विश्वचषक विजेत्या भारतीय स्क्वाश संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
December 15th, 10:16 am
एसडीएटी स्क्वाश विश्व चषक 2025 जिंकून पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्क्वाश संघांचे अभिनंदन केले आहे. जोशना चिन्नप्पा, अभय सिंग, वेलावन सेंथिल कुमार आणि अनाहत सिंग यांच्या असामान्य कामगिरीची मोदी यांनी प्रशंसा केली आहे. या खेळाडूंची समर्पित वृत्ती, शिस्त आणि निर्धार यामुळे देशाचा अभिमान उंचावला आहे. या ऐतिहासिक कामगिरीतून जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतिबिंब दिसत आहे.स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अभय सिंह आणि अनाहत सिंह यांचे अभिनंदन केले
October 04th, 08:04 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश मिश्र दुहेरी स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभय सिंह आणि अनाहत सिंह यांचे अभिनंदन केले आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला स्क्वॉश संघाचे केले अभिनंदन
September 29th, 08:09 pm
आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला स्क्वॉश संघाची प्रशंसा केली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा, अनाहत सिंग आणि तन्वी यांचे अभिनंदन केले आहे.