Today’s projects will further strengthen the logistics system of Eastern India: PM Modi in Kolkata, West Bengal
March 14th, 02:15 pm
Inaugurating development works worth over ₹18,000 crore in Kolkata, West Bengal, PM Modi said a new chapter of development is being written for the state and Eastern India. The projects span key sectors such as roads, railways and ports. These initiatives will benefit farmers, traders, entrepreneurs, students and every section of society, laying the foundation for a developed Bengal.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधे कोलकाता इथल्या 18,700 कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन
March 14th, 02:00 pm
रस्ते, रेल्वे आणि बंदर पायाभूत सुविधांशी संबंधित 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण व पायाभरणी या कार्यक्रमातून होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगाल आणि पूर्व भारताच्या विकासाला नवी गती मिळेल, व्यापार उदिमाला चालना मिळेल आणि लाखो लोकांना नव्या संधी मिळाल्यामुळे त्यांचे जगणे सुकर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही प्रमुख प्रकल्पांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की खरगपूर-मोरग्राम द्रुतगती मागाचे काम पूर्ण झाल्यामुळे पश्चिम बंगालमधील अनेक भागांमधल्या आर्थिक उलाढालींना वेग येईल. दुब्रजपूर बाह्यवळण मार्ग आणि कांग्सबती, शीलबती नद्यांवर बांधण्यात आलेल्या मोठ्या पुलांमुळे संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होईल असे त्यांनी नमूद केले. “या क्रांतिकारी प्रकल्पांसाठी पश्चिम बंगाल आणि संपूर्ण पूर्व भारतामधील नागरिकांचे मी अभिनंदन करतो,” असे मोदी म्हणाले.पंतप्रधान 14 मार्च रोजी पश्चिम बंगालला भेट देणार
March 12th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मार्च 2026 रोजी पश्चिम बंगालला भेट देतील. दुपारी 2 वाजता पंतप्रधान कोलकाता येथे सुमारे 18,680 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.Today, Uttar Pradesh and the entire country are witnessing a new era of world-class infrastructure: PM Modi in Meerut
February 22nd, 01:30 pm
PM Modi inaugurated the Namo Bharat Rapid Rail and the Meerut Metro in Meerut, calling them a new surge of energy for a ‘Viksit Uttar Pradesh’ and a ‘Viksit Bharat’. He highlighted that the government conferred the Bharat Ratna upon Chaudhary Charan Singh ji and inspired by his vision, the double-engine government is working to increase farmers' income. He noted that a transformed Uttar Pradesh has triggered a major economic surge and manufacturing boom.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या 'नमो भारत' प्रादेशिक जलद परिवहन व्यवस्था (आर आर टी एस) चे केले उद्घाटन आणि दिल्ली-मीरत नमो भारत कॉरिडॉर राष्ट्राला केला समर्पित
February 22nd, 01:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीरत इथे 'नमो भारत रॅपिड रेल' या द्रुतगती रेल्वे सेवेचे आणि 'मीरत मेट्रो' मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे वर्णन त्यांनी, ‘विकसित उत्तर प्रदेश’ आणि ‘विकसित भारत’ यासाठी एका नवीन ऊर्जेचा संचार असे केले. रॅपिड रेल आणि मेट्रो सेवा एकाच दिवशी एकाच फलाटावरून सुरू होण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे.अयोध्यातल्या विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 30th, 02:15 pm
अयोध्येच्या सर्व लोकांना माझे नमस्कार. आज सर्व जग उत्सुकतेने 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशावेळी अयोध्यावासीयांमध्ये असलेला हा उत्साह, उत्सुकता अगदी साहजिक आहे. मी भारताच्या मातीच्या कणाकणाचा आणि व्यक्ती व्यक्तीचा पुजारी आहे आणि आपल्या प्रमाणे मीसुद्धा तितकाच उत्सुक आहे. आपल्या सर्वांचा हा उत्साह, ही उत्सुकता थोड्या वेळापूर्वी अयोध्येच्या रस्त्यांवर देखील दिसून येत होती. असं वाटत होतं की संपूर्ण अयोध्या नगरीच रस्त्यावर उतरली आहे. हे प्रेम, हा आशीर्वाद यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. माझ्याबरोबर म्हणा सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जयपंतप्रधानांनी अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी
December 30th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या धाम येथे 15,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमीपूजन केले. यामध्ये अयोध्या आणि सभोवतालच्या भागांच्या विकासाच्या 11,100 कोटी रुपये खर्चाच्या आणि उत्तर प्रदेशातील 4,600 कोटी रुपये खर्चाच्या इतर प्रकल्पांचा समावेश आहे.Delhi-Dehradun Vande Bharat Express will ensure ‘Ease of Travel’ as well as greater comfort for the citizens: PM Modi
May 25th, 11:30 am
PM Modi flagged off the inaugural run of Vande Bharat Express from Dehradun to Delhi via video conferencing. He also dedicated to the nation, newly electrified rail sections and declared Uttarakhand a 100% electric traction state. He informed that the travel time between the two cities will be further reduced and the onboard facilities will make for a pleasant travel experience.पंतप्रधानांनी डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना
May 25th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. तसेच त्यांनी रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण देखील केले आणि उत्तराखंड राज्याला 100 टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून घोषित केले.