मध्य प्रदेशात आनंदपूर धाम येथे पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 11th, 03:37 pm
स्वामी विचार पूर्ण आनंद जी महाराज जी, राज्यपाल मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव, मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया जी, खासदार व्ही. डी. शर्मा जी, खासदार जनार्दन सिंह सीग्रीवाल जी, व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर, आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येथे दिल्ली, हरियाणा, पंजाब संपूर्ण देशातून भाविक आले आहेत. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील आनंदपूर धाम इथे जनसभेला केले संबोधित
April 11th, 03:26 pm
भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा प्रसार करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील इसागढ तहसील इथल्या आनंदपूर धामला भेट दिली. त्यांनी गुरुजी महाराज मंदिरात दर्शन आणि पूजा केली आणि आनंदपूर धामच्या मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. या निमित्ताने पंतप्रधानांनी दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि देशभरातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांचे स्वागतही केले. श्री आनंदपूर धामला भेट देऊन आणि गुरुजी महाराजांच्या मंदिरात प्रार्थना करून आपले मन प्रसन्न झाल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत
April 09th, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिल रोजी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा दौरा करतील. ते वाराणसीला जातील आणि सकाळी 11 वाजता 3,880 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. ते एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील.