंतप्रधानांनी क्रोएशियाला दिलेली ही आजवरची पहिलीच भेट आहे. एका विशेष आदरभावाचे दर्शन घडवत क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविच यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर उत्साहाने स्वागत केले.पंतप्रधानांचे सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांच्या दौर्यापूर्वीचे निवेदन
June 15th, 07:00 am
15-16 जून दरम्यान, मी सायप्रस प्रजासत्ताकाचा दौरा करणार आहे. हा दौरा राष्ट्राध्यक्ष महामहिम निकोस क्रिस्टोडुलाइड्स यांच्या निमंत्रणावरून होत आहे. सायप्रस हा भूमध्य सागरी क्षेत्रातील आणि युरोपियन युनियनमधील भारताचा निकटचा मित्र व महत्त्वाचा भागीदार आहे. या भेटीत ऐतिहासिक संबंध दृढ करण्याची आणि व्यापार, गुंतवणूक, सुरक्षा, तंत्रज्ञान तसेच जनतेतील परस्पर संबंध वाढवण्याची संधी मिळणार आहे.पंतप्रधान मोदी 15 ते 19 जून दरम्यान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशियाचा दौरा करणार.
June 14th, 11:58 am
पंतप्रधान मोदी 15-16 जून रोजी सायप्रसला, 16-17 जून रोजी G-7 परिषदेसाठी कॅनडाला आणि 18 जून रोजी क्रोएशियाला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदुलिदीस यांच्याशी चर्चा करतील आणि लिमासोल इथे उद्योग क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांना संबोधित करतील. त्यानंतर कॅनडामध्ये, G7 परिषदेत, पंतप्रधान मोदी G-7 सदस्य देशांच्या नेत्यांसोबत विचारांची देवाणघेवाण करतील. क्रोएशियामध्ये, पंतप्रधान मोदी पंतप्रधान प्लेनकोविच यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील आणि क्रोएशियाचे राष्ट्रपती झोरान मिलानोविच यांची भेट घेतील.